अभिमानास्पद ! API सुभाष पुजारी ठरले ‘महाराष्ट्र मास्टर श्री’

पनवेल : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोशियनच्या वतीने आणि इंडीयन बॉडीबिल्डिंग फेडरेशनच्या मान्यतेने खारघर येथे घेतलेल्या मास्टर महाराष्ट्र श्री 2021 या शरीरसौप्ठव स्पर्धेत महामार्ग पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सुवर्णपदक पटकावला आहे. या कामगिरीमुळे पुजारी यांची 20 व 21 मार्च रोजी लुधियाना, पंजाब येथे होणा-या मास्टर भारत श्री 2021 स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

खारघर येथे शनिवारी (दि. 13) ही स्पर्धा पार पडली. शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये मेडल मिळविणारे सुभाष पुजारी हे राज्यातील पहिले पोलीस आधिकारी ठरले आहेत. नोकरी संभाळून दिवसातून किमान 5 तास व्यायाम करणारे पुजारी हे खऱ्या अर्थाने तरुणांना प्रेरणा देणारे अधिकारी ठरले आहेत. त्यांच्या या यशाबददल पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय, विनय कारगांवकर, डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक संजय बारकुंड ,शत्रुघ्न माळी आदीनी अभिनंदन केले आहे. पुजारी हे सध्या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव पटटू सुनित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत. या यशामध्ये अपर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय, चेतन पठारे तसेच वर्ल्ड बॉडीबिल्डिंग असोशियन यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे पुजारी यांनी सांगितले.