Horoscope-2022 | शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा कुंभ राशीवर?, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Horoscope-2022 | वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी (Horoscope-2022) बदलतो तेव्हा त्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो. 2022 मध्ये अनेक ग्रह राशी बदलतील. ग्रह राशीतील बदलांचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. 2022 मधील एप्रिलमध्ये शनिदेव (Shanidev) दुस-या राशीत प्रवेश करणार आहेत. 29 एप्रिल रोजी शनिदेव कुंभ राशीत (Aquarius) प्रवेश करतील. कुंभ राशीच्या लोकांवर शनीच्या गोचराचा सर्वाधिक प्रभाव राहील. तसेच, मकर, मीन, कर्क आणि वृश्चिक राशींवरही परिणाम होणार आहे.

 

कुंभ राशीमध्ये शनीचे संक्रमण होताच कुंभ राशीच्या लोकांवर शनीची साडेसातीची दुसरी अवस्था सुरू होणार आहे. ज्योतिष शास्त्रात शनि सतीची दुसरी अवस्था सर्वात त्रासदायक मानली जाते आहे. या काळामध्ये व्यक्तीला आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. (Horoscope-2022)

 

दरम्यान, शनि (Shani Dev) सतीच्या दुसऱ्या चरणात धनहानी होण्याची शक्यता सतत असते. तसेच, या काळामध्ये नजदीकच्या व्यक्तीकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. अपघातात जखमी होण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात जास्त मेहनत करावी लागू शकणार आह. एकूणच शनि सतीचा दुसरा टप्पा क्लेशदायक ठरतो. परंतु, कुंडलीमध्ये शनीची स्थिती चांगली असल्याने त्रास थोडा कमी होऊ शकणार आहे.

 

‘या’ राशींवरही होणार परिणाम –

शनीच्या गोचरमुळे मकर राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा दुसरा चरण सुरू होईल.
मीन राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा पहिला चरण सुरू होईल.
कर्क आणि वृश्चिक राशीपासून शनिच्या साडेसातीची सुरुवात होईल.

 

Advt.

टीप – वरील माहिती लोक श्रध्देवर आधारित आहे. यावरून आम्ही कुठलाही दावा करत नाहीत.

 

Web Title :-  Horoscope-2022 | the second phase of saturn s sadesati is going to start on aquarius

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus Cases Today In India | देशात अनियंत्रित कोरोना केसमध्ये 56% प्रचंड वाढ, गेल्या 24 तासात 90928 केस; ओमिक्रॉनचा आकडा 2630

 

Gold Silver Price Today | आजही सोन्या-चांदीचे दर कमी; जाणून घ्या 10 ग्रॅमचा दर