प्रियकराच्या संशयामुळे आॅनर किलिंगचा प्रकार उघडकीस

मालेगाव : पाेलीसनामा ऑनलाईन- आपल्या प्रेयसीचा ह्दयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला आहे यावर विश्वास ठेवण्यास नकार देणाऱ्या १७ वर्षाच्या तरुणामुळे आॅनर किलिंगचा प्रकार उघड झाला आहे. तरुणाने संशय व्यक्त करताच नाशिक ग्रामीण पोलिसांनी धाव घेत अंत्यसंस्कार होण्याआधी मृतदेह आपल्या ताब्यात घेतला.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9e460214-d381-11e8-8731-cb6c4b441519′]

पोलिसांना काही सेकंदाचा जरी उशीर झाला असता तर त्यांच्या हातून महत्त्वाचा पुरावा निसटला असता आणि एका हत्येचा गुन्हा कधीच उघड झाला नसता. तपास केल्यानंतर पोलिसांनी तरुणीच्या वडिलांना आणि चुलत भावाला अटक केली आहे. दोघांवरही तरुणीचा गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे. मालेगावमध्ये ही आॅनर किलिंग झाली होती.

पीडित तरुणी १२ वीत शिकत होती. तरुणी तेली जातीतील होती, तर तिचा वर्गमित्र तरुण बुरुड जातीतील आहे. २०१७ पासून दोघे प्रेमसंबंधात होते. तरुणीच्या कुटुंबीयांसाठी हे फक्त आंतरजातीय प्रकरण नव्हतं, तर मुलगी इतक्या कमी वयात प्रेमात पडणे त्यांना आवडले नाही, अशी माहिती  पोलिसांनी दिली.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a8008c2f-d381-11e8-9c99-3bb095b54ddb’]

१ आॅक्टोबरला तरुणीचा वाढदिवस होता. त्यांच्या ओळखीतील एका व्यक्तीने मुलीला एका मुलासोबत मंदिरात पाहिले असल्याची माहिती दिली. यानंतर कुटुंबीयांकडून पुढील तीन तासात हत्येचा कट रचण्यात आला. संध्याकाळी मुलीच्या आईने एका दुकानातून झोपेच्या २० गोळ्या विकत घेतल्या.

मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आपण आणि आपली पत्नी गेल्या वर्षभरापासून तिला मुलाला न भेटू नको असे सांगत होतो. आपली समाजात बदनामी होईल अशी भीती आम्हाला वाटत होती.
[amazon_link asins=’B079Q64PW6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6732c62b-d382-11e8-815d-efed6cc9ea1e’]

१ आॅक्टोबरला कुटुंबीयांनी मुलगी घरी येण्याची वाट पाहिली. मुलगी घरी आल्यानंतर वाढदिवस साजरा करण्याचा बहाणा करत त्यांनी रेस्टॉरंटमधून जेवण मागवले़ कुटुंबीयांनी तिच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि झोपी जाण्याची वाट पाहिली. रात्री साडेनऊ वाजता त्यांनी मुलीच्या चुलत भावाला बोलावले़ मुलीच्या वडिलांनी तिचे पाय धरले होते तर आईने आणि चुलत भावाने गळा दाबत तिची हत्या केली.
[amazon_link asins=’B0796QP4LS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’addc7bd9-d381-11e8-91a1-e99e9a4b2a76′]

मुलीच्या आईवडिलांनी मध्यरात्री दीड वाजता रिक्षातून मृतदेह रुग्णालयात नेला. मात्र रुग्णालयात त्यांना खासगी रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले. खासगी रुग्णालयानेही त्यांना मालेगाव सिव्हील रुग्णालयात जाण्यास सांगितले़ अखेर प्रकरण पोलिसांपर्यंत जाईल या भीतीने आई-वडिलांनी नातेवाईकांना बोलावून ह्दयविकाराचा झटका आल्याने मुलीचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली.

तरुणीच्या प्रियकराने सांगितल्यानुसार, जेव्हा मला तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली तेव्हा धक्काच बसला.तिचा मृत्यू ह्दयविकाराच्या झटक्याने झाला नसल्याची माझी खात्री होती. २ आॅक्टोबरला सकाळी साडेदहा वाजता तरुणाने पोलिसांना फोन करुन संशय व्यक्त केला. पोलीस पोहोचले असता मृतदेहावर अंत्यसंस्काराची तयारी सुरु होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता नातेवाईकांनी विरोध केला. मात्र अखेर पोलिसांना यश मिळाले. शवविच्छेदन अहवालात मुलीचा मृत्यू गळा दाबल्याने झाला असल्याचे निष्पन्न झाले.