Horoscope | ‘या’ राशीत प्रवास योग तर ‘या’ व्यक्तींसाठी त्रासदायक दिवस; पाहा तुमचं आजचं राशिभविष्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Horoscope | दररोजच्या जीवनामध्ये अनेकजण राशी भविष्य (Horoscope) पाहत असतात. या दरम्यान, आज (शनिवार) 26 मार्च 2022, फाल्गुन कृष्ण नवमी. आज चंद्र धनु राशीतून भ्रमण करेल. दरम्यान आजच्या बारा राशींचे भविष्य काय आहे. आणि ‘कोणत्या राशींसाठी उत्तम त्याचबरोबर कोणत्या राशींच्या व्यक्तीसाठी त्रास करणारा आहे आजचा दिवस. ते जाणून घ्या.

 

1. मेष – (Aries)
आजचा संथ आणि साधा दिवस आहे. मन शांत राहील. भाग्य चंद्र आहे. ईश्वरी उपासना बळ आणि यश देईल. आर्थिक स्थिती ठिक राहिल. कार्यक्षेत्रात विशेष लक्ष द्यावं लागेल. दिवस चांगला आहे.

2. वृषभ – (Taurus)
आजच्या दिवशी चंद्र धनु राशीतून भ्रमण करत आहे. मन थोडे निराश होण्याचे संकेत आहेत. काळजी घ्या. मंगळ शनी धार्मिक आस्था वाढेल असं सुचवत आहेत. दिवस बरा आहे.

3. मिथुन – (Gemini)
आजच्या दिवशी शरीर शिथील वाटेल. जास्त दगदग टाळा. नको असलेली काम गळ्यात येतील. मानसिक ताण येईल. आर्थिक बाजू सांभाळा. दिवस मध्यम असणार आहे.

4. कर्क – (Cancer)
आज भक्तिमय वातावरणात दिवस मंगलमय होईल. वाचन मनन कराल. संततीसुख मिळेल. धार्मिक कार्यक्रम किंवा पूजेत सहभागी व्हाल. दिवस उत्तम राहील.

5. सिंह – (Leo)
आज तुमच्यापुढे कामाचा डोंगर असेल. जास्त ताण न घेता आलेली जबाबदारी पार पाडाल. पितृ सुख मिळेल. दिवस आनंदात पर पडेल.

6. कन्या – (Virgo)
तुमच्यापुढे आज प्रवास, भेटीगाठी कार्यक्रमात सहभाग असे भरपूर पर्याय असतील. भाग्य साथ देईल. तुम्ही योग्य निर्णय घ्याल. भावंडं भेट होईल. दिवस आनंदी आहे.

7. तूळ – (Libra)
आज दिवस चंद्र आणि राहू मुळे त्रासदायक आहे. घरात तंग वातावरण राहिल. प्रकृती देखील जरा नरम गरम राहिल. दिवस मध्यम आहे.

8. वृश्चिक – (Scorpio)
आज राशीच्या द्वितीय स्थानात चंद्र तणाव मुक्त करेल. धार्मिक कार्यात मन गुंतून राहील. आर्थिक लाभ होतील. वैवाहिक सुख मिळेल. दिवस चांगला आहे.

9. धनु – (Sagittarius)
आज राशीतील चंद्र आर्थिक आणि शारीरिक ताण देईल. जपून रहा.राशीच्या द्वितीयात मंगळ, शनी आहे. क्लेश होतील. दिवस उपासनेत घालवा.

10. मकर – (Capricorn)
आज दिवस त्रासदायक असून तुमच्यासाठी अनेक कटकटी घेऊन येईल. राशीतील शनी मंगळ प्रवास योग आणेल. आईवडिलांची भेट होईल. आर्थिक बाजू सांभाळून राहा. दिवस उत्तम राहील.

11. कुंभ – (Aquarius)
आज दिवस कार्यक्षेत्रात काही विशेष घडामोडींचा आहे. यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. दूरचे प्रवास योग येतील. दिवस उत्तम आहे.

12. मीन – (Pisces)
आज भाग्यदायी आणि आनंदी दिवस आहे. सगळीकडून सुसंधी, लाभ, प्रवास, भेटीगाठी यात दिवस आनंदात निघून जाईल.

Web Title :-  Horoscope | rashifal rashicharka zodiac moon sign today horoscope 26 march 2022 marathi rashibhavishya

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा