‘कोरोना’ महामारीत हजारो जीव वाचविणार्‍या खासगी – शासकीय डॉक्टरांचा सन्मान

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना महामारी मध्ये आपल्या जीवाची बाजी लावून कुटुंबा पासू दूर राहून रात्रण दिवस रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉ रांची दखल प्रदेश सरचिटणीस चेतनसिंह पवार यांनी घेतली असून मुरबाड शहर व तालुका तसेच कल्याण ग्रामीण तालुक्यातील खाजगी व शासकीय डॅाक्टर यांनी कोरोना महामारीच्या काळामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल राहुलजी गांधी विचारमंच ठाणे जिल्हाच्यावतीने मानपत्र देवुन सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. सदरील मानपत्राचे अनावरण मागील आठवड्यामध्ये काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व महसुलमंत्री ना. बाळासाहेब थोरात व महानंदाचे चेअरमन ना. रणजितसिंह देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

डॅाक्टरांचा सन्मान विचारमंचचे अध्यक्ष तथा प्रदेश सरचिटणीस (पर्या विभाग) चेतनसिंह पवार यांच्या शुभहस्ते तर जिल्हाध्यक्ष धनाजी बांगर, तालुकाध्यक्ष अनिल चिराटे, शहरअध्यक्ष गणेश खारे तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित पार पडला.कोरोना महामारीच्या काळामध्ये रुग्णसेवा देवुन हजारोंचे जीव वाचविण्याचे काम खाजगी – शासकीय डॅाक्टरांनी केले तसेच पुढील काळामध्ये संकटांच्या काळामध्ये अश्या पध्दतीने रुग्णसेवा घडत रहावी तसेच डॅाक्टरांच्या समस्या देखील समजुन घेतल्याचे चेतनसिंह पवार यांनी रिपोर्टर अरुण ठाकरे यांच्याशी बोलतांना सांगितले.

ग्रामीण भागामध्ये मुरबाड – कल्याण तालुक्यातील सरकारी कोविड सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र, खाजगी कोविड सेंटर, खाजगी क्लिनिक, हॅास्पिटल आदी मधील जवळपास १०० डॅाक्टरांचा सत्कार केल्याचे जिल्हाध्यक्ष धनाजी बांगर यांनी सांगितले. आमच्या सेवेची दखल घेतल्याबद्दल डॉक्टर, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राहुल गांधी विचारमंचचे आभार मानले.