1 जुलै राशीफळ : बुधवार ‘या’ 5 राशींसाठी असेल ‘खास’ ; नोकरीत, व्यापारात होईल ‘लाभ’

मेष – आजचा दिवस सामान्य आहे. आरोग्याची काळजी घ्या, कारण आजारी पडू शकता. मानसिक चिंता त्रास देईल. कामात चांगले परिणाम मिळतील. भरपूर मेहनत कराल. वैवाहिक जीवन आनंददायी राहील. जोडीदार रागावू शकतो, यासाठी त्यांचे म्हणणे ऐकावे लागेल. प्रेमसंबंधासाठी दिवस शुभ आहे.

वृषभ
आजचा दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधात आनंद आणण्यासाठी प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनात आजचा दिवस पूर्णपणे रोमँटीक असेल. प्रेमात बुडून जाल. एकमेकांबद्दल आकर्षण वाढेल. कामात चांगले परिणाम मिळतील. आरोग्य मजबूत राहील. मन प्रसन्न राहील.

मिथुन
आजचा दिवस मध्यम आहे. खर्च वाढेल. मानसिक चिंता वाढतील. काळजी घ्या, आरोग्य बिघडू शकते. मोठे काम हातात घेऊ नका, अन्यथा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरीत आज चांगले परिणाम मिळतील. भरपूर मेहनत कराल. वैवाहिक जीवनात अडचणी येतील. कारण एकमेकांबद्दल कशावरून तरी तक्रारी असतील. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे.

कर्क
आजचा दिवस चांगला आहे. प्रेमसंबधाचा आनंद घ्याल. प्रिय व्यक्तीशी प्रेमाच्या गोष्टी होतील. रोमान्स होईल. वैवाहिक जीवन सुद्धा शांततेत पुढे जाईल. जोडीदार मानसिकदृष्ट्याही तुमच्याशी जुळलेला राहील. नोकरीत विचारपूर्वक काम करण्याचा दिवस आहे. बदली होण्याची शक्यता आहे. तब्येत ठीक राहील.

सिंह
आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबातील सदस्यांसमवेत चांगला वेळ घालवाल. कुटुंबावर लक्ष राहील. कामात खूप चांगले परिणाम मिळतील. आजचा दिवस खूप चांगला जाईल. मन आनंदी राहील. आरोग्य चांगले राहील. उत्पन्न वाढेल. खर्च कमी होईल. वैवाहिक जीवनात शांतता राहील. प्रेमसंबंधात चढ-उतार राहील.

कन्या
आजचा दिवस फलदायी आहे. प्रवासाला जाण्याचा बेत आखाल. भाग्याची मजबूत साथ राहील, ज्यामुळे कामांत यश मिळेल. कामात जास्त मेहनत कराल, ज्यामुळे प्रतिमा मजबूत होईल. वैवाहिक जीवनात तणाव दिसून येईल. प्रेमसंबंध शांतीपूर्ण राहतील. आरोग्यात चढ-उतार होतील.

तुळ
आजचा दिवस फलदायी आहे. उत्पन्न वाढेल. पैसा येईल. खर्च कमी होईल. विरोधकांना मागे टाकाल. आरोग्यात चढ-उतार होतील. कामात चांगले परिणाम मिळतील. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवन थोडे तणावपूर्ण असू शकते.

वृश्चिक
आजचा दिवस चांगला आहे. मन आनंदी राहील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. रोमान्स वाढेल. प्रेम वाढेल. प्रेमसंबधात काही अडचणी येऊ शकतात. नोकरीसाठी दिवस कमजोर असल्याने लक्षपूर्वक काम करा. आरोग्यात चढ-उतार होऊ शकतो.

धनु
आजचा दिवस थोडा कमजोर आहे. आरोग्यात चढ-उतार होतील. खर्च वाढेल. मानसिक चिंता वाढू शकते. वैवाहिक जीवनात तणाव राहील. प्रेमसंबंधात शांतता राहील. कामासाठी दिवस चांगला आहे. कामात जास्त जबाबदारी दाखवाल.

मकर
आजचा दिवस चांगला आहे. खर्चात थोडीशी कपात होईल. उत्पन्नामध्ये कमालीची वाढ होईल. आरोग्याचा आनंद घ्याल. धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. वैवाहिक जीवनात शांतता राहील. प्रेमसंबंधासाठी दिवस रोमँटिक आहे. कामात चांगले परिणाम मिळतील. नोकरी बदलण्याचा विचार मनात येईल.

कुंभ
आजचा दिवस चांगला आहे. कामाचा आनंद घ्याल. कामाकडे पूर्ण लक्ष द्याल. ज्यामुळे चांगले परिणाम मिळतील. उत्पन्न वाढेल. आरोग्यात चढ-उतार होतील. प्रेमसंबंधात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून दिवस चांगला जाईल. वैवहिक जीवन सामान्य राहील.

मीन
आजचा दिवस चांगला आहे. भाग्याची मजबूत मिळाल्याने कामात यश मिळेल. कमी प्रयत्नात अनेक कामे मार्गी लागतील. उत्पन्न वाढेल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. आरोग्य चांगले राहील.