4 मार्च राशिफळ : आज तूळ राशीत आहे चंद्र, या 5 राशींचा भाग्योदय, इतरांसाठी असा आहे गुरुवार

0
41
horoscope
horoscope

मेष
आजचा दिवस संमिश्र आहे. आज मान, पद, प्रतिष्ठेत वाढ होण्याचा योग आहे, ज्यामुळे सुखद परिणाम मिळतील. अचानक कुठून तरी पैसे मिळण्याचा योग आहे, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. संध्याकाळचा वेळ धर्माच्या कार्यात घालवाल. धर्मासाठी खर्च कराल. जोडीदार पूर्ण सहकार्य देईल, ज्यामुळे मन आनंदी होईल. आई-वडीलांना एखाद्या तीर्थयात्रेला घेऊन जाऊ शकता.

वृषभ
आज एखाद्या सामाजिक कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मिळेल. आज मान सन्मानही वाढेल. आज कामावर खुप खुश व्हाल, लोकांच्या तोंडून तोंडून स्तुती होईल. आनंद वाटेल. समाजातील लोकांमध्ये आदर वाढेल. व्यवसायात नवीन कल्पनांचा अवलंब कराल जेणेकरून आर्थिक स्थिती मजबूत होईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळेल.

मिथुन
आजचा दिवस वादविवादाचा आहे. भावंडांशीही वाद होऊ शकतो, परंतु बोलण्यावर संयम ठेवा, कारण कठोर शब्द नातेसंबंधात दरी निर्माण करू शकतात. शत्रूच्या बाजूने केलेली षड्यंत्र त्रास देऊ शकतात. परंतु कार्यक्षमतेच्या बळावर समस्या सोडवू शकाल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मालमत्तेचा वाद चालू असेल तर तो आज संपेल.

कर्क
आज उत्तम यश मिळण्याचे योग आहेत, भाग्याची सुद्धा साथ लाभेल. एखाद्या महान व्यक्तीच्या मदतीने काही मौल्यवान वस्तू मिळू शकते, जी प्राप्त करण्याची तीव्र इच्छा होती. व्यवसायात काही नवीन योजना आणण्याचा विचार करीत असाल तर आज याची सुरुवात करू शकता, ज्यामुळे व्यवसायाला नवीन गती मिळेल. आज रोजगाराच्या चांगल्या संधी मिळतील. संततीला मेहनतीच्या बळावर सन्मान मिळेल, ज्यामुळे मन आनंदी होईल.

सिंह
आज सर्व बाबतीत विशेष सावधान राहावे लागेल. आपले रहस्य कोणालाही सांगू नका, अन्यथा दु:ख सोसावे लागेल. व्यवसायात आर्थिक लाभाचे भरपूर योग आहेत. भाग्यात सुद्धा वाढ होईल. स्वत:साठी थोडा वेळ काढल, ज्यामुळे जोडीदार खूश होईल आणि प्रेमसंबंध मजबूत होतील.

कन्या 
आज विद्यार्थ्यांना कला आणि लेखन कार्यात सादरीकरण करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे ते खुप आनंदीत होतील. तुम्ही खुप गोंधळलेले आहात, परंतु आज सर्व प्रकारच्या निराशेचा अंत होईल, ज्यामुळे आतापर्यंत जी कामे होत नव्हती, त्यांच्यातील अडथळे दूर होतील. कौटुंबिक व्यवसायात वडिलांचा सल्ला फायदेशीर ठरेल. विवाहासाठी इच्छूक असलेल्यांना चांगले प्रस्ताव येतील. संततीच्या भविष्याबद्दल थोडी चिंता असू शकते.

तुला
आजचा दिवस आव्हानात्मक असेल. काही काही अशी कामे करावे लागतील, जी अत्यंत महत्त्वाचे आहेत, या कार्यात यश मिळेल आणि कष्टाचे फळ मिळेल, ज्यामुळे आर्थिक स्थिती बळकट होईल. भविष्यातील चिंता संपेल. घरासाठी काही वस्तू खरेदी करू शकता. जर एखादी गुंतवणूक करायची असेल तर आजचा दिवस त्यासाठी सर्वात चांगला आहे.

वृश्चिक
आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. आज तुम्ही तुमच्या वागण्याबद्दल खूप चिंतेत असाल. तुम्हाला वाटेल की खुप गोष्टी अस्ताव्यस्त आहेत. अनेक प्रकारचे विवाद तुमच्या समोर येऊन उभे राहू शकतात, परंतु संध्याकाळपर्यंत काही कामे कौशल्य वापरुन त्रास कमी करू शकता. संध्याकाळचा वेळ धार्मिक आणि सामाजिक कार्यात घालवाल, ज्यामुळे मनशांती मिळेल. विद्यार्थ्यांना कुठे अ‍ॅडमीशन घ्यायचे असेल तर आज ते यशस्वी होतील.

धनु
आज आईची विशेष काळजी घ्यावी लागेल कारण रात्री आईला एखादा त्रास होऊ शकतो, तिची तब्येत बिघडू शकते, म्हणून सावधगिरी बाळगा. मित्रांच्या सहकार्याने संध्याकाळचा वेळ चांगल्या प्रकारे घालवाल. हलके वाटेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचे योग आहेत. आर्थिक स्थितीही हळूहळू सुधारेल. संततीबाबत एखादा निर्णय थोडा चिंताग्रस्त बनवू शकतो.

मकर
आजचा दिवस संमिश्र फलदायक आहे. सकाळपासूनच मनात प्रसन्नतेची भावना असेल. एखाद्या मोठ्या फायद्यासाठी दिवसभर धावपळीत रहाल आणि त्यात यशही मिळेल. आज सर्व कामे एक-एक करुन पूर्ण होताना दिसतील. ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी होतील. जोडीदाराकडून खूप प्रेम मिळेल. व्यस्तता असूनही प्रेमसंबंधासाठी वेळ काढाल.

कुंभ
आज कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकार्‍यांकडून भरपूर सहकार्य मिळेल, ज्यामुळे लाभाचे मार्ग मोकळे होतील. दिवस खूप व्यस्ततेत जाईल. एकामागून एक सर्व कामे समोर येतील. या वेळी विरोधक सुद्धा तुमच्या मागे लागू शकतात, आणि तुम्हाला विचलित करू शकतात परंतु हुशारीने आणि बुद्धीने सर्व विरोधकांवर मात करावी लागेल, तेव्हाच तुम्ही जीवनाच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकता.

मीन
आज संततीच्या विवाहाशी संबंधित एखादा प्रस्ताव येऊ शकतो, ज्यावर पंडित किंवा पुजारीकडून गंभीरपणे विचार करावा लागेल. यावेळी तुमचे काम होणार आहे. आजचा दिवस व्यवसायासाठी उत्तम लाभाचा आहे. कोणतीही संधी आज हातातून सोडू नका, तरच आर्थिक स्थिती मजबूत करू शकता. आज जोडीदारासाठी एखादी भेटवस्तू खरेदी करू शकता. संततीच्या मनात धर्मकार्याबद्दल आवड निर्माण होईल, जे पाहून तुमचे यश आणि कीर्ती वाढेल.