थेऊरमध्ये ‘कोरोना’ योध्यांचा सन्मान

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – थेऊर येथील रिपब्लिकन पक्षाचे हवेली तालुका अध्यक्ष मारुती कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते खंडू गावडे, आनंद वैराट व गणेश गावडे यांनी वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून कोरोनाशी दोन हात करणार्या योध्द्यांचा सन्मान केला तर आरोग्य कर्मचार्यांना पीपीई सुरक्षा कीटचे वाटप करण्यात आले.

थेऊरमध्ये तीन महिन्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही यासाठी प्रशासकीय व आरोग्य विभागाने केलेल्या कामाचा हा परिणाम होता, परंतु मागच्या आठवड्यात अचानक सहा रुग्ण आढळून आले या दरम्यान येथील आरोग्य कर्मचारी, महसूल विभाग, पोलिस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासन यांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर हा फैलाव रोखण्यात यश आले त्यामुळे या कोरोना योध्द्यांचा सन्मान करणे ही आपली सामाजिक बांधिलकी असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे हवेली तालुका अध्यक्ष मारुती कांबळे यांनी याप्रसंगी सांगितले.

त्या अनुषंगाने आज बुधवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त तंटामुक्त अध्यक्ष सुदाम गावडे यांच्या हस्ते कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी मेहबूब लुकडे, थेऊर उपकेंद्रातील आरोग्य अधिकारी डाॅ. पुजा सूर्यवंशी, आरोग्य सेवक प्रशांत बिराजदार, सेविका भारती सोनवणे तसेच सर्व आशा सेविकांना आरोग्य सुरक्षा पीपीई कीट भेट देण्यात आले तर ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब कांबळे, गावकामगार तलाठी दिलीप पलांडे व आरोग्य कर्मचार्यांच्या सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर मिलिंद गुरव यांचा विशेष कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी श्रीनिवास वाघ, संतोष गायकवाड, सरवर शेख, पवनकुमार गुप्ता आदी उपस्थित होते