इंदापुर तालुक्यातील पोलिस पाटील यांचा सन्मान

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मार्च २०२० ते जून २०२० या कालावधीमध्ये कोरोना महामारी लाॅकडाउन काळात ग्रामीण स्तरांवर गावा गावातील पोलिस पाटील यांनी कोणतीही सुरक्षा न घेता कोरोना साथरोग निर्मूलनसाठी सहभागी होऊन केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या जबाबदा-या योग्यारित्या पार पाडल्याने पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी इंदापूर तालुक्यातील पोलिस पाटील यांना प्रशंसापत्र देऊन सन्मानित केले.

इंदापुर पोलिस ठाण्यात शुक्रवार दि २५ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता इंदापूर पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या हास्ते सदरची प्रशंसापत्र तालुक्यातील पोलीस पाटील यांना सन्मानपुर्वक देण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर म्हणाले कि कोरोना विषाणू महामारीच्या साथीचे आजार काळात लाॅकडाउन सुरू असताना ग्रामिण भागात गावा गावातील पोलिस पाटील यांनी शासनाने दिलेल्या आदेशानुसार जबाबदारी पार पाडली..

पोलिस पाटील यांनी महसूल विभाग, पोलिस आणी आरोग्य विभागाला मदत करून गावाला कोविड-१९ या विषाणचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत केली त्यांच्या या कामगीरी मुळे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पोलिस पाटील यांचे कौतुक केले तर भविष्यातहि पोलिस पाटील यांनी चांगले काम करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे अहवान पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी केले

यावेळी पोलिस उपनिरीक्षक सातव सह गोपनीय शाखेचे गणेश झरेकर ,कारकून शुभांगी खंडागळे तसेच इंदापुर पोलिस स्टेशनचे पोलिस पाटील बिना गुटाळ, पल्लवी देवकर, सोनाली बोडके, ज्योती भोसले, विजय करे, सुरेश राउत, प्रदिप नारायण पोळ, नितीन भांगे,किरण खंडागळे, आरूण कांबळे, सुरेश देवकर, पोमन भोसले, अतुल डोंगरे, सह सर्व पोलिस पाटील उपस्थितीत होते.