2 डिसेंबर राशिफळ : कर्क, सिंह आणि धनुसह 3 राशीवाल्यांना मिळेल ‘लाभ’, इतरांसाठी दिवस ‘संमिश्र’

मेष
आज खूप व्यस्त राहाल. मित्रांसह मौजमस्ती कराल. कामावर लक्ष केंद्रित कराल. कार्यालयात तुमच्या अनुभवाची आवश्यकता असेल. काही विशिष्ट प्रकरणांमध्ये व्यवस्थापन चर्चा करू शकते. खर्च वाढत जाईल. आरोग्याची काळजी घ्या. पोट खराब होणे किंवा एखादी दुखापत होण्याची शक्यता आहे. सावधगिरी बाळगा. वैयक्तिक जीवनात प्रेम आणि रोमान्स राहील. जोडीदारासोबत संबंध आनंदी राहतील, पण वादाची पाळीसुद्धा येऊ शकते. प्रेमसंबंध सूख देतील.

वृषभ
आजचे दिनमान समाधान देईल. पैशाची आवक झाल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने राहील. ज्यामुळे काम करण्याची पद्धत उजळेल आणि कौतूक होईल. सरकारकडून एखादा चांगला लाभ मिळू शकतो. भाग्य पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करेल, परंतु मेहनत करावी लागेल. वैयक्तिक जीवनात तणाव असेल. जोडीदाराची वागणूक चिडचिडी असू शकते. प्रेमसंबंधात चांगला वेळ मिळेल.

मिथुन
आजचा दिवस चांगला आहे. आरोग्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे, कारण ते कमजोर राहील. आज मनाने राजा असाल. कामात मेहनत आणि उत्साह दुप्पट होईल, ज्यामुळे चांगले परिणाम मिळतील. जोडीदाराशी प्रेमाच्या भाषेत संवाद होईल. प्रेमसंबंधात रोमान्सचा आनंद घ्याल. संततीकडून आनंद मिळेल. खर्च वाढेल

कर्क
आजचा दिवस थोडा नाजूक आहे, म्हणून सावधगिरी बाळगा. मनात विचित्र विचार येतील आणि एकाग्र होण्यास त्रास होईल, ज्यामुळे कामांमध्ये अडथळा येण्याची शक्यता आहे. सावधगिरी बाळगा. वैयक्तिक जीवन सुखी राहील. कुटुंबासह समाधानी राहाल. कुटुंबात गाडी खरेदीबाबत चर्चा होऊ शकते. प्रेमसंबंधात तणाव वाढेल. प्रिय व्यक्तीच्या वागण्याने तुम्ही थोडे निराश व्हाल. नोकरीत बदलीचा योग आहे. व्यवसायात लाभ होईल.

सिंह
कार्यक्षमतेचा फायदा घ्याल. उत्पन्नामध्ये चांगली वाढ होईल. काही प्रमाणात खर्च नियंत्रित होईल. काही गुप्त उत्पन्न देखील मिळू शकते, ज्यामुळे चेहर्‍यावर हास्य राहील. कुटुंबातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. आज एखाद्याची तब्येत खराब होऊ शकते. मित्रांचा सहवास लाभेल. त्यांच्याबरोबर बर्‍याच गप्पा माराल. प्रेमसंबंधात आनंदाचा काळ असेल. संततीकडून चांगली बातमी मिळेल. कामात स्थिती अनुकूल असेल.

कन्या
आजचा दिवस चांगला आहे. आरोग्य असो किंवा काम, चांगले परिणाम मिळतील. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. वैयक्तिक जीवनात जोडीदार तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल. प्रेमसंबंधात आनंद आणि समृद्धी लाभेल. प्रिय व्यक्तीशी मनातील बोलाल. एखाद्या मित्राबरोबर भांडण होऊ शकते, म्हणून सावधगिरी बाळगा. प्रवास करणे टाळा.

तुळ
आज भाग्य तुमच्या सोबत उभे राहील, म्हणून कामे होत जातील. वाणी मधून ठेवाल, म्हणजेच सर्वांशी गोड बोललात तर दिवस चांगला जाईल. अन्यथा, आज संध्याकाळपर्यंत कोणाशी तरी भांडण होऊ शकते. कटू बोलणे टाळा. घरातील लोकांचे सहकार्य सर्व कामांमध्ये असेल, जे तुम्हाला बळकट करेल. मनात इतरांना प्रेम देण्याची इच्छा असेल. ज्यामुळे जोडीदारासोबतचे नाते मधूर राहील. लव्ह लाइफसुद्धा सूख, शांतीने परिपूर्ण असेल. विरोधकांना घाबरून जाण्याची गरज नाही, दिनमान तुमच्या बाजूने आहे.

वृश्चिक
आजचा दिवस थोडा कमजोर आहे., म्हणून सावधगिरीने दिवसाची सुरुवात करा. आरोग्य बिघडू शकते, म्हणून खाण्या-पिण्यासोबतच सवयींकडेही लक्ष ठेवा. अनावश्यक चिंतेपासून दूर रहा. प्रेमसंबंधात तणाव राहील. प्रिय व्यक्तीशी भांडण होऊ शकते. वैयक्तिक जीवन सामान्य राहील, जोडीदाराला समजण्यासाठी वेळ द्या. एखादा गैरसमज होऊ देऊ नका. खर्च वाढेल, उत्पन्न सामान्य राहील. कामात थोडा विरोधाभासी दृष्टीकोन स्वीकाराल. एक आदर्श होऊन काम करताना अडचणी येतील.

धनु
आजचा दिवस चांगला आहे. व्यापारासाठी दिवस उत्तम आहे. चांगले यश मिळेल, मन आनंदित होईल. खर्चही होईल. गुंतवणूकीत पैसा लावू शकता. वैयक्तिक जीवनात आनंद राहील. जोडीदार मनाची शांती देईल. चांगल्या गोष्टी बोलेल. लव्ह लाईफसाठी दिवस रोमँटिक ठरणार आहे. प्रिय व्यक्तीशी प्रेमाने बोलण्याने मन आनंदित होईल. मालमत्तेशी संबंधित फायदा होईल. उत्पन्नही चांगले होईल.

मकर
आजचा दिवस व्यस्त ठेवेल. नोकरीत विश्वासार्हता वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील, कारण तुमची कामगिरी अपेक्षेइतकी चांगली असणार नाही. चिंतेने ग्रस्त राहाल. वैयक्तिक जीवन आनंद देईल. प्रेमसंबंधात काही समस्या असतील. आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. क्षमता आहे ती बाहेर काढा आणि काम करा.

कुंभ
आजचा दिवस आनंदी आहे. प्रेमसंबंधात आनंदी क्षण येतील. प्रिय व्यक्तीसोबत प्रेमाच्या गुजगोष्टी करण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनातही दाम्पत्य सूखाचा अनुभव घ्याल, परंतु जोडीदाराचे आरोग्य बिघडू शकते. आरोग्यातही चढ-उतार होईल. जिथे काम करता तिथे वातावरण तापण्याची शक्यता आहे, म्हणून शांततेने काम करणे चांगले ठरेल. भाग्याच्या प्रबळतेमुळे कामात यश मिळेल.

मीन
आजचा चांगला आहे. घरातील खर्चावर लक्ष केंद्रित कराल. प्रयत्नांची गती वाढेल, ज्यामुळे व्यवसाय आणि नोकरीत शुभ परिणाम मिळतील. भाग्य साथ देईल, ज्यामुळे चांगले उत्पन्न मिळेल. खर्च कमी होईल. मात्र, काही गुप्त खर्च जरूर होतील. भावंडांकडून सहकार्य मिळेल. मनामध्ये आनंद राहील. जमीन, मालमत्तेच्या बाबतीत लाभ होईल.

You might also like