Coronavirus : चीनकडून अपेक्षाभंग ! पहिल्याच परिक्षणात अयशस्वी झालं ‘कोरोना’ व्हारयरसवरील ‘औषध’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना व्हायरसच्या औषधासंदर्भात अनेक प्रयोग व चाचण्या केल्या जात आहेत. हे पाहता गेल्या काही दिवसांपासून कोरोनामधील रुग्णांवर अँटीव्हायरल रेमेडीसीवर औषधाचा वापर केला जात होता. दरम्यान माहितीनुसार, हे औषध त्याच्या पहिल्या रेंडमाइज्ड क्लिनिकल ट्रायलमध्ये अयशस्वी झाली आहे. यापूर्वी अशी आशा व्यक्त केली जात होती की कोविड -१९ च्या उपचारात रेमेडीसीवर कार्यक्षम असल्याचे सिद्ध होईल, परंतु चिनी चाचणीत औषध यशस्वी झाले नाही. चीनमधील या अयशस्वी चाचणीचे ड्राफ्ट डॉक्युमेंट जागतिक आरोग्य संघटनेने अचानक प्रकाशित केले आहेत. त्यानुसार या औषधाने रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा केली नाही किंवा रुग्णाच्या रक्तातील सूक्ष्मजंतूंना कमी केले नाही. या अहवालाने लोकांच्या अपेक्षांना धक्का बसला आहे. तसेच, अमेरिकेच्या बायोटेक कंपनी गिलियड सायन्सेसने हा अभ्यास नाकारला आहे.

काय आहे या अभ्यासात ?
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या क्लिनिकल ट्रायल डेटाबेसवरील रेमेडीसीवर औषधाच्या अयशस्वी चाचणीशी संबंधित ही बातमी पटकन पसरली. दरम्यान, हे पोस्ट लवकरच काढून टाकले गेले. त्याचबरोबर डब्ल्यूएचओनेही मसुदा अहवाल चुकून अपलोड केल्याची पुष्टी केली आहे. या मसुद्यानुसार, संशोधकांनी २३७ रुग्णांचा अभ्यास केला. यापैकी १५८ रूग्णांना रेमेडीसीवर औषध दिले गेले आणि त्यांची प्रगती प्लेसबो देण्यात आलेल्या ७९ रुग्णांशी केली गेली. एका महिन्यानंतर, प्लेसबो घेणाऱ्या १२.८ टक्के लोकांच्या तुलनेत रेमेडीसीवर औषध घेतलेल्या १३.९ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. या औषधाच्या दुष्परिणामांमुळे लवकरच त्याचे परीक्षण थांबविले गेले. अभ्यासानुसार, रेमेडीसीवर औषध क्लिनिकल किंवा व्हायरलॉजिकल फायद्याशी संबंधित नाही.

गिलियड कंपनीने डब्ल्यूएचओची ही पोस्ट नाकारली आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आम्हाला वाटते की हा अभ्यास अयोग्य पद्धतीने करण्यात आला आहे.” हे आकडेवारीनुसार योग्य नव्हते आणि ते लवकरच डिसमिस केले गेले. ते म्हणाले, ‘या अभ्यासाचे निर्णायक निकाल अजून येणे बाकी आहेत. आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की कोरोना रूग्णांमध्ये ज्यांना उपचारात रेमेडीसीवर देण्यात आले होते, त्याचे फायदे अधिक दर्शवित आहेत. दरम्यान, रेमेडीसीवर औषध इबोलाच्या उपचारात वापरले जात होते.

याआधी शिकागो मेडिसिन विद्यापीठाच्या संशोधकांनी असेही म्हटले की, कोविड- १९ च्या १२५ रुग्णांना रेमेडीसीवर औषध दिल्यानंतर त्यांच्या आरोग्यामध्ये वेगवान सुधारणा झाली आहे. त्याच वेळी, गिलियड सायन्सेस कडून रेमेडीसीवर औषधाची क्लिनिकल चाचण्या देखील चालू आहेत आणि ती प्राथमिक स्वरूपात वापरली जात आहे. गिलाडेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल ओडे म्हणाले की, ” रेमेडीसीवरने अद्याप उपचार चालू ठेवलेले आहेत आणि सध्या जगात कोठेही त्याला वापरायला मान्यता मिळालेली नाही.” हे औषध खूपच सुरक्षित आणि प्रभावी आहे हे शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे औषध विविध संदर्भात कसे कार्य करते हे शोधण्यासाठी जगभरात अनेक क्लिनिकल चाचण्या घेतल्या जात आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, एक चाचणी गंभीर कोरोना संक्रमण झालेल्या रूग्णांसाठी आहे आणि दुसरी ही सामान्य लक्षणे असलेल्या रूग्णांसाठी आहे. जर ती तीन-टप्प्यातील चाचणीत यशस्वी झाली तर ती वापरण्यासाठी दहा लाख डोस देऊ शकेल.

कोरोनो व्हायरसवर प्रामाणिक औषधे अद्याप बनलेली नाहीत. जगभरात, या साथीने आजारी मरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत, कोविड -१९ संसर्गाच्या उपचारात रेमेडीसीवर खूप प्रभावी मानले जात असे. तसेच, शिकागो विद्यापीठात कोविड -१९ च्या १२५ रूग्णांवर दोन-चरणात ३ क्लिकल चाचण्या झाल्या. गिलियडद्वारे हे परीक्षण केले गेले. यापैकी ११३ रुग्णांना कोरोनाची तीव्र लक्षणे होती. या चाचणीची व्हिडिओ रेकॉर्डिंगदेखील आहे. या व्हिडिओमध्ये शिकागो विद्यापीठाचे सदस्य आपापसात चर्चा करताना दिसले आहेत, ज्यात एका डॉक्टरांनी सांगितले आहे की काही लोकांना औषध रेमेडीसीवर घेतल्यानंतर ताप कमी झाला आहे तर काहींना व्हेंटिलेटरमधून काढून टाकले गेले आहे.

काही दिवसांपूर्वी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) असेही म्हटले आहे की, ते कोरोना व्हायरस रूग्णांच्या उपचारासाठी औषध रेमेडीसीवर वापरण्यावर विचार करेल. दरम्यान, जेव्हा स्थानिक कंपन्या हे औषध तयार केरेल, तेव्हाच हा निर्णय शक्य होईल. आयसीएमआरचे मुख्य शास्त्रज्ञ रमण गंगाखेडकर म्हणाले की, ‘एका अभ्यासाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, हे औषध प्रभावी आहे. आम्ही डब्ल्यूएचओच्या निकालांची प्रतीक्षा करू आणि काही कंपन्या यावर पुढील कार्य करू शकतील का हे देखील पाहू. ‘