‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या ‘गोगी’वर गुंडांचा हल्ला, दिली जीवे मारण्याची धमकी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत ‘गोगी’ची भूमिका साकारणारा अभिनेता समय शहा याच्यावर गुंडानी हल्ला केला आहे. हा हल्ला समयच्या राहत असलेल्या इमारतीच्या आवरत करण्यात आला आहे. याप्रकरणी त्याने बोरीवली पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, यापूर्वी देखील दोन वेळा समयवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्याच्या आईने सांगितल्यानुसार काही गुंड इमारतीच्या आवारात घुसले, त्यांनी समयवर हल्ला केला. त्याबाबत जाब विचारला असता गुंडानी अश्लील शब्दांत त्यांना सुद्धा शिवीगाळ केली. ही घटना शुटिंगवरुन परत आल्यावर ८.३० च्या दरम्यान घडली आहे.

मागील अनेक दिवसांपासून समयला जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. समयच्या घराजवळ येऊन एक गुंड सातत्याने समयबद्दल विचारत असे. कधी कधी गुंडांची टोळकी येऊन इमारतीच्या आवारात उभी राहून शिवीगाळ करत असे. हे लोक कोण आहेत याची समयला माहिती नाही. दरम्यान, इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आहे.

You might also like