लोणीकंद पोलिसांचे डीबी (गुन्हे) पथक प्रशंसापत्राने सन्मानित

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन (कल्याण साबळे पाटील) – जिल्ह्यात घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून दोघांना लोणीकंद पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केल्याने पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रशंसापत्र देऊन सन्मानित केले.

लोणीकंद पोलिसांनी १५ दिवसापूर्वी सोलापूर येथील कुख्यात गुन्हेगार व त्याच्या साथीदारास अटक करून सुमारे ७ लाखांचा ऐवज जप्त केला होता. त्यांच्याकडून २० गुन्हे उघडकीस आणले होते. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मानकर व डी बी पथकातील पोलीस उप निरीक्षक हणमंत पडळकर, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाने, समीर पिलाणे, ऋषिकेश व्यवहारे, दत्ता काळे, मोहन अवघडे, राजेश माने, प्रफुल्ल सुतार यांच्या पथकाला प्रशंसापत्राने गौरविण्यात आले. सदर सन्मान प्रातिनिधिक स्वरूपात बाळासाहेब सकाटे, होनमाने, समीर पिलाणे यांनी स्वीकारला.

फेसबुक पेज लाईक करा