Honeymoon | हनीमूनला जोडप्यांनी कधीही करू नयेत ‘या’ 8 चूका, करावा लागेल पश्चाताप
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणत्याही जोडप्यासाठी हनीमून (Honeymoon) नेहमीच एक स्मरणीय ट्रिप असते. विवाहाच्या अनेक विधींचा थकवा दूर करणे आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी हनीमून (Honeymoon) एक चांगला ब्रेक असतो. हनीमूनचे नियोजन (Honeymoon planning) अशाप्रकारे केले पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटेल. हनीमूनला केलेल्या छोट्या-छोट्या चूका संपूर्ण ट्रिपची मजा खराब करतात.
हनीमूनला जोडप्यांनी कोणत्या चूका अजिबात करू नयेत ते जाणून घेवूयात…
1. सीझन न तपासता बुकिंग –
फिरण्यासाठी प्रत्येक ठिकाणचा विशिष्ट हंगाम असतो, अशा योग्य वेळीच त्या ठिकाणी जावे. या हिशेबानेच लग्न किंवा हनीमूनचे नियोजन करा.
2. आरोग्य लक्षात घेऊन करा प्लानिंग –
ज्या ठिकाणी जाणार आहात तेथील स्थितीनुसार प्लानिंग करा. आरोग्याच्या बाबतीत तडजोड करू नका. व्हॅक्सीन, त्या ठिकाणच्या गाईडलाईन यांचा विचार करा.
3. योग्य प्रकारे प्रवासाचे नियोजन न करणे –
प्रवासातील छोट्या-छोट्या गोष्टींचे नियोजन करा, विमान किंवा बस बदलणे इत्यादी. लग्नाच्या ताबडतोब दुसर्या दिवशीचे प्लानिंग करणे सुद्धा त्रासदायक ठरू शकते.
4. संपूर्ण वेळ सोशल मीडियावर घालवणे –
हनीमूनला (Honeymoon) आपल्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त क्वालिटी टाइम घालवा. या दरम्यान सोशल मीडियापासून दूर रहा. फोनला सुद्धा ब्रेक द्या.
5. बेडरूमच्या बाहेर न पडणे –
हनीमूनच्या वेळी जोडीदारासोबत विशेष क्षणांचा आनंद घेण्यासाठी अनेक लोक बहुतांश वेळ बेडरूममध्ये घालवतात. परंतु सतत खोलीत राहू नका. जास्तीत जास्त ठिकाणी फिरण्याचा सुद्धा आनंद घ्या.
6. उन्हात जास्त वेळ घालवणे –
हिवाळ्यात थंडीत संपूर्ण दिवस उन्हात घालवणे चांगले वाटते. परंतु, यामुळे त्रास होऊ शकतो. हनीमूनवरून सनबर्न घेऊन परतू शकता. सनस्क्रीनचा वापर करा. हायड्रेट रहा.
7. खाण्या-पिण्यात निष्काळजीपणा –
हनीमूनमध्ये (Honeymoon) खाण्या-पिण्याकडे खुप जास्त लक्ष द्या. स्थानिक जेवण तुम्ही खाऊ शकता किंवा नाही याकडे लक्ष द्या. बाटलीबंद पाणी प्या. हॉटेल स्टाफला विचारून खाण्याची चांगली ठिकाणे निवडा.
8. बजेटकडे लक्ष न देणे –
हनीमून प्रत्येकाला स्मरणीय बनवायचे असते, परंतु याचा अर्थ हा नव्हे की, तुम्ही सर्व सेव्हिंग याच ट्रिपवर खर्च करावी. आपला विवाह आणि हनीमूनसाठी एक योग्य बजेट बनवा. यातून समजू शकते की तुम्हाला ट्रिपवर किती खर्च करायचा आहे. फिरण्यासाठी जे बजेट बनवले आहे, तेवढेच पैसे खर्च करा.
Web Title :- Honeymoon | marriages india honeymoon mistakes you need to avoid wedding planning booking
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Monalisa Bold Dance | मिनी स्कर्ट परिधान करुन मोनालिसाचा पुन्हा एकदा जलवा, शेअर केला व्हिडीओ