कधीकाळी होता हॉंगकाँगचा ‘कर्णधार’, भारताकडून खेळण्यासाठी दिला ‘राजीनामा’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतासाठी क्रिकेट खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. त्यामुळेच आपले हे स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय वंशाचा हॉंगकाँगचा कर्णधार अंशुमन रथ याने संघाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे भारतीय संघाकडून खेळण्यासाठी त्याने चक्क आपल्या कर्णधारपदाचा देखील राजीनामा दिला आहे.

अंशुमन रथ हा सध्या हॉंगकाँगच्या क्रिकेट संघाचा कर्णधार असून त्याने आपले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याने भारतीय संघासाठी खेळण्याची आपली इच्छा जाहीर केली आहे. त्यांनतर त्याने आपण रणजी सामन्यांसाठी उपलब्ध असल्याची घोषणा केली आहे.

याविषयी बोलताना अंशुमन याने सांगितले कि, माझे क्रिकेटवर खूप प्रेम आहे. मी माझी कारकीर्द मोठी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासाठी खेळणे हे माझे स्वप्न आहे. त्याचबरोबर त्याने हॉंगकॉंग क्रिकेटचे देखील यावेळी आभार मानले. तो म्हणाला कि, हॉंगकॉंग क्रिकेटने माझ्यासाठी जे केले, त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. तसेच त्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा. अंशुमन रथ याची एकदिवसीय कारकीर्द अतिशय शानदार राहिली असून त्याने हॉंगकाँगसाठी 18 एकदिवसीय सामने खेळले.

दरम्यान, त्याने या 18 एकदिवसीय सामन्यांत 51.75 च्या सरासरीने 828 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने पाच प्रथम श्रेणी सामन्यात 62.76 च्या सरासरीने 391 धावा देखील केल्या आहेत. त्यामुळे आता त्याला बीसीसीआय रणजी सामन्यांत संधी देते कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –