3 जुलै राशिफळ : शुक्रवारी ‘या’ 6 राशीवाल्यांची होणार ‘चांदी’, ‘धनलाभा’चा आहे प्रबळ ‘योग’

मेष – आजचा दिवस फलदायी आहे. आरोग्याची काळजी घ्या, अन्यथा एखादी शारीरिक समस्या त्रास देऊ शकते. एखाद्या गोष्टीचा मानसिक तणाव बाळगणे तुमच्यासाठी चांगले नाही. खर्च जास्त होईल. उत्पन्न कमी होईल. प्रयत्न केल्यास यश मिळेल. भाग्याची साथ मिळाल्याने काही कामे होतील. नोकरीत प्रगती होईल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवन सुखी राहील.

वृषभ
आजचा दिवस उत्तम आहे. व्यवसायात प्रचंड यश मिळेल. खास नफा मिळू शकतो. सोबत काम करणार्‍यांकडून आनंद मिळेल. नोकरीत चांगले परिणाम मिळतील. बदलीचा योग आहे. प्रेमसंबंधासाठी दिवस सामान्य आहे. वैवाहिक जीवनात प्रेम राहील. आरोग्य मजबूत होईल.

मिथुन
आज खर्च जास्त होईल. थोडी सावधगिरी बाळगा. ताणतणाव टाळण्याचा प्रयत्न करा. अन्यथा आरोग्य आणखी बिघडू शकते. अचानक धनहानीची शक्यता आहे. कामात तुमची योग्यता लाभदायक ठरेल. कौटुंबिक वातावरण देखील चांगले परिणाम मिळण्यासाठी अनुकूल राहील. वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमसंबंधात काही अडचणी येतील.

कर्क
दिवस सामान्य आहे. प्रेमसंबंधात आनंदाचे क्षण येतील. शिक्षणाच्या क्षेत्रातही चांगले परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनात तणावाचा सामना करावा लागू शकतो. जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून भांडण होऊ शकते. तब्येत ठीक राहील. व्यवसायात यश मिळेल.

सिंह
आजचा दिवस चांगला आहे. घर कुटुंबाकडे लक्ष द्याल. घरगुती कारणासाठी पैसे खर्च होतील. आर्थिक स्थिती ठीक राहील. विरोधकांपासून सावध रहा. आरोग्य थोडे कमजोर राहील. कुणाशीही विनाकारण वाद घालणे तुमच्यासाठी दु:ख देणारे ठरेल. वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

कन्या
आजचा दिवस चांगला आहे. मित्रांच्या मदतीने एखादे नवे काम सुरू करू शकता. मित्रांकडून आर्थिक मदत मिळू शकते. व्यवसायात यश मिळेल. शिक्षणात अडथळा येऊ शकतो. अभ्यासात मन लागणार नाही. संततीशी चर्चा होऊ शकते, किंवा एखाद्या गोष्टीवरून तुमचे त्यांच्याशी जमणार नाही. कौटुंबिक वातावरण आव्हानात्मक राहू शकते.

तुळ
आजचा दिवस चांगला आहे. आज मित्र तुमच्या उपयोगी पडतील. त्यांनी सहकार्य केल्याने एखादे काम मार्गी लागू शकते. उद्योगात चांगला नफा मिळण्याचा योग आहेत. शिक्षणात लक्ष द्या, काही अडथळे येण्याची शक्यता दिसत आहेत. संततीशी जुळवून घ्या, त्यांच्याशी चर्चा करताना विचारपूर्वक बोला. कुटुंबात काही अडचणी येऊ शकतात.

वृश्चिक
आजचा दिवस चांगला आहे. व्यापार्‍यांसाठी खुपच चांगला दिवस आहे. तुमच्या उत्पादनाला मागणी वाढेल, ज्यामुळे उत्पन्नात वाढ होईल. नोकरीसाठी दिवस चांगला आहे. तुमची कार्यकुशलता तुमच्यासाठी फायद्याचा सौदा घेऊन येईल. आरोग्य मजबूत होईल. कुटूंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य बिघडू शकते, काळजी घ्या.

धनु
खर्च वाढल्याने चिंता वाढेल. आरोग्य चांगले राहील, ज्यामुळे आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम राहाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कुटुंबाच्या सल्ल्याने पैसे गुंतवू शकता. वैवाहिक जीवन आनंदी राहील, प्रेमसंबंधासाठी सुद्धा दिवस आनंदाचा आहे.

मकर
आजचा दिवस चांगला आहे. उत्पन्न वाढेल. खर्च कमी होईल. आरोग्य चांगले राहील. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा, आणि कुणवर उगाचच राग काढू नका. कुटुंबात शांतता राहील. कामात चांगले परिणाम मिळतील. नोकरीत आनंद मिळेल. व्यापर्‍यांसाठी दिवस अनुकूल आहे. प्रेमसंबंधात प्रेम वाढेल. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे.

कुंभ
आजचा दिवस चांगला आहे. खर्च तर होईल, पण इतर दिवसासारखा होणार नाही. उत्पन्नात थोडी वाढ होईल. यामुळे आनंद होईल. कामात यश मिळाल्यामुळे मन आनंदित होईल. नोकरीत केलेल्या प्रयत्नांचा फायदा होईल. प्रेमसंबंधात काही समस्या येऊ शकतात. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत चांगला वेळ घालवतात.

मीन
आजचा दिवस चांगला आहे. उत्पन्न वाढेल. इच्छाही पूर्ण होईल. एखाद्या खास मित्राला भेटू शकता. त्याच्याशी संवाद साधू शकता, जुन्या आठवणींना उजाळा द्याल. भाग्य मजबूत राहील, ज्यामुळे कामांमध्ये यश मिळेल. समाधानाची भावना राहील. प्रेमसंबंधासाठी दिवस कमकुवत आहे. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे.