3 एप्रिल राशिफळ : धनु राशीत चंद्र, ‘या’ 4 राशींच्या अडचणी वाढणार, सावध रहा, इतरांसाठी असा आहे शनिवार

मेष
आजचा दिवस यशदायक आहे. एखाद्या बँकेतून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर त्यामध्ये यश मिळेल. नोकरीत बॉसकडून सन्मान प्राप्त होईल. जुन्या मित्राची भेट होईल, ज्यामुळे मन प्रसन्न होईल. बहिण-भावाशी संबंध मजबूत होतील. भावाच्या आरोग्याची चिंता सतावू शकते. सायंकाळी एखाद्या तिर्थस्थळी जाऊ शकता.

वृषभ
आजचा दिवस व्यस्ततेचा आहे. मानसिक आणि शारीरिक श्रमामुळे थकवा जाणवले. जास्त धावपळ करावी लागेल, परंतु यशप्राप्ती होईल. निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे लाभ होऊ शकतो. तुमची काही रखडलेली कामे पूर्ण होतील. एखाद्या कामात गुंतवणूक करावी लागली तर आवश्य करा. ज्यातून भविष्यात उत्तम लाभ मिळेल. सायंकाळचा वेळ एखाद्या मंगलकार्यात घालवाल.

मिथुन
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. नोकरीत शत्रूंपासून सावध राहा, कारण ते नुकसान करण्याचा विचार करू शकतात, परंतु तुम्ही बुद्धीच्या बळावर त्यांचे कार्य यशस्वी होऊ देणार नाही. जर एखाद्या शारीरीक आजाराने पीडित असाल तर आज तो त्रास देऊ शकतो. सासरच्या बाजूकडून धनलाभ होऊ शकतो. एखाद्या स्पर्धेत भाग घेणार असाल तर अर्ज करू शकता. संततीकडून एखादी विशेष वार्ता ऐकायला मिळेल.

कर्क
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. व्यवसायात मोठ्या कालावधीपासून जे प्रयत्न केले, आता त्यांचा लाभ घेण्याची वेळ आली आहे. संततीवरील विश्वास आज आणखी मजबूत होईल. आजीच्या बाजूकडून प्रेम आणि स्नेह मिळेल. आईच्या आरोग्याची विेशेष काळजी घ्या. स्वतासाठी काही पैसे खर्च कराल. विद्यार्थ्यांना अभ्यासात येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी शिक्षकांशी संपर्क साधावा लागेल.

सिंह
आजचा दिवस संमिश्र आहे. सासरच्या बाजूकडून नाराजीचे संकेत मिळत आहेत, परंतु रागावर नियंत्रण ठेवून मधुर वाणीचा वापर करावा, अन्यथा नात्यात दूरावा येऊ शकतो. डोळ्यांशी संबंधीत काही त्रास असेल तर आज त्यामध्ये सुधारणा होईल. व्यवसायात गती आणण्यासाठी नवीन योजना आखाल, आणि वडीलांचा सल्ला घ्याल. संततीच्या विवाहाबाबत आज महत्वाचा निर्णय घेऊ शकता. प्रेमसंबंध आनंददायी राहतील. सायंकाळी जोडीदाराला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता.

कन्या
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. आपल्या आई-वडीलांकडून सूख आणि सहकार्य प्राप्त होईल, परंतु जोडीदाराला शारीरीक त्रास होऊ शकतो आणि तुमचा त्रास वाढू शकतो. व्यापारात काही नवीन ऑर्डर मिळतील. कठिण कामे सुद्धा सहज पूर्ण कराल. कुटुंबात जर एखादा वाद सुरू असेल तर तो आज डोकं वर काढू शकतो, परंतु अस्वस्थ होऊ नका. आई-वडिलांचा सल्ला घेतल्याने सायंकाळपर्यंत हा वाद संपेल.

तुळ
आजचा दिवस उत्तम लाभदायक आहे. अधिकारात आणि संपत्तीमध्ये आज वाढ होईल, जे पाहून संतती आणि जोडीदार दोघे खुश होतील. मित्राला मदत करू शकता. जर एखाद्या नव्या कामात गुंतवणूक करायची असेल तर आवश्य करा कारण ती शुभ ठरेल. दाम्पत्य जीवन आनंदी राहील. कुटुंबात एखाद्या छोट्या पाहुण्याचे आगमन होऊ शकते. नोकरीची नवीन संधी मिळेल. सायंकाळी मित्राशी चर्चा केल्याने मन प्रसन्न राहिल.

वृश्चिक
आज थोडे अस्वस्थ दिसून याल, ज्यामुळे मनात अशांततेची भावना राहिल. परंतु तरी सुद्धा व्यापारात वाढीसाठी करण्यात आलेले प्रयत्न यशदायक राहतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. जर तुमचा एखादा वाद सुरू असेल, तर त्यामध्ये आज यश मिळेल. जोडीदाराच्या आरोग्यात थोडी घसरण होऊ शकते, ज्यामुळे धावपळ करावी लागेल आणि पैसे सुद्धा खर्च करावे लागतील. संततीकडून एखादी शुभवार्ता समजू शकते.

धनु
आज आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत सावध राहा, कारण पोटात दुखणे, गॅस इत्यादी त्रास होऊ शकतो, यासाठी सावध राहा आणि खाण्या-पिण्याची काळजी घ्या. कुटुंबात एखाद्या मंगलकार्यावर चर्चा होऊ शकते, ज्यामध्ये कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला घेतल्याने कार्य होईल. धार्मिक कार्यात सहकार्य कराल आणि मन लागेल. सायंकाळी शेजार्‍याशी जर वाद झाला तर तो वाढू देऊ नका, कारण तो कायदेशीर होऊ शकतो.

मकर
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. एकीकडे एखादी भेट मिळू शकते तर दुसरीकडे अनावश्यक खर्च सुद्धा समोर येतील, इच्छा नसतानाही ते करावे लागतील. मामाच्या बाजूकडून सन्मान प्राप्त होईल. जोडीदारचे संपूर्ण सहकार्य मिळेल. आज रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी वेळ काढण्यात यशस्वी व्हाल. नव्या व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आवश्य करा कारण भविष्यात त्यापासून उत्तम लाभ मिळेल.

कुंभ
आजचा दिवस मध्यम फलदायक आहे. बुद्धी आणि विवेकाने केलेल्या कामात यश प्राप्त होईल, जे पाहून काही शत्रू सुद्धा उत्पन्न होतील, परंतु अस्वस्थ होऊ नका. ते तुमचे काहीही बिघडवू शकणार नाहीत. उत्पन्न मर्यादित राहील, यासाठी आवश्यकतेनुसार खर्च करा. अन्यथा आर्थिक संकट येईल. विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तम यश मिळेल. व्यापारासाठी प्रवास करावा लागू शकतो. दाम्पत्य जीवन सुखी राहील.

मीन
आजचा दिवस उत्तम फलदायक आहे. मुलगा किंवा त्याच्याशी संबंधीत काही वाद सुरू असेल तर तो आज संपेल. सायंकाळ मित्रांसोबत मजामस्तीत घालवाल. सामाजिक सन्मान मिळेल. ज्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल आणि मनोबल वाढेल. आनंदी व्यक्तीमत्व असल्याने, मैत्री करण्याचा अनेकजण प्रयत्न करतील. व्यवसायात चढ-उतार होतील, परंतु अस्वस्थ होऊ नका. आर्थिक स्थिती मजबूत होईल.