3 जानेवारी राशिफळ : ‘या’ 5 राशीवाल्यांसाठी आजचा दिवस ‘शुभ’, इतरांसाठी ‘असा’ आहे रविवार

मेष
आजचा दिवस मुलांबरोबर घालवायला आवडेल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. जोडीदार एक विनंती देखील करेल, जी तुम्हाला पूर्ण करण्यासाठी खिसा हलका करावा लागेल. आरोग्य मजबूत राहील. रागापासून दूर राहणे आवश्यक आहे. नोकरदार लोकांची स्थिती चांगली राहील. व्यवसायात काही चढ-उतारही येऊ शकतात. भाग्य प्रबळ राहील. प्रेमसंबंधासाठी दिनमान क्रिएटिव्ह तसेच रोमँटिक असेल.

वृषभ
आज ग्रहाची तुमच्या बाजूने परिणाम घेऊन आली आहे. मनामध्ये आनंद असेल. घरात समाधान असेल. लोकांच्या मनात प्रेम असेल. कामात चांगले प्रदर्शन करू शकाल. आरोग्यातही सुधारणा होईल. मिळकत चांगली राहील. कुटुंबासाठी काहीतरी खास कराल. आज आपण स्वयंपाक करण्याचा विचार करू शकता आणि कुटुंबासाठी एक खास डिश बनवू शकता. मोठा निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

मिथुन
ग्रहांची स्थिती आज तुमच्यात पूर्ण आत्मविश्वास भरेल, ज्यामुळे कामे सहजपणे होतील. व्यवसायातही चांगले यश मिळेल. आर्थिकदृष्ट्या दिनमान मजबूत आहे. उत्पन्न वाढेल. नोकरीत बॉसच्या निकटतेचा फायदा घेण्यात यशस्वी व्हाल. विरोधकांपासून सावध रहा. आरोग्याची काळजी घ्या. वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंधात थोडी निराशा असू शकते.

कर्क
मानसिक तणावातून मुक्तता मिळेल आणि मनापासून आनंदी व्हाल. नोकरीत काही चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील. आज सुट्टीचा असला तरी कामाविषयी परिपक्व व्हाल. वैवाहिक जीवनात समाधानी दिसाल. घरातील वातावरण देखील सकारात्मक असेल. व्यवसाय पुढे नेण्यासाठी लोकांचा पाठिंबा तुमच्यासोबत असेल. प्रेमसंबंधात एखादा गैरसमज उद्भवू शकतो. कुटुंबिक खर्च करण्यात वेळ जाईल.

सिंह
आज आत्मविश्वास उच्च स्तरावर असेल, जणू आकाशाला स्पर्श करू इच्छिता. व्यापारात चढ-उतार राहील. जे आयात-निर्यात करतात त्यांना मोठा फायदा होईल. प्रेमसंबंधात काही गैरसमज असू शकतात. तरीही प्रिय व्यक्तीची नाराजी कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. आईची तब्येत बिघडू शकते. त्यांची काळजी घ्या. भाग्य प्रबळ राहिल. कामात यश मिळेल आणि आर्थिक स्थिती चांगली राहील. आनंद वाटेल, आरोग्यही सुधारेल.

कन्या
आज आरोग्याकडे दुर्लक्ष करणे हानिकारक ठरू शकते. आवश्यक असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा. मानसिक ताण आणि खर्च दोन्ही चिंता वाढवू शकतात. कामात खूप चांगली स्थिती असेल. कामावर पूर्ण लक्ष द्याल, ज्याचे सुखद परिणामही मिळतील. एखाद्या प्रवासाचे प्लॅनिंग कराल. प्रेमसंबंधात आनंदी रहाल. वैवाहिक जीवनात संततीकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज इजा होऊ शकते, म्हणून सावधगिरी बाळगा.

तुळ
आजचा दिवस उत्पन्न वाढवणारा ठरेल. ग्रहांची स्थिती सांगत आहे की आपण खुप चांगल्या स्थितीत आहात. व्यवसायात एखादी मोठी डिल हाती लागू शकते. आरोग्य चांगले राहील. फक्त खाण्यापिण्याकडे थोडे लक्ष द्या. अपचनापासून दूर राहा. कुटुंबातील लहान सदस्यांचा पाठींबा मिळेल. कुटुंबातील सदस्यांसमवेत चांगला वेळ घालवाल. वैवाहिक जीवनात वाढत्या तणावाबद्दल चिंतेत पडाल. प्रेमसंबंधात नाते कुटुंबियांसमोर आणाल.

वृश्चिक
आज ग्रहांची स्थिती आपल्यासाठी सुखद परिणाम घेऊन येईल. करियरबाबत खूप सक्रिय असाल. आज तुमच्या पुढील आठवड्याचे संपूर्ण प्लॅनिंग कराल. नोकरदार लोकांसाठी हा खूप महत्वाचा काळ आहे. व्यवसायात चांगले फायदे मिळू शकतात. कुठेतरी फिरायला जाण्याचे प्लॅनिंग कराल. आरोग्य चढ-उतार होईल म्हणून सावधगिरी बाळगा. विरोधकांना घाबरण्याची आवश्यकता नाही, तुमचे पारडे भारी असेल. वैवाहिक जीवन चांगले असेल. प्रेमसंबंधात काही अडचणी येतील. मित्रामुळे नात्यात काही अडचण येऊ शकतात.

धनु
आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. परंतु एक चांगली गोष्ट अशी असेल की आपली काही अडकलेली कामे अचानक पूर्ण होतील, ज्याची आपण अपेक्षा केली नव्हती. त्यातून मोठा फायदा मिळू शकतो. व्यवसायात बाह्य स्रोतांचा लाभ मिळेल. आरोग्य मजबूत राहील. मानसिकदृष्ट्या मजबूत राहाल. आपल्या बौद्धिक विचारांनी आसपासच्या लोकांना आनंदी ठेवाल. तुमची मजेदार शैली दिसू शकते. प्रेमसंबंधात अडचणी येतील.

मकर
आजचे दिनमान कोणतेही मोठे काम हातात घेण्याकरिता चांगले नाही, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करा. कफ आणि पाण्याशी संबंधित समस्या असू शकतात. मानसिक ताण वाढू शकतो. धार्मिक विचार मनात राहतील. लोकांना कामाचा सल्ला द्याल. उत्पन्न ठीक होईल, परंतु एखाद्या गोष्टीबद्दल जास्त विचार कराल. वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीसोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार कराल.

कुंभ
आजचा दिवस काळजी घेण्याचा आहे. आरोग्य आणि मन दोन्ही कमजोर असू शकते. म्हणून काळजी घ्या. विरोधकांपासून जरा सावध रहा, ते त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात. खर्चही वाढेल, खिसा सैल होईल, म्हणून सावधगिरी बाळगा. कामासाठी दिनमान मजबूत आहे. चांगले काम करण्यासाठी तुमच्याकडून चांगले प्रयत्न कराल. मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने मनशांती मिळेल.

मीन
कामासाठी दिनमान मजबूत असल्याचे संकेत ग्रह देत आहेत. नोकरदार काम चोखपणे बजावण्याचा प्रयत्न करतील. एखाद्या मंदिरात जाऊन नतमस्तक व्हाल, ज्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवले तर स्थिती ठिक राहील. संपूर्ण दिवस काळजी घ्या. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मन दृढ राहील याची देखील काळजी घ्यावी लागेल. विरोधकांशी जपून राहा, ते कुरघोड्या करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.