1 एप्रिल राशीफळ : ‘या’ 4 राशीवाल्यांसाठी प्रगतीचे योग, आनंद लुटाल; इतरांसाठी असा आहे गुरुवार

मेष
आजचा दिवस उत्तम लाभदायक आहे. दाम्पत्य जीवनात मधुरता कायम राहील, जोडीदार सुद्धा प्रसन्न दिसेल. नोकरी करणार्‍या जातकांनी रागावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा वरिष्ठ अधिकार्‍यांशी वाद होऊ शकतो, ज्यामुळे नुकसान होईल. सामाजिक कार्यात रुची वाढेल. जुनी रखडलेली कामे करावी लागतील, तरच यश मिळेल.

वृषभ
आजचा दिवस संमिश्र आहे. सरकारी नोकरीत सर्व कामे इमानदारीने करावी लागतील, अन्यथा अधिकार्‍यांच्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो, यासाठी सावध रहा. कुटुंबात भाऊ-बहिणीकडून प्रेम मिळेल. कुटुंबात एखादा मंगलसोहळा होऊ शकतो, ज्यामध्ये कुटुंबातील लोक व्यस्त दिसतील. व्यापारात जास्त मेहनत आवश्यक आहे, तरच व्यापाराला गती मिळेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल.

मिथुन
आजचा दिवस नोकरीशी संबंधीत जातकांसाठी ठोस परिणाम घेऊन येईल, नोकरीत प्रमोशन मिळण्याचे योग आहेत, यासाठी अधिकार्‍यांशी बोलताना वाणी मधुर ठेवा. कुटुंबात काही वाद उत्पन्न होऊ शकतात, परंतु अस्वस्थ होऊ नका. सायंकाळी वडीलांच्या सल्ल्याने वाद संपेल. सासरच्या बाजूकडून सन्मान मिळेल. जोडीदारासाठी एखादी भेट खरेदी करू शकता.

कर्क
आजचा दिवस व्यस्ततेचा आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. व्यापारात नवनवीन रणनितीवर काम कराल, ज्यामध्ये धावपळ जास्त होईल. नोकरीत चांगले वातावरण राहील. व्यस्तता असूनही आपल्या जीवनासाठी वेळ काढण्यात यशस्वी व्हाल. जर एखादी गुंतवणूक करायची असेल तर दिवस उत्तम आहे. संततीला आज एखादी भेट देऊ शकता.

सिंह
विद्यार्थ्यांसाठी दिवस तणावाचा आहे. परीक्षेच्या तयारीत काही अडचणी येऊ शकतात. भाऊ-बहिणीच्या काही समस्यांवर मार्ग काढावा लागेल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो, परंतु आर्थिक स्थितीकडे लक्ष ठेवा, नंतर खर्च करा. जर एखादे कर्ज घ्यावे लागले तर ते टाळा, कारण परतफेड अवघड होईल. प्रेमसंबंधात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, यासाठी सावध राहा.

कन्या
आज सामाजिक प्रतिमा वाढेल, ज्यामुळे लोक तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील. कुटुंबात आज एखादा मुद्दा डोकं वर काढू शकतो. एखाद्या संपत्तीच्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर सर्व बाजू तपासून घ्या. आज व्यापारात अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. आज तीच कामे करण्याचा प्रयत्न करा, ज्यामध्ये यश मिळण्याची आशा आहे. संततीवर आज एखादे काम सोपवाल.

तुळ
आजचा दिवस संमिश्र आहे. जर संततीच्या विवाहासंबंधी काही तणाव असेल तर तो आज संपेल. आई-वडीलांच्या आरोग्याबाबत सतर्क राहा कारण त्यांचा जुना आजार त्रास देऊ शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धेत चांगले गुण मिळतील. जोडीदाराशी आज छोटे-मोठे वाद होतील. जर ते नाराज असतील तर त्यांना समजावण्याचा प्रयत्न करा. आर्थिक लाभ होईल, परंतु कुणालाही कर्ज देणे टाळा, कारण पैसे परत मिळण्यात अडचण येईल.

वृश्चिक
आजचा दिवस उत्तम लाभदायक आहे. सासरच्या बाजूकडून सहकार्य मिळेल. नोकरीत यश मिळेल. धार्मिक कार्यांमुळे पद आणि प्रतिष्ठा वाढेल. कार्यक्षेत्रात काही विशेष करून दाखवण्याच्या प्रयत्नात दिवस व्यतीत होईल. अधिकारी वर्गाशी संबंध चांगले राहतील. सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही लोकांची भेट घ्यावी लागेल. सायंकाळचा वेळ एखाद्या विवाह सोहळ्यात किंवा अन्य मंगल कार्यक्रमात घालवाल.

धनु
आज व्यवसायात डोळे आणि कान दोन्ही उघडे ठेवून काम करा. कारण काही विरोधक काम बिघडवण्याचा प्रयत्न करतील, यासाठी आळस दूर सारून कामाला लागा. जर भागीदारीत व्यापार करण्याचा विचार करत असाल त्यासाठी दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधासाठी वेळ काढाल आणि जोडीदाराला कुठेतरी फिरायला घेऊन जाल. विद्यार्थ्यांना आज शिक्षकांचा आशीर्वाद प्राप्त होईल. संततीला धर्मकार्यात कार्यरत पाहून मनाला समाधान मिळेल.

मकर
आजचा दिवस प्रतिकुल स्थितीत निर्णय घेण्याच्या क्षमतेला सहायक ठरेल, जी भविष्याच्या योजना देखील मजबूत करेल. कार्यक्षेत्रात सर्व कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील, अन्यथा अधिकारी वर्गाशी वाद होऊ शकतो. परदेशात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या जातकांना आज परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. सायंकाळी आरोग्यात थोडी घसरण होऊ शकते, यासाठी सतर्क राहा.

कुंभ
आजचा दिवस संमिश्र आहे. सरकारी नोकरीत बदलीची ऑर्डर मिळू शकते. प्रेमसंबंधात मधुरता कायम राहील आणि जोडीदाराला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता. विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल. जर कुठे पार्ट टाइम काम करण्याचा विचार करत असाल तर त्यामध्ये यश मिळेल. घरासाठी आवश्यक काही वस्तू खरेदी करू शकता.

मीन
आज संमिश्र परिणामांचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना एखाद्या स्पर्धेत यश मिळू शकते, ज्यामुळे त्यांना आनंद होईल आणि भविष्याचा मार्ग खुला होईल. कार्यक्षेत्रात मित्राच्या रूपात मिळालेल्या शत्रुंपासून सावध राहावे लागेल, अन्यथा ते तुमचे नुकसान करू शकतात. राजकीय क्षेत्रात नाव होईल, परंतु शत्रु प्रबळ राहतील. एखाद्या महिला मित्राची भेट चांगली ठरेल, ज्यामुळे तुमचे अर्धवट काम पूर्ण होण्यास मदत होईल.