महिलांचं वजन ’या’ 5 हार्मोन्समुळे वाढू शकतं, अशी घ्या काळजी

महिलांमध्ये मासिक पाळी, गरोदरपणा यामुळे हार्मोन्सचं संतुलन बिघडल्याने त्यांना वजन (weight) वाढण्याची समस्या त्रासदायक ठरू शकते. महत्वाचं म्हणजे अशा स्थितीत महिलांनी वजन (weight ) कमी करण्यासाठी कितीही व्यायाम किंवा डाएट केलं तरी कसालच फरक दिसून येत नाही. कारण ही समस्या हार्मोन्समुळे निर्माण झालेली असते. हे हार्मोन्स कोणते आणि ते नियंत्रित ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी ते जाणून घेवूयात.

हर्मोन्स आणि उपाय

1 कोर्टिसोल
हा स्टोरॉईड हार्मोन असून या हार्मोनची लेव्हल वाढल्यानंतर भूक लागणं, वजन वाढणं अशा समस्या होतात. यासाठी रोज व्यायाम, योगा करा.

2 प्रोजेस्टेरॉन
हे हार्मोन्स नियंत्रित ठेवल्यास वजन कमी करू शकता. कारण शरीरातील प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजन हे हार्मोन्स व्यवस्थित असणे गरजेचं आहे. ताण-तणाव, मेनोपॉज, अन्हेल्दी आहार यामुळे प्रोजेस्टेरॉन ची लेवल कमी होते. यासाठी तणावमुक्त जगा, हेल्दी आहार घ्या.

3 टेस्टोस्टेरॉन
महिलांमध्ये टेस्टोस्टोरॉनचं उत्पादन कमी प्रमाणात होत असतं. शिवाय, वाढत्या वयात ताण-तणाव वाढल्याने या हार्मोनची लेव्हल कमी होऊ शकते. अशावेळी वजन वाढतं. यावर उपाय म्हणून रोज व्यायाम करा. हेल्दी आहार घ्या. फॅट बर्न, मजबूत हाडे, कामेच्छा वाढवणे, यासाठी हे महत्वाचे असते.

4 इंसुलिन
इंसुलिन शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये ग्लोकोज टाकण्यासाठी उपयोगी असतं. याचा वापर एनर्जीच्या स्वरुपात केला जातो. रक्तातील इंसुलिनचा स्तर वाढून वजन वाढत असेल तर डायबिटिस टाईप-2 या आजाराचा धोका असू शकतो. त्यासाठी साखर, मद्य आणि अनहेल्दी पदार्थांचे सेवन टाळावे.

5 थाईरॉईड
थायरॉईड ग्रंथी शरिरातील टी 3, टी 4 आणि कॅल्सीटोनिन या तीन हार्मोन्सना प्रभावीत करते. मेटाबॉलिज्म, झोप, वाढ आणि हार्ट रेट, यांना नियंत्रण करण्याचे काम हे हार्मोन करते. हे अनियंत्रित झाल्यास थकवा, वजन वाढणे, या समस्या होतात.