2 मार्च राशिफळ : या 4 राशींना मिळेल उत्तम संधी, उत्पन्नात होईल वाढ, इतरांसाठी असा आहे मंगळवार

मेष
आपल्या कार्यक्षेत्रात ऑफिसमध्ये काही नवीन अधिकार मिळतील, ज्यांची काळजी घ्यावी लागेल आणि लोकांना सुद्धा पटवून द्यावे लागेल. संततीसाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील, ज्यात तुमची रूची वाढल्याचे दिसेल. जोडीदार एखाद्या गोष्टीवरून नाराज होऊ शकतो, परंतु तुम्ही त्यांना समजावण्याचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांना करियरची थोडी चिंता असू शकते.

वृषभ
आजचा दिवस मध्यम फलदायक आहे. कुटुंबात एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते, कदाचित ज्येष्ठांशी वाद होऊ शकतो. परंतु त्यांचा सल्ला ऐकावा लागेल, जो पुढे जाऊन उपयुक्त ठरेल. शत्रू प्रबळ असतील. कायद्याशी संबंधित बाबींमध्ये यश मिळेल. कौटुंबिक व्यवसायात जोडीदाराचे ऐकावे लागेल. मन धर्मकार्यात लागेल.

मिथुन
आजचा दिवस संमिश्र आहे. अचानक कुठून तरी अडकलेले पैसे मिळू शकतात, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल, मन प्रसन्न होईल. परंतु हे चांगले होईल की घेतलेले कर्ज या पैशातून फेडून टाका, ज्यामुळे लोकांची देणी संपतील आणि निवांत आयुष्य जगू शकता. कौटुंबिक व्यवसायात मुलांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात भागीदार आणि पत्नीच्या बाजूने पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थी एखाद्या स्पर्धेसाठी तयारी करत असतील तर ते यशस्वी होतील.

कर्क
आजचा दिवस उत्तम फलदायक आहे. बर्‍याच काळापासून ज्या अडकलेल्या पैशाची आवश्यक होती तो आज मिळेल. संध्याकाळ कुटुंबातील सदस्यांसह मंगल कार्यक्रमामध्ये आनंदात घालवाल. जुन्या मित्राची भेट झाल्यास भविष्यात आर्थिक फायदा होईल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात चांगले यश मिळेल. परदेशातून व्यवसाय करत असाल तर नवीन नवीन कल्पना सूचतील ज्याद्वारे व्यवसाय पुढे वाढवू शकता.

सिंह
आज नोकरी किंवा दुकानातील एखादी गंभीर समस्या वडिलांच्या सल्ल्याने सोडवण्यात यशस्वी व्हाल. भावंडांच्या नात्यात आपुलकी वाढेल. शेजार्‍यांच्या आणि इतरांच्या भावना ओळखाव्या लागतील आणि त्यानुसार वाटचाल करावी लागेल. तरच आत्म समाधान मिळेल. हे लक्षात ठेवा कधीही कुणाचे म्हणणे ऐकल्याने समस्या होत नाही, परंतु ती गोष्ट योग्य असली पाहिजे. विवाहासाठी इच्छूकांना चांगले प्रस्ताव मिळतील. रोजगारासाठी प्रयत्नशील लोकांना यश मिळेल.

कन्या
आज कार्यक्षेत्रातील शत्रूंपासून सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा नुकसान सहन करावे लागेल. कारण ते त्रास देण्याचे सर्व प्रयत्न करतील. सावधगिरी बाळगावी लागेल. कुटूंबातील एखाद्या व्यक्तीचे आरोग्य बिघडू शकते, ज्यासाठी धावपळ करावी लागू शकते. पैसेही खर्च होतील, परंतु काळजी करू नका. संध्याकाळपर्यंत त्यांचे आरोग्य सुधारेल. महिला सहकारी आणि अधिकारी आज तुम्हाला सहकार्य करतील. त्यांच्याबद्दल मनातील आदर वाढेल. विद्यार्थ्यांना तांत्रिक क्षेत्रात यश मिळेल.

तुळ
आजचा दिवस शांततेत जीवन जगण्याचा आहे. घरातील जुनी खोळंबलेली कामे पूर्ण करण्याची संधी देखील मिळेल. काही महान पुरुषांशी भेटण्याची संधी देखील मिळेल. एखादी मालमत्ता खरेदी करायची असेल तर तिच्या सर्व बाजू गंभीरपणे तपासा. कोणाशीही भांडण करू नका, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आर्थिक स्थिती देखील बळकट होईल. भविष्यातील चिंता कमी होईल.

वृश्चिक
आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. व्यवसायात एखाद्याचा सल्ला घेण्याची आवश्यकता भासू शकते. परंतु तुम्हाला हे पहावे लागेल की एखाद्या अशा व्यक्तीचा सल्ला घ्या जो अनुभवी असेल, ज्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवू शकता. आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडाल. दुपारी महिला मित्रांसह वेळ घालवाल. आजची दिवशी प्रत्येक ठिकाणी तुमचे कौतूक होईल. प्रेमसंबंध आनंदी राहतील.

धनु
आजचा दिवस मध्यम फलदायक आहे. आज काही घरगुती वस्तू देखील खरेदी करू शकता, ज्यात जास्त पैसे खर्च होतील. परंतु आर्थिक स्थिती लक्षात ठेवूनच काम करावे लागेल. वैवाहिक जीवन सुखी राहील. जोडीदाराकडून प्रेम मिळेल. जुनी देणी असतील तर त्यामधून मुक्त व्हाल, मोकळे वाटेल. एखाद्याकडून पैसे घ्यावे लागू शकतात, परंतु प्रयत्न करा की घेण्याची गरज भासू नये. कारण ते महागात पडेल. व्यापारात नवनवीन उपकरणांचा वापर कराल.

मकर
आज पैसे योग्य ठिकाणी आणि विचारपूर्वक खर्च करा, जर कुणी उधार मागीतले तर विचारपूर्वक द्या कारण ते पैसे भविष्यात अडकण्याची शक्यता जास्त आहे. संततीकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. ज्यामुळे संततीचा अभिमान वाटेल. कुटूंबासमवेत एखाद्या मंगल सोहळ्याला उपस्थित राहू शकता. एखादा जुना मित्र किंवा पाहुणा अचानक समोर उभा राहू शकतो.

कुंभ
जे राजकारणात आहेत, त्यांच्यासाठी दिवस यशदायक आहे. एखादी गुंतवणूक करायची असेल तर त्यात भरपूर लाभ होण्याचे योग आहेत. विरोधक त्रास देण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्यांचे प्रयत्न अयशस्वी होतील. परंतु घराबाहेर पडताना इष्टदेवतेचे स्मरण करून बाहेर जा. धर्माच्या कार्यात शुभखर्च करू शकता. विद्यार्थ्यांना गुरु व सहकार्‍यांकडून काही नवीन अनुभव मिळतील.

मीन
जर मालमत्ता खरेदी करायची असेल, तर आजचा दिवस उत्तम आहे. मामाच्या बाजूनेही मानसन्मान मिळेल. कदाचित अधिक जबाबदार्‍या मिळतील. व्यवसायासाठी शहराच्या बाहेरचा प्रवास करावा लागू शकतो, हा प्रवास यशस्वी होईल. नोकरीत नुकसान करण्याचा प्रयत्न गुप्तशत्रू करतील. यामुळे संध्याकाळी त्रास होऊ शकतो. पत्नीकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आई आणि वडिलांचे प्रेम देखील मिळेल.