विषारी दारूने घेतला १०९ जणांचा बळी

हरिद्वार : वृत्तसंस्था – विषारी दारूने उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या तीन राज्यात थैमान घातले आहे. विषारी दारू पिऊन आतापर्यंत १०९ जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

हरिद्वारच्या बालूपूरमध्ये हे सर्व दारू प्यायले होते. मृत व्यक्ती हे बालूपूर आणि सहारनपूर या ठिकाणचे रहिवासी आहेत. गुरुवारी बालूपूर येथून दारू पिऊन परतल्यानंतर आजारी पडले. शुक्रवारी हरिद्वारमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला तर सहारनपूरमध्ये १८ जणांचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारपर्यंत मृतांचा आकडा वाढून ७० वर पोहोचला होता. परंतु, रविवारी हा आकडा १०९ वर पोहोचला आहे. मृत व्यक्ती हे बालूपूर आणि सहारनपूर या ठिकाणचे रहिवासी आहेत.

उत्तर प्रदेश सरकार आणि प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अवैधरित्या दारु विकणाऱ्यांविरोधात १५ दिवसांची कडक मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. सहारनपूरमध्ये आतापर्यंत ३९ जणांना अटक केली आहे. तर ३५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत २९७ गुन्हे दाखल झाले असून १७५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच सहारनपूरमधील १० पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.