6 नोव्हेंबर राशीफळ : ‘या’ 6 राशींसाठी आज ‘शुभ’, ‘यश ‘आणि ‘धनलाभा’चे संकेत

मेष
आजचा दिवस आनंद देणारा आहे. कुटुंबाबद्दल सहानुभूती आणि प्रेमाची भावना वाढेल. आईकडून आनंद मिळेल. कुटुंबात अधिक वेळ घालवाल. ऑफिसमध्ये एखाद्या कामानिमित्त बाहेर पाठविले जाऊ शकते, इच्छा नसेल, तरीही हे काम मन मारून करावे लागेल. मित्र समर्थन करतील, त्यांच्याशी आज संध्याकाळी बोलाल, ज्यामुळे मनाला आनंद होईल. आरोग्य थोडे कमजोर होईल. प्रयत्नांनंतर यशस्वी व्हाल. मेहनत करण्यापासून मागे हटू नका.

वृषभ
आज खूप व्यस्त राहाल. प्रवासाला जाण्यासाठी दिवस शुभ आहे. आजचा प्रवास आनंद देईल. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मन जिंकेल. वैवाहिक जीवनात तणाव असेल, ज्यामुळे जोडीदार नाराज होऊ शकेल. प्रेमसंबंधात नात्यावर परिणाम होऊ शकतो. वडिलांची तब्येत कमजोर राहू शकते. कार्यक्षेत्रात चांगले परिणाम मिळतील, जे मेहनतीचे फळ असेल. आत्मविश्वास बाळगा, परंतु अहंकार टाळा.

मिथुन
मनात आनंदाची तीव्र भावना असेल. कारण आज धनप्राप्ती होईल, आणि स्वकीयांचा पाठींबा मिळेल, ज्यामुळे प्रत्येक कामात यश मिळेल. भाग्य प्रबळ राहील. उत्पन्न वाढेल. परंतु विरोधकांकडून काही अडचणी येऊ शकतात, त्यांच्यावर काही खर्चही होईल. प्रेमसंबंधासाठी दिवस अनुकूल आहे. विवाहित जीवनात तणाव असू शकतो. या तणावातून मुक्त होण्यासाठी जोडीदाराला कुठेतरी बाहेर घेऊन जा आणि स्पष्ट बोला, तणाव दूर करण्याचा प्रयत्न करा.

कर्क
आजचा दिवस मानसिकदृष्ट्या चिंता देणारा ठरू शकतो, पण प्रयत्न केल्यास कामात यश मिळेल. विरोधक अडचणी आणू शकतात. विवाहित जीवनात स्थिती सुधारेल. जोडीदाराकडून काहीतरी नवीन गोष्ट समजू शकते. कामात मन कमी लागेल आणि संततीबाबत जास्त विचार कराल. लव्ह लाइफसाठी दिवस सामान्य आहे.

सिंह
एखाद्या गोष्टीबद्दल चिंता करू शकता. आरोग्य देखील कमजोर राहू शकते. सर्दी खोकल्याच्या समस्या त्रास देऊ शकते. खर्च वाढेल. दूरच्या प्रवासाला जाऊ शकता. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. जोडीदारावर प्रेम वाढेल. प्रेमसंबंधात निराशेचा सामना करावा लागू शकतो. मालमत्तासंबंधी प्रकरणांमध्ये आजचा दिवस फायदेशीर ठरेल.

कन्या
आजचा दिवस आनंद देणारा ठरेल. उत्पन्न वाढेल, ज्यामुळे आनंद होईल. ऑफिसमध्ये बॉसची कृपा होईल आणि ते खुश होतील, ज्यामुळे दिवस चांगला होईल. कौटुंबिक जीवनात थोडा ताण येऊ शकतो. आव्हानांचा सामना करण्याच्या स्थितीत असाल. भाग्य आपल्या बाजूने वळवण्यास सक्षम असाल. विरोधकांबाबत सतर्क राहाल, ज्यामुळे त्यांच्यावर कुरघोडी कराल. प्रेमसंबंधांसाठी आजचा दिवस सामान्य आहे. जसे आतापर्यंत चालले होते, तसेच प्रेमाने नाते पुढे घेऊन जा.

तुळ
आज कामात खुप व्यस्त असाल. काम मेहनतीने कराल. कामात यश देईल. एवढेच नाही तर कुटुंबातही आनंद मिळेल. काम आई-वडिलांच्या आशीर्वादाने मार्गी लागेल. लोकांशी बोलताना शब्दांकडे लक्ष द्या. प्रवासाला जाण्याची शक्यता असल्यास तो टाळा. प्रेमसंबंधात यशस्वी व्हाल. प्रिय व्यक्ती तुमचे गुण गाईल. तब्येत सुधारल्याने दिलासा मिळेल.

वृश्चिक
आज मजबूत दिसाल, कारण भाग्य तुमच्या बाजूने असेल. याच कारणामुळे जवळपास प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. मानसन्मान वाढेल. कुटुंबातील लोकांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात आनंदाची लाट येईल, ज्यामुळे खुश व्हाल. आज सुविधांवर अधिक लक्ष केंद्रित कराल. कुणावर प्रेम करत असाल तर प्रपोज करा, यश मिळेल. वैवाहिक जीवनात तणाव असूनही आनंदाची जाणीव होईल. कार्यक्षेत्रात सावध राहावे लागेल. काही विरोधक त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात.

धनु
आज चिंता मनात घर करू शकते. मानसिक तणाव वाढेल. आरोग्यही कमजोर होऊ शकते. पाण्याशी संबंधित समस्या त्रास देतील. शुद्ध पाणी पिणे चांगले ठरेल, अन्यथा समस्या वाढू शकतात. अनावश्यक प्रवासाने खर्च वाढेल. विरोधक प्रबळ होतील. कार्यालयात चांगले परिणाम मिळतील. सहकारी मदत करतील. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे. विवाहित जीवन काहीसे कंटाळवाणे वाटू शकते.

मकर
दिवस आनंदाने घालवाल. जोडीदारावर प्रेम वाढेल, तो तुमची काळजी घेईल, ज्यामुळे नाते बळकट होईल. उत्पन्न वाढेल, ज्यामुळे विरोधकही कमजोर पडतील. समाजात चांगले स्थान मिळेल. लव्ह लाइफसाठी दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तीबरोबर जीवनातील नवीन विषयांवर चर्चा कराल आणि नात्यात पुढे जाण्यास आवडेल. कौटुंबिक जीवन देखील आनंददायी असेल. मालमत्तेतून चांगले फायदे मिळतील. केलेल्या कामात यश मिळेल. कोणालाही पैसे उधार देऊ नका.

कुंभ
खर्च वाढेल. कामात यश तेव्हाच मिळेल, जेव्हा तुम्ही खुप मेहनत कराल. जसजसा दिवस पुढ सरकेल उत्पन्न देखील वाढेल. कौटुंबिक जीवन आनंददायी असेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य शांती देईल. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. प्रिय व्यक्तीबरोबर बाहेर जाण्याचा विचार कराल. कार्यक्षेत्रात स्थिती तुमच्या बाजूने असेल, ज्यामुळे कामे होतील.

मीन
आज आतून आनंदी दिसाल. प्रेम संबंधांमध्ये चांगले परिणाम प्राप्त होतील. प्रिय व्यक्ती एकनिष्ठ असेल आणि प्रेम व्यक्त करेल, ज्यामुळे आनंदी व्हाल. भाग्य प्रबळ राहील, ज्यामुळे कामात यश मिळेल. कार्यक्षेत्रात क्षेत्रात ज्या समस्या होत्या, त्यांच्यापासून मुक्ती मिळेल. कौटुंबिक जीवनात व्यस्ततेमुळे काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते. सुखसुविधांकडे लक्ष द्याल, ज्यामुळे खर्च होऊ शकतो. पण या खर्चाचा त्रास होणार नाही.