2 वर्षानंतर बाहेर आली ‘हनीप्रीत’, जेलपासुन गुफेपर्यंत 10 पटीनं वाढले ‘सोबती’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दोन वर्षाच्या कालावधीनांतर हनीप्रीतची जेलमधून जामिनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर हनीप्रीत सरळ सिरसा मधील आपल्या डेरा सच्चा सौदा या आश्रमात पोहचली. हनीप्रीतने वाहनांच्या ताफ्यासह आपल्या आश्रमात प्रवेश केला. बाबा राम रहीम यांच्या गुहेत थोडा वेळ थांबून हनीप्रीत माघारी आपल्या कोठीमध्ये परतली.

दो साल बाद बाहर आई हनीप्रीत, जेल से गुफा तक 10 गुना बढ़ा काफिला

अंबाला जेलमधून निघताना हनीप्रीत सोबत केवळ तीन गाड्या होत्या त्यानंतर आश्रमापर्यंत पोहचेपर्यंत तीस गाड्या सोबत आल्या होत्या. अडीचशे किलोमीटर प्रवास करताना अनेक ठिकाणी हनीप्रीत यांच्या स्वागतासाठी लोक उभे होते. आश्रमाच्या गेटवर पोहचताच फक्त सात ते आठ गाड्याच आतमध्ये गेल्या आणि बाकीच्या गाड्या बाहेरच थांबल्या होत्या.

दो साल बाद बाहर आई हनीप्रीत, जेल से गुफा तक 10 गुना बढ़ा काफिला

हनीप्रीतच्या स्वागतासाठीआश्रमात रामचर्चा करण्यात आली तर आनंदात गीत गाण्याच्या कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले. एक एक लाखांच्या दोन बॉंडवर हनीप्रीतला जामिन देण्यात आला आहे. हनीप्रीतच्या सुटकेमुळे सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दो साल बाद बाहर आई हनीप्रीत, जेल से गुफा तक 10 गुना बढ़ा काफिला

राम रहीमला शिक्षा झाल्यानंतर पंचकुला येथे झालेल्या हिंसेमुळे हनीप्रीतला अटक करण्यात आली होती. या हिंसेमध्ये 41 लोकांचा मृत्यू झाला होता तर 260 जण जखमी झाले होते. राम रहिमला अटक केल्यानंतर हनीप्रीतवर आणि इतर साथीदारांवर देशद्रोहाचा आरोप करण्यात आला होता त्यानंतर हा आरोप मागे घेत हनीप्रीतला जामिन मंजूर करण्यात आला आहे.

दो साल बाद बाहर आई हनीप्रीत, जेल से गुफा तक 10 गुना बढ़ा काफिला

हनीप्रीत आणि इतर आरोपींच्या विरोधात IPC नुसार कलम 216, 145, 150, 151, 152, 153 आणि 120 बी नुसार आरोप करण्यात आले होता. तसेच नंतर यातील कलम 121 आणि 121 ए रद्द करण्यात आले होते.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके