Hoote | रजनीकांतने लाँच केले सोशल मीडिया अ‍ॅप Hoote, जाणून घ्या काय करू शकता तुम्ही?

नवी दिल्ली : सुपरस्टार रजनीकांत (Superstar Rajinikanth) ने आपल्या मुलीचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Hoote लाँच केला आहे. या व्हॉईस आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये रजनीकांतची मुलगी सौंदर्या (Rajinikanth’s daughter Soundarya) सहसंस्थापक आणि सोबत अम्टेक्स (Amtex) चे सीईओ सनी पोकाला (CEO Sunny Pokala) आहेत. हे लाँच केल्यानंतर रजनीकांतने ट्विट केले की, Hoote – Voice based social media platform, from India for the world.

Hoote प्लॅटफार्मवर तुम्ही 60 सेकंदाचे लाईव्ह व्हॉईस रेकॉर्डिंग अपलोड करू शकता. तसेच अगोदर रेकॉर्ड केलेला व्हॉईस अपलोड करू शकता. सोमवारी दिल्लीत दादासाहेब फाळके अवॉर्ड घेतल्यानंतर सुपरस्टार रजनीकांत यांनी म्हटले की, हे अ‍ॅप लाँच केल्याने खुप आनंदी आहे.

रजनीकांत यांनी म्हटले की, लोक आता आपले विचार आणि शुभेच्छा आपल्या आवाजाद्वारे व्यक्त करू शकतील. अगदी तसेच ज्याप्रकारे आपल्या आवडीच्या भाषेत लिहिता. रजनीकांत यांची मुलगी सौंदयाने एनडीटीव्हीला सांगितले की, सोशल मीडिया फ्यूचर व्हॉईस आहे आणि माझा यावर खुप विश्वास आहे. Hoote वर लोक आपले विचार आणि भावना कोणत्याही वेळी कुठूनही कोणत्याही भाषेत व्यक्त करू शकतील.

Crime Branch Police | कपडे खरेदीसाठी व्यापाऱ्याकडून उकळली खंडणी, गुन्हे शाखेतील पोलिसावर FIR

काय आहे Hoote अ‍ॅपमध्ये

– तामिळ, हिंदी, तेलगु, मराठी, मल्याळम, कन्नड़, बंगाली, गुजरातीसह दोन परदेशी भाषा.

– यूजर्स केवळ बोलून मेसेज पाठवतील. हे व्हॉईस नोट अ‍ॅप आहे.

– व्हॉईस नोट केल्यानंतर म्यूझिक आणि छायाचित्रे सुद्धा जोडू शकतात.

– गुगल प्ले-स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे.

– वापरण्यापूर्वी रजिस्ट्रेशन करावे लागेल. अ‍ॅपमध्ये यूजर्स रजनीकांत, गौतम गंभीर, न्यूज चॅनल, राजकीय नेते, इ. सेलिब्रेटींना फॉलो करू शकतील.

– प्ले आणि पॉझची सोपी पद्धत.

– लाईक, रि-पोस्ट आणि रि-शेयराचा पर्याय.

– कमाल 60 सेकंदाची व्हॉईस नोट रेकॉर्ड करू शकता.

– व्हॉईस रेकॉर्डिंगनंतर कॅपशन, बॅकग्राऊंड म्युझिक आणि इमेजचा समावेश करू शकता.

– म्युझिकसाठी इमोशन, इन्व्हायरमेंटल, नेचर, रिलीजनल आणि नेटिव्हसारखे पर्याय मिळतील.

– कमेंट बंद करण्याचा पर्याय आहे.

– कॅपशनसाठी कमाल 120 शब्दांची मर्यादा.

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील बिबवेवाडीमध्ये 14 वर्षाच्या मुलीचा खून झाल्यानंतर कुटुंबियांनी गृहमंत्र्यांकडे केली ‘ही’ मोठी मागणी

18 Carat Gold | 18 कॅरेट सोन्यात केवळ 75% असते शुद्धता, जाणून घ्या कोणते असते सर्वाधिक चांगले आणि खरेदीच्यावेळी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Hoote | rajinikanth launches voice based social app hoote

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update