6 जून राशिफळ : शनिवारच्या दिवशी कोणाला होणार फायदा, कोणाला तोटा, जाणून घ्या काय आहे नशिबात

पोलीसनामा ऑनलाइन टीम –

मेष
आजचा दिवस उत्तम आहे. कामात यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या, कारण आजारी पडू शकता. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा वाढेल, जोडीदार तुम्हाला मदत करेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.

वृषभ
आजचा दिवस फलदायी आहे. उत्पन्नात घट होऊ शकते, खर्च विचारपूर्वक करा. कामात चांगले परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवन चांगले राहील. प्रेमसंबंधासाठी दिवस थोडा आव्हानात्मक आहे. आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन
आजचा दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनात तणावासह प्रेमाचे गोड शब्ददेखील असतील. नात्यातील जवळीक वाढेल. प्रेमसंबंधासाठी दिवस उत्तम आहे. कार्यक्षेत्रातही अनेक लोकांच्या मदतीने काही चांगले काम करून दाखवाल यामुळे तुमचे कौतूक होईल. आजचा दिवस व्यवसायासाठी खूप चांगला आहे. आरोग्य कमजोर राहील. विरोधकांवर मात कराल. मानसिक ताण वाढेल.

कर्क
आजचा दिवस थोडा कमजोर आहे. कामात विलंब होऊ शकतो. यामुळे मन दु:खी होईल. कुणालाही वाईट बोलू नका. तुमची जवळचीच माणसं तुमच्याशी शत्रूसारखी वागू लागतील. भाग्याची साथ कमकुवत राहील. त्यामुळे प्रत्येक काम यशस्वी करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे. आरोग्य देखील थोडे कमजोर राहील. कामात एखाद्या गोष्टीवरून मन अस्वस्थ होऊ शकते.

सिंह
आजचा दिवस चांगला आहे. उत्पन्नही वाढेल आणि खर्चही कमी होईल. दिवस आनंदात घालवाल. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची चांगली संधी मिळेल. कुटुंबातील एखाद्या वडिलधार्‍या व्यक्तीचे आरोग्य बिघडेल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. कामात तुम्हाला आणखी खुप काही शिकणे बाकी आहे. विचारपूर्वक काम करावे लागेल.

कन्या
आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. कामात खूप अनुकूलता राहील. तुम्ही खूप रोमँटिक मूडमध्ये राहाल. कामात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर फिरायला अथवा चित्रपट पहायला जाऊ शकता. तुमच्या क्षेत्रात चांगले काम करून दाखवाल. कौटुंबिक जीवनात अडचणी येतील. पालकांची तब्येत बिघडू शकते. काही लोकांना तुमच्या मालमत्तेबाबत वाद निर्माण करायचा आहे, त्यांच्यापासून सावध राहा.

तुळ
आजचा दिवस चांगला आहे. छोट्याशा प्रवासातून काही नवीन संबंध तयार होतील. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. मित्र आणि नातेवाईकांच्या संबंध वाढवाल. कामात सहकार्‍यांशी चांगले वागल्याने तुम्हाला कामात यश मिळेल. प्रेमसंबंधासाठी दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराला शारीरिक त्रास होऊ शकतो. जोडीदाराच्या माध्यमातून तुम्हाला एखादा लाभ होऊ शकतो.

वृश्चिक
पैशाच्या बाबतीत आजचा दिवस उत्तम आहे. तुम्हाला चांगला धनलाभ होण्याचे योग आहेत. सासरकडून काही चांगली बातमी समजेल, ज्यामुळे तुमचे मन आनंदी होईल. रागावर नियंत्रण ठेवल्यास, यश निश्चित मिळेल. कामात स्थिती तुमच्या बाजूने राहील. कुटुंबातील छोट्यांकडून सूख मिळेल. वैवाहिक जीवनासाठी दिवस अनुकूल आहे. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्ती तुमच्यावरील प्रेम व्यक्त करेल. यामुळे आनंद मिळेल.

धनु
आजचा दिवस चढउताराचा आहे. खर्च होईल, पण उत्पन्नही वाढेल. आरोग्य कमजोर राहील. आता मानसिक ताणातून मुक्त होण्याची वेळ आली आहे. वाहन काळजीपूर्वक चालवा, अपघात होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात परिस्थितीत सुधारणा होईल. एकमेकांच्या जवळ याल. कौटुंबिक जीवन चांगले राहील. प्रेमसंबंध बिघडण्याची शक्यता आहे.

मकर
आजचा दिवस थोडा कमजोर आहे. मानसिक ताण जाणवेल. खर्चही जास्त होईल. उत्पन्नही थोडे कमी होईल. जसजसा दिवस पुढे सरकेल, तसतशी तुमची स्थिती सुधारू लागेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वत:ची काळजी घ्या. प्रॉपर्टीच्या बाबतीत फायदा होईल. कामात स्थिती तुमच्या बाजूने राहील. वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे.

कुंभ
आजचा दिवस चांगला आहे. कामात तुमचा प्रभाव राहील. वरिष्ठांशी संबंध सुधारतील. उत्पन्न चांगले होईल. व्यवसायात प्रवासातून यश मिळेल. उत्पन्न वाढेल. प्रेमसंबंधात भाग्यवान ठराल. भरपूर प्रेम मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून लाभ होण्याची शक्यत आहे. कौटुंबिक जीवनात काही समस्या राहतील.

मीन
आजचा दिवस चांगला आहे. परंतु, काही आव्हाने असू शकतात. बुद्धिमत्ता उपयोगी येईल. पैशाच्या बाबतीत दिवस चांगला आहे. वडिलांची तब्येत बिघडू शकते, पण तुमचे सुधारेल. कौटुंबिक जीवनासाठी अनुकूल काळ आहे. प्रेमसंबंधासाठी प्रेममय दिवस आहे. प्रिय व्यक्तीची संपूर्ण साथ मिळेल. वैवाहिक जीवनात तणावाचा सामना करावा लागू शकतो.