1 नोव्हेंबर राशिफळ : या 7 राशींसाठी रविवारचा दिवस आहे भाग्यशाली

मेष
आजचा दिवस एक चांगली बातमी घेऊन येईल. कुटुंबाचे संपूर्ण सहकार्य मिळेल. आईकडून सूख मिळेल आणि त्यांच्याकडून लाभ मिळू शकतो. क्षेत्रात स्थिती चांगली असेल. बदली होण्याचे योग आहेत. आरोग्याच्या बाबतीत आजचा दिवस थोडा कमजोर आहे. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल.

वृषभ
आज खर्च खुप होईल. आरोग्य कमजोर राहील. कुटूंबापासून दूर प्रवासासाठी जाऊ शकता. धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. कार्यालयात मन कमी लागेल. कामाची टाळटाळ कराल, म्हणून लक्ष द्या. कौटुंबिक जीवन शांततामय असेल. विवाहित जीवनासाठी दिवस कमजोर आहे. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील.

मिथुन
पैशाच्या आज खूप भाग्यवान ठराल. लाभ होईल, मानसिक आनंद मिळेल. लव्ह लाईफमधील यशाचा दिवस आहे. आनंदाचे क्षण अनुभवाल. जे शिक्षण घेत आहेत त्यांचे आज अभ्यासात मन लागेल. विवाहित जीवनात संततीला सूख मिळेल, ज्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. एखाद्या कलात्मक कामात हात टाकाल आणि त्यातून पैसे कमवाल.

कर्क
आज काळजीपूर्वक पुढे जाण्याचा दिवस आहे. काम करण्यावर भर द्या, अन्यथा स्थिती आणखीनच बिघडू शकते. कौटुंबिक जीवन चांगले राहील. आई-वडिलांचे सूख मिळेल. आरोग्य थोडे कमजोर राहण्याची शक्यता आहे. जास्त व्यस्तता टाळा. स्वतःसाठी वेळ काढा. प्रेमसंबंधात काहीतरी नवीन केल्याने आनंद होईल.

सिंह
विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूप अनुकूल आहे. उच्च शिक्षण मिळविण्यात यश मिळेल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. विवाहितांन काही समस्या असू शकतात. नोकरीत तुमचे काम एखादी चांगली बातमी आणू शकते. आरोग्य बळकट राहील. कामाशी संबंध ठेवलात तर सर्व चांगले राहील.

कन्या
व्यापारात प्रयत्नांना गती मिळेल आणि व्यवसाय वाढेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. कामात अपेक्षा जागृत होतील. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल. प्रवासाला जाण्यासाठी वेळ अनुकूल नाही. भांडणापासून दूर राहा. समाजात सन्मान वाढेल. प्रेमसंबंधांसाठी दिवस अनुकूल नाही.

तुला
कामात विलंब होऊ शकतो, ज्यामुळे थोडी अडचण होऊ शकते. मानसिक ताण येईल. या काळात खर्च देखील खूप जास्त असेल, जो नियंत्रित करणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात तणाव असू शकतो, जो टाळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रेमसंबंधात मनातील बोलू शकता. आरोग्याची काळजी घ्या. कामात चांगले फायदे मिळतील.

वृश्चिक
आजचा दिवस फायद्याचा सौदा ठरू शकतो. गुंतवलेल्या पैशांतून लाभ मिळेल. प्रेमसंबंधात अंतरंगातील क्षणांची वाढ होईल, प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवाल. शिक्षणातील अडथळ्यांचा काळ संपेल. विवाहितांना संतती सूखाची प्राप्ती होई. कामात मन थोडे कमी लागेल आणि कुटुंबाकडे अधिक लक्ष द्याल. ज्यामुळे कामाचा दबाव वाढू शकतो.

धनु
आज तुम्हाला संततीकडून आनंद मिळेल. कामाकडे लक्ष देणे आवश्यक आहे, कारण तिकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. कामाचा व्याप वाढू शकतो. दिवस लाभदायक असून अनेक फायदे होण्याची शक्यता आहे. यापूर्वी कुठे पैसे गुतवले असतील तर त्याद्वारे चांगला लाभ होईल. प्रेमात चांगल्या क्षणांचा अनुभव घ्याल. प्रिय व्यक्तीसोबत कुठेतरी बाहेर जाण्याची योजना आखू शकतो. शिक्षणातील अडथळे आज दूर होतील.

मकर
वैयक्तिक आयुष्यासाठी दिवस अनुकूल आहे. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कामात कौटुंबाचे सहकार्य मिळेल. व्यावसायिक जीवनातही चांगले परिणाम मिळतील. खर्च जास्त राहू शकतो. आवश्यक कामासाठी खर्च होईल. परंतु तरीही खिश्यावर भार पडेल. जोडीदार आणि आईमध्ये चांगला समन्वय पहायला मिळेल आणि दोघीही एकत्र खरेदीसाठी जाऊ शकतात.

कुंभ
क्षेत्रात मजबूत यश मिळू शकते. कामाच्या उद्देशाने केलेल्या प्रवासातून मोठे यश मिळू शकते. छोट्या प्रवासाने मन आनंदी होईल, काही नवीन सौदे होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे व्यवसायाला वेग येईल. आणि उत्पन्न वाढेल. खर्चाचा बोजा राहील, तरीही आनंदी राहाल. कामात यश मिळेल.

मीन
कुटुंबात काही समस्या असू शकतात, ज्यामुळे लक्ष आकर्षित होईल. बोलण्याने आणि वागण्याने इतरांना यशस्वी होण्यास मदत कराल आणि त्याचा आपल्याला फायदा होईल. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. कार्यक्षेत्रात स्थिती सामान्य असेल. कौटुंबिक जीवनाचा ताण तुमच्यावर जाणवू शकतो, ते टाळण्याचा प्रयत्न करा. विवाहित जीवन सामान्य राहील. प्रेमसंबंधासाठी दिनमान अनुकूल आहे.