5 एप्रिल राशीफळ : ‘या’ 5 राशींचे भाग्य चमकणार, कार्यसिद्धीचा योग, इतरांसाठी असा आहे सोमवार

मेष
आजचा दिवस संमिश्र आहे. कार्यक्षेत्रात काही अडचणी येण्याचा योग आहे, परंतु समजूतदारपणाने काम केल्यास यश मिळेल. कुणाला पैसे उधार दिले तर परत मिळण्याची शक्यता कमी आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देताना अडचण येऊ शकते. भागीदारीत व्यापार करण्याचा विचार करत असाल तर उत्तम आहे. पैशाच्या व्यवहारात सावध राहा. सायंकाळी वाहन चालवताना काळजी घ्या.

वृषभ
नोकरीत अधिकारी वर्गाशी चांगले संबंध ठेवावे लागतील आणि वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल, तरच यश मिळेल. कौटुंबिक संपत्तीत वाढ होईल आणि विरोधक गप्प बसतील. कौटुंबिक खर्च अचानक वाढू शकतो, ज्यामुळे मानसिक तणाव येऊ शकतो. परंतु खिशावर लक्ष ठेवा, अन्यथा भविष्यात आर्थिक संकट येऊ शकते. राजकीय सहकार्य लाभेल आणि सरकारी कामे सुद्धा पूर्ण होतील.

मिथुन
आजचा दिवस उत्तम फलदायक आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबासह कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. लहान मुले आनंदी दिसतील. पैशाच्या बाबतीत सासरच्या बाजूकडून तणाव मिळू शकतो, यासाठी सावध राहा. वातावरणातील बदलामुळे आरोग्याच्या बाबतीत सावध राहा, शारीरीक त्रास होऊ शकतो. व्यापारासाठी केलेला प्रवास यशदायक राहील आणि एखादी नवीन डिल फायनल होऊ शकते. सायंकाळ मित्रांसोबत मौजमस्तीत घालवाल.

कर्क
आजचा दिवस लव्ह मॅरेजच्या जातकांसाठी उत्तम आहे. सुरूवातीला काही अडचणी येतील, परंतु नंतर सर्वजण तुमच्याशी सहमत होतील. दाम्पत्य जीवन सुखमय राहिल आणि आर्थिक स्थिती सुद्धा मजबूत झाल्याने व्यापारात वाढीचे संकेत मिळत आहेत. कार्यक्षेत्रात पद आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दृष्टीने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. आईच्या तब्येतीची काळजी घ्या आणि डॉक्टरांकडून चेकअप करून घ्या. भागीदारीत व्यापार करण्यासाठी दिवस उत्तम नाही.

सिंह
रोजगारासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. कार्यक्षेत्रात प्रोजेक्ट वेळेपूर्वी पूर्ण झाल्याने तुमच्या प्रभावात वाढ होईल. मित्रांसह केलेला प्रवास सुखद आणि लाभदायक राहिल. जोडीदार तुमच्यासाठी एखादी भेट आणू शकतो. आवश्यक काम पूर्ण करण्यासाठी दुसर्‍यांची मदत घेण्यात यशस्वी व्हाल. सायंकाळचा वेळ आई-वडीलांना छोट्या प्रवासाला घेऊन जाऊ शकता.

कन्या
आजचा दिवस धावपळीचा आहे. कुटुंबाच्या गरजांसाठी काही पैसे खर्च करावे लागतील. आज बाहेरच्या खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा पोटाचा त्रास होऊ शकतो. जोडीदार तुमच्या रचनात्मक कामांनी प्रभावित होईल आणि आवश्यक कामामध्ये सल्ला देईल, ज्यामुळे प्रेमसंबंध सुखमय होतील. धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल, ज्यामध्ये पैसे खर्च होतील, परंतु किर्ती वाढेल. संततीच्या भविष्याची जी चिंता होती ती संपेल.

तुळ
आज राजकीय दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील, चांगले जनसमर्थन मिळेल. भविष्यात त्याचा लाभ मिळेल. उत्पन्न आणि खर्च यात संतुलन ठेवावे लागेल अन्यथा पैसा कमी होईल आणि भविष्यात आर्थिक स्थिती डगमगू शकते. विद्यार्थ्यांना परीक्षेत यशदायक परिणाम मिळतील. सामाजिक क्षेत्र सुद्धा वाढेल. कुटुंबात एखादे भांडण सुरू असेल तर ते आज पुन्हा डोके बाहेर काढू शकते आणि त्रास देऊ शकते.

वृश्चिक
जे परदेशाशी व्यापार करतात, त्यांच्यासाठी दिवस उत्तम आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वातील कामात यश मिळेल आणि अधिकारी, सहकार्‍यांमध्ये प्रतिमा सुधारेल. जीवन सुखमय होईल, परंतु अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल, जोडीदाराच्या भावनांचा सन्मान करावा लागेल, तरच तो तुमच्या सोबत वाटचाल करेल. मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या, तरच यश मिळेल.

धनु
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण मिळवण्यासाठी वेळ चांगली आहे, परंतु नोकरीशी संबंधीत विद्यार्थ्यांना आपल्या कामात एकाग्रता कायम राखावी लागेल आणि अधिकार्‍यांना खुश ठेवावे लागेल. जर एखाद्या संपत्तीविषयी वाद सुरू असेल तर एखाद्या मोठ्या अधिकार्‍याच्या मदतीने तो समाप्त होईल. व्यापारात पैसा येण्यात काही अडचणी येऊ शकतात. आईच्या बाजूकडून धनलाभ होऊ शकतो. सायंकाळी आईसाठी भेट आणू शकता.

मकर
व्यापारात चांगली इच्छाशक्ती आणि संकल्पामुळे लाभ होईल. मित्रांच्या सहकार्याने व्यवस्थेच्या योजनांना बळ मिळेल. कार्यक्षेत्रात शत्रुपासून सावध राहावे लागेल कारण ते त्रास देण्यासाठी सर्व प्रयत्न करतील. पण तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या. ईकड-तिकडच्या गोष्टींमध्ये पडू नका, सतर्क राहा. कुटुंबाची व्यवस्था कायम राखण्यासाठी वेळ काढण्यात यशस्वी व्हाल. सायंकाळी मित्रांसह एखाद्या मंगल कार्यक्रमाला जाऊ शकता.

कुंभ
आजचा दिवस संमिश्र आहे. व्यापारात लाभाची स्थिती उत्पन्न होईल आणि नवीन संधी मिळतील, ज्यामुळे व्यापार वाढेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. रोजगारासाठी प्रयत्न करणार्‍यांना यश मिळेल. जोडीदाराचे भरपूर सहकार्य मिळेल. प्रेमसंबंध आनंददायी राहतील. वैद्यकीय क्षेत्रातील जातकांची प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. संततीचे आरोग्य घसरू शकते, यासाठी खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या.

मीन
आजचा दिवस उत्तम फलदायक आहे. एखादे प्रकरण कोर्ट-कचेरीत सुरू असेल तर त्यामध्ये यशस्वी व्हाल, त्यामध्ये भाग्याची भरपूर साथ मिळेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात येत असलेल्या अडचणी संपतील, यशाचे मार्ग खुले होतील, परंतु आरोग्याच्या बाबतीत सावध राहा. आर्थिक स्थिती मध्यम राहिल. जर एखाद्या प्रकारची गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी दिवस उत्तम आहे. सासरच्या बाजूच्या एखाद्या व्यक्तीशी वैचारिक मतभेद होऊ शकतात, परंतु त्यामध्ये जोडीदार तुमच्या बाजूने असेल.