स्पशेल स्कॉडची मसाज पार्लरवर ‘रेड’, पोलिस कमिश्नरला रंगेहाथ पकडलं, पुढं झालं असं काही…

हाँगकाँग : वृत्तसंस्था – हाँगकाँग पोलिसांनी नुकताच एका बेकायदेशीर मसाज पार्लरवर छापा टाकला आहे. मात्र ही घटना एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. कारण या ठिकाणी पोलिसांना जी व्यक्ती सापडली, ते पाहून सर्वच जण हैराण झाले. ज्यावेळी पोलिसांनी या मसाज पार्लरवर छापा टाकला त्यावेळी त्यांना मुख्य अधिकारी त्याठिकाणी दिसले. हे मसाज पार्लर कोणत्याही परवानगी शिवाय सुरु होते.

पोलिसांनी छापा मारल्यावर जो अधिकारी त्यांना आढळून आला त्याचे नाव आहे फ्रेडरिक चोई चिन-पेंग. ही व्यक्ती हाँगकाँग पोलिसात वरिष्ठ असिस्टंट कमिश्नरच्या पदावर कार्यरत आहे. चिनच्या एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, छापेमारीत पकडल्यानंतर त्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्यात आले आहे. विशेष म्हणजे फ्रेडरिक हे पोलीस नॅशनल सिक्योरिटीचे यूनिट डायरेक्टर आहेत.

सांगितलं जात आहे की, या घटनेनंतर हाँगकाँग पोलिसांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. 2019 नंतर हाँगकाँग पोलिसांना खूप टीकेला सामोरं जावं लागलं होतं. या प्रकरणी हाँगकाँग पोलिस चीफ क्रिस टँग यांनी फ्रेडरिक यांना अटक केल्याचे सांगितले. त्यांनी माध्यमांना सांगितले, या घटनेमुळे पोलीस फोर्टच्या स्थितीवर परिणाम होईल. मात्र, नॅशनल सिक्युरिटी डिपार्टमेंट कोणा एका अधिकाऱ्यावरील तपासामुळे डळमळीत होणार नाही.

फ्रेडरिक हे हाँगकाँग पोलीस फोर्समधील तिसऱ्या क्रमांकावरील सर्वात सीनिअर अधिकारी आहेत. फ्रेडरिक 1995 मध्ये पोलीस फोर्समध्ये रुजू झाले होते. त्यांनी चीन, युके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यासारख्या देशात प्रशिक्षण घेतले होते.