6 डिसेंबर राशिफळ : 5 राशीच्या लोकांना मिळेल ‘भाग्याची साथ’, असा असेल रविवार

मेष
आजचा दिवस अनुकूल आहे. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल. दाम्पत्य जीवनात प्रेम आणि रोमान्सची संधी मिळेल. व्यवसायात सहजता येईल आणि उत्पन्न वाढेल, ज्यामुळे मन प्रसन्न होईल. नोकरीत मेहनतीने काम पूर्ण कराल, ज्यामुळे चांगले परिणाम मिळतील. आरोग्यही चांगले राहील. आपण धर्माच्या कामात खूप लक्ष द्याल. एखाद्या प्रॉपर्टीचा व्यवहार करू शकता.

वृषभ
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबावर लक्ष केंद्रित कराल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य आणि सहवास लाभेल. भरभराट होईल. उत्पन्न वाढेल. आरोग्य कमजोर राहील. ज्यामुळे मानसिक ताण वाढेल. कामात तुमची मेहनत दिसेल. भाग्य प्रबळ राहील. वैवाहिक जीवनासाठी आनंदाचा दिवस असेल. जोडीदार एखाद्या वस्तूची मागणी करेल, जी तुम्ही पूर्ण कराल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीला भेटून आनंदी व्हाल.

मिथुन
आजचा दिवस सामान्य आहे. प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे. प्रवासाचा चांगला परिणामही मिळेल. आरोग्य बळकट होईल. कामात अडथळा येणार नाही, ज्यामुळे मन आनंदी राहील. भाग्य थोडे कमजोर राहू शकते, ज्यामुळे जास्त मेहनत केल्यानंतरच यश मिळेल. वैवाहिक जीवनात तणाव दिसू शकतो. प्रेमसंबंधासाठी दिवस उत्तम ठरू शकतो. आज एखादी घरगुती वस्तू खरेदी करून आणाल, ज्यामुळे कुटुंबिय आनंदीत होतील.

कर्क
आजचा दिवस तणावाने भरलेला असेल. चांगले भोजन कराल. मित्रांसमवेत मौजमस्ती करण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात आनंदाचा काळ राहील. कौटुंबाचे सहकार्य देखील पूर्ण मिळेल. एकजूटता दिसून येईल. कामात केलेली मेहनत यशस्वी होईल. प्रेमसंबंधासाठी दिनमान थोडे कमजोर आहे. दाम्पत्य जीवनात जोडीदाराकडून प्रेम मिळाल्याने खुश व्हाल.

सिंह
आजचा दिवस अनुकूल आहे. विचारसरणी आणि समजूतदारपणा विकसित होईल आणि प्रत्येक काम मजबूतीने पूर्ण कराल, ज्यामुळे कामांमध्ये यश मिळेल. तुमच्या योजना यशस्वी होतील. भाग्य साथ देईल. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे. दाम्पत्य जीवनासाठी दिवस खूप चांगला आहे. कामात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीत बदलीचा आदेश येऊ शकतो. वरिष्ठांशी असलेल्या चांगल्या संबंधांचा फायदा होईल.

कन्या
आजचा दिवस मध्यम आहे. आरोग्यात घसरण होईल, तसेच मानसिक तणाव वाढेल. खर्चामध्ये अचानक वाढ होईल, ज्यामुळे आर्थिक स्थितीवर बोजा पडेल. खर्चाचे योग्य व्यवस्थापन करता येणार नाही. कौटुंबिक जीवनात काही अडचणी येतील. कामात प्रयत्न सार्थकी ठरतील. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. जोडीदार कुटुंबाच्या जबाबदार्‍या चांगल्या प्रकारे पार पाडेल. प्रेमसंबंधात एखादी समस्या असेल.

तुळ
आजचा दिवस अनुकूल आहे. उत्पन्नात प्रचंड वाढ होईल, ज्यामुळे आनंद होईल. कामात यश मिळेल. कोणी पैसे उसने घेतले असतील तर तो तुमचे पैसे परत करेल. यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. विवाहित जीवनासाठी दिवस चांगला आहे, प्रेम वाढेल आणि रोमान्सची संधी मिळेल. एखाद्या तीर्थयात्रेला जाण्याचे योग आहेत. प्रेमसंबंधासाठी दिवस सामान्य आहे. कामात चांगले परिणाम मिळतील. कंपनीच्या हिताचा काही चांगला सल्ला द्याल, ज्यामुळे कौतूक होईल.

वृश्चिक
आजचा दिवस धावपळीचा आहे. परंतु बहुतांश परिणाम तुमच्या बाजूने असतील. कामात चांगले परिणाम तुम्हाला मिळतील. भाग्य प्रबळ राहील. नोकरीत बदली होऊ शकते परंतु तुमची स्थिती मजबूत राहील. कामात चांगले परिणाम मिळतील. प्रत्येक काम अधिक चांगल्याप्रकारे कराल. कौटुंबिक वातावरण काही समस्या देऊ शकते. वैवाहिक जीवनासाठी काळ सामान्य आहे. प्रेमसंबंधात आज आपण सावधगिरी बाळगा. आज तुमच्या मनातील गोष्टी एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला समजू शकतात, ज्यामुळे थोडा विरोध होऊ शकतो.

धनु
आजचा दिवस तुमच्यासाठी कमजोर आहे. एखाद्या गोष्टीमुळे चिंताग्रस्त रहाल. आरोग्यही कमजोर राहू शकते. वैवाहिक जीवनात एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकातो. कामात चांगले परिणाम मिळतील आणि सोबत काम करणार्‍यांचे संपूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबात आनंद राहील. प्रेमसंबंधात रोमान्सची पूर्ण संधी मिळेल आणि प्रिय व्यक्ती तुम्हाला एखादी चांगली भेट देऊ शकते.

मकर
आजचा दिवस उत्तम आहे. काही नवीन विषयांवर काम कराल. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे, प्रिय जोडीदारावर प्रेम कराल. प्रेमसंबंधासाठी दिनमान थोडे कमजोर असू शकते. खर्च वाढेल. कुटुंबातील वातावरण खूप चांगले राहील आणि एकमेकांबद्दल प्रेमाची भावना राहील. कामात चांगले परिणाम मिळतील. सॅलरीत रिमाइंड मिळू शकते.

कुंभ
आजचे दिनमान मध्यम आहे. खर्चही वाढेल आणि ताणतणावही वाढेल. ऑफिसमध्ये कामाचा ताण जास्त असेल, यामुळे थकवा जाणवेल आणि मानसिक तणावसुद्धा जाणवेल. उत्पन्नामध्ये थोडी घसरण होऊ शकते. प्रेमसंबधासाठी दिवस सामान्य आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील. जोडीदार तुम्हाला पूर्णपणे आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेल. बिझनेसमध्ये यश मिळेल.

मीन
आजचा दिवस मध्यम आहे. खर्च वाढेल आणि मानसिक ताणही वाढू शकतो. कामात चांगले परिणाम मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. उत्पन्न देखील वाढेल, ज्यामुळे अशावादी रहाल. वैवाहिक जीवनासाठी दिवस थोडा कमजोर आहे, जोडीदार आजारी पडू शकतो. प्रेमसंबंधासाठी दिवस खुप सामान्य आहे. प्रिय व्यक्ती कुठेतरी फिरायला जण्यासाठी हट्ट करू शकते.