Honeytrap Gang | हनीट्रॅपच्या माध्यमातून व्यावसायिकाला ब्लॅकमेल करणाऱ्या चौघांना अटक

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – हनीट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल करण्याचे प्रमाण वाढू (Honeytrap Gang ) लागले आहे. काही दिवसांपूर्वीच एका साखर व्यापाऱ्याला हनीट्रॅपमध्ये अडकवल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर आता कोल्हापुरातील आणखी एका व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये (Honeytrap Gang ) अडकवून वर्षभरात दीड कोटीला लुटल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणने (LCB, Kolhapur) मंगळवारी सराईत टोळीतील चौघांना ताब्यात घेतले. दरम्यान पोलिसी खाक्या दाखवताच संशयितांनी लोटांगण घालत गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते. या टोळीचा म्होरक्या पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

 

शहरातील काही संघटित टोळ्यांनी लॉकडाऊन काळात काही धनिकांसह वेगवेगळ्या घटकांतील मंडळींना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून खंडणी वसुलीचा धडाका लावल्याचे समोर येताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली. स्थानिक गुन्हे अन्वेषणसह जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकार्‍यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पहाटेपासून शोध मोहीम राबवून चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, प्राथमिक तपासात या गुन्हेगारी टोळ्यांनी (Honeytrap Gang) दहा ते बारा बड्या व्यावसायिकांसह कॉलेज तरुणांना लाखो रुपयांना लुटल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे व्यावसायिक शहरातीलच नाही तर ग्रामीण भागातील काही व्यावसायिकांचा यामध्ये समावेश आहे.

 

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे (SP Shailesh Balkawade) यांनी फसगत झालेल्या मंडळींनी पोलिसात तक्रार करावी असे आवाहन केले आहे.
तक्रारदार व्यक्तीच्या नावाबाबत गोपनीयतेची खबरदारी घेण्यात आल्याचे स्पष्ट करत भीती न बाळगता पोलिसांशी संपर्क साधावा.
ब्लॅकमेल (Blackmail) करून लुबाडणूक करणार्‍या टोळ्यांविरुद्ध प्रसंगी ‘मोकां’तर्गत (MCOCA) कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे समजते.

 

Web Title :- Honeytrap Gang | Four arrested for blackmailing a businessman through Honeytrap

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा