1 डिसेंबर राशिफळ : डिसेंबर ‘महिन्याचा पहिला दिवस’ कोणत्या राशींसाठी असेल ‘भाग्यशाली’, जाणून घ्या

मेष
आजचा दिवस सामान्य परिणाम देईल. खर्च होईल, कुटुंबात महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होईल. कामासाठी दिवस चांगला आहे. प्रयत्न यशस्वी होतील. वैयक्तिक जीवनात प्रेम राहील. जोडीदारासोबतचे संबंध सुंदर राहतील. ते व्यापरात चांगली मदत करू शकतात. सासरकडील कुणाची तरी तब्येत बिघडू शकते. प्रेमसंबंधात चढ-उतार असतील.

वृषभ
मनात अस्वस्थता आणि संभ्रमाची भावना आज दुपार नंतर संपेल. कुटुंबातील छोट्या सदस्यांचा पाठिंबा मिळेल आणि एखाद्या प्रेमाच्याया बाबतीत देखील मदत करतील. कौटुंबिक जीवन ठीक राहील. आईला एखादी शारीरिक समस्या त्रास देऊ शकते. भाग्य प्रबळ असल्याने कामात अडथळा येणार नाही. जोडीदाराची तब्येत बिघडू शकते. प्रेमसंबंधात आनंद मिळेल.

मिथुन
आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. दुपारपर्यंत जास्त खर्च होईल, दुपारनंतर तो किंचित कमी होईल. विरोधकांपासून सावध रहा. त्यांच्यामुळे सुद्धा काही खर्च होऊ शकतात आणि ते त्रास देण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत. नोकरीत प्रयत्न यश देतील. धार्मिक कार्यात मन लागेल. वैयक्तिक आयुष्यात थोडा त्रास होईल. सासरच्या लोकांकडून सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधात रोमान्स वाढेल. संततीकडून सूख मिळेल.

कर्क
आजचे दिनमान मध्यम राहील. दुपारपर्यंत, आर्थिक परिस्थिती चांगली होईल आणि उत्पन्न कायम राहील. परंतु दुपारनंतर खर्च वाढेल, जो लक्ष लक्ष वेधून घेईल. मानसिक ताण वाढू शकतो. यामुळे आरोग्य कमजोर होऊ शकते. हवामानातील बदलांमुळे सर्दी किंवा ताप होऊ शकते. वैयक्तिक जीवन सुखी राहील. जोडीदार पूर्णपणे साथ देईल. प्रेमसंबंधात विरोधाचा सामना करावा लागू शकतो. कामात लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

सिंह
आजचा दिवस उत्तम आहे. कामात पूर्ण लक्ष लागेल, ज्यामुळे समस्या दूर होतील. कार्यक्षेत्रात उत्तम यश मिळेल. दिलेली कामे वेळेत पूर्ण कराल. उत्पन्न वाढेल. कौटुंबिक जीवनात थोडा तणाव असेल. कुटुंबात ज्येष्ठांचे आरोग्य बिघडल्याने चिंता राहील. मित्रांसोबत चांगली चर्चा होईल. वैयक्तिक जीवन सुखी राहील. जोडीदारासाठी काहीतरी खर्च कराल. प्रेमसंबंधात समाधान राहील आणि प्रिय व्यक्तीशी संबंध प्रबळ राहतील.

कन्या
आजचे दिनमान चांगले आहे. जेवढी मेहनत कराल, तेवढेच फळ मिळेल. दूरच्या प्रवासाला जाऊ शकतो. तीर्थयात्रा करण्याची शक्यता आहे. जोडीदार रागात राहील, म्हणून काळजीपूर्वक बोला. कोणताही वाद होणार नाही याची काळजी घ्या. प्रेमसंबंधात सामंजस्याने पुढे जाल. आरोग्यात चढ-उतार राहील. सहकारी कर्मचार्‍यांकडून चांगल्या वर्तनाची आवश्यकता असेल.

तुळ
आजचा दिवस चांगला आहे. पण दुपारपर्यंत एखादी चिंता त्रास देऊ शकते. खर्चही वाढेल. अनावश्यक आर्थिक आव्हाने त्रास देतील. सासरच्या लोकांशी संबंध बिघडू शकतात, पण दुपारनंतर फरक पडेल. कामासाठी कुठेतरी प्रवास करावा लागू शकतो. विरोधकांवर पकड मजबूत असेल. घरातील वातावरण समाधान देईल. प्रेमसंबंधातील तणाव दूर होईल आणि प्रिय व्यक्तीशी संबंध सुधारतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

वृश्चिक
आजचे दिनमान मध्यम असेल. तणाव जाणवेल. यामुळे व्यवसायात व्यत्यय येऊ शकतो. नोकरदार लोकांना कामाकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. जेणेकरून कामात कोणतीही गडबड होणार नाही. खर्चातील वाढ त्रास देऊ शकते. उत्पन्न सामान्य राहील. कौटुंबिक जीवन समाधानकारक राहील. वैयक्तिक जीवनात तणाव वाढू शकतो. जोडीदार अशा काही गोष्टी बोलेल ज्या तुमच्या समजण्याच्या पलिकडील असतील, आणि गैरसमज निर्माण होऊ शकतो. कोणत्याही गोष्टीवरून अहंकारात राहू शकता, जे योग्य नाही. प्रेम जीवनात वाद होऊ शकतो.

धनु
आजचे दिनमान मध्यम आहे. दिवसाच्या सुरुवातीपासूनच मानसिक ताण आणि खर्च सुरू होईल. परंतु दुपारपर्यंत हळूहळू नियंत्रणात येईल. दिवस व्यापरासाठी चांगला आहे. दुर्गम भाग आणि राज्याशीसंबधीत कामात फायदा होईल. कुटुंबातील एखाद्या मालमत्तेबद्दल चर्चा होऊ शकते. उत्पन्न चांगले मिळेल. प्रेमसंबंधात रोमान्स वाढेल. प्रिय व्यक्तीबरोबर प्रवास किंवा रात्रीच्या जेवणाची योजना आखू शकता. वैयक्तिक आयुष्यात आनंद असेल. जोडीदाराची एखादी इच्छा पूर्ण कराल.

मकर
आजचा दिवस चांगला आहे. बुद्धिमत्ता विकसित होईल. एखादा नवीन निर्णय घ्या, जो महत्त्वपूर्ण असेल. कामासाठी दिवस चांगला आहे. कामाकडे लक्ष द्या, इकडे-तिकडे लक्ष घालू नका, अन्यथा समस्या उद्भवू शकते. वरिष्ठांचे तुमच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. उणीव पकडण्याचा प्रयत्न होईल, म्हणून सावध रहा. धैर्यामुळे कामात यश मिळेल. वैयक्तिक जीवन शांततामय राहील. जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. प्रेमसंबंधात चढ-उतार येतील. गैरसमजाचा नात्यावर चुकीचा परिणाम होऊ शकतो.

कुंभ
आजचा दिवस चांगला आहे. कौटुंबिक आव्हानांतून मुक्त व्हाल. समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनोबल मदत करेल. घरात भांडणाची स्थिती होऊ शकते,
म्हणून सावधगिरी बाळगा. कामासाठी दिनमान चांगले आहे. मेहनतीचे परिणाम सूखद असतील. एखाद्या सुंदर ठिकाणी भेट देण्याची योजना आखाल. वैयक्तिक जीवनात आनंद राहील. लव्ह लाइफसाठी दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तीशी चांगला संवाद साधाल, जो आनंद देईल.

मीन
आजचा दिवस शुभ आहे. बहिण-भावाशी संबंध चांगले राहतील, दुपारनंतर घरगुती कामांवर लक्ष केंद्रित कराल. घरात सूख आणि शांतता असेल. कामात पूर्ण मन लावाल. काही लोकांना नोकरीसाठी अर्ज करण्यात यश मिळू शकते. रिअल इस्टेटशी संबंधित बाबी यश देतील. भाग्याची अनुकूलता राहील. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा, होत असलेली कामे बिघडतील. वैयक्तिक जीवनात शांतता असेल. प्रेमसंबंधात आनंद मिळेल. संततीच्या बाबतीत चांगली बातमी मिळेल.

You might also like