7 फेब्रुवारी राशिफळ : ग्रह-नक्षत्र देतील या 4 राशींना साथ, धनलाभाचे प्रबळ योग, इतरांसाठी असा आहे रविवार

मेष
आजचा दिवस लाभदायक आहे. शासनाकडून सन्मानित होऊ शकता. जर कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर त्याची परतफेड करणे अवघड होईल. आज जुन्या मित्रांचे सहकार्य मिळेल. चांगल्या मित्रांची संख्या सुद्धा वाढेल. पत्नीकडून आज चांगले सहकार्य मिळेल. रात्रीची वेळ कुटुंबासोबत आनंदाच्या क्षणात घालवाल.

वृषभ
आजचा दिवस मध्यम फलदायक आहे. व्यवसायात खुप व्यस्त राहाल. धावपळ करताना सावधगिरी बाळगा. कारण पायाला दुखापत होऊ शकते. सायंकाळी कुटुंबातील सदस्यांसोबत एखादा साखरपुडा, बारसे किंवा अन्य पार्टीत जाऊ शकता. काही कामे रखडली असतील तर आज त्याच्यातूनच लाभ होईल. एखाद्या कार्यात पैसे खर्च करावे लागले दर मनापासून खर्च करा.

मिथुन
जर एखादा आजार झालेला असेल तर आज त्याच्या त्रासात वाढ होईल. समााजिक कामात सुद्धा अडथळे येऊ शकतात. संततीकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. ज्यामुळे मन आनंदीत होईल. सायंकाळपासून रात्रीपर्यंत गाणे, वाजवणे यामध्ये रस वाढेल. आजचा दिवस चांगला आहे, परंतु हातातून पैसे जास्त खर्च होतील. धर्म आणि अध्यात्मात रस वाढताना दिसेल.

कर्क
आजचा दिवस उत्तम लाभदायक आहे. संततीबाबत जो विश्वास आहे तो आणखी मजबूत होईल. छोट्यांकडून प्रेम आणि सहकार्य मिळेल. एखाद्या आवश्यक कामासाठी पैसे जास्त खर्च कराल. ज्यामुळे शत्रु त्रस्त होतील. आई-वडीलांची विशेष काळजी घ्या. त्यांचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होईल. जी मेहनत कराल, त्यामध्ये उत्तम लाभ मिळेल.

सिंह
आजचा दिवस संमिश्र आहे. एखाद्या कारणामुळे उदास होऊ शकता, आई-वडीलांचे सहकार्य आणि आशीर्वादाने यामध्ये दिलासा मिळेल. डोळ्यांशी संबंधीत काही समस्या असेल तर तर आज त्यामध्ये सुधारणा होईल. काही कारणास्तव सासरकडील लोकांची नाराजी वाढेल. यासाठी वाणी मधुर ठेवा, कारण संबंधात कटुता येऊ शकते. यासाठी खबरदारी घ्या.

कन्या
आजचा दिवस सूखदायक आहे. निर्भिड राहाल. कामे सहज पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. कठिण कामे सुद्धा पूर्ण कराल. पत्नीला शारीरीक त्रास झाल्याने चिंता असू शकते. विनकारण खर्च होऊ शकतो. चांगल्या लोकांचे भले कराल, परंतु लोक यास तुमच्या असहाय्यतेचा स्वार्थ समजतील. व्यापारात धनलाभ होईल. आई-वडीलांचे सुखात सहकार्य प्राप्त होईल.

तुळ
आजचा दिवस विद्यार्थी आपल्या गुरूजनांशी पूर्ण भक्ती आणि निष्ठा करताना दिसतील. नवी गुंतवणुक करायची असेल तर यासाठी दिवस शुभ आहे. ज्यामुळे भरपूर लाभ मिळेल. तुम्ही चांगले व्यक्ती आहात यासाठी नेहमी इतराचा विचार करता, परंतु तुम्हाला दुसर्‍या लोकांची साथ तेवढी मिळत नाही, तेव्हा तुम्हाला त्रास होता. आजचा दिवस शुभ आहे. अधिकारांमध्ये वाढ होईल.

वृश्चिक
आज व्यापारात वाढ करायची असेल तर प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. आज काही कारणामुळे मन अशांत होऊ शकते. आज सायंकाळपर्यंत धैर्य आणि प्रतिभेने शत्रु पक्षावर विजय मिळवाल. जर काही वाद सुरू असेल तर यामध्ये यश मिळू शकते. पैशाच्या बाबतीत लाभ मिळू शकतो. ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल.

धनु
धार्मिक अनुष्ठानात मन लावून खर्च केला तर मनात श्रद्धा वाढेल. यासाठी भाग्याची पूर्ण साथ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आरोग्यात थोडी घसरण होऊ शकते. सायंकाळपासून रात्रीपर्यंत पोटदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. यासाठी सावध राहा आणि खाण्यापिण्यात संयम बाळगा. विद्यार्थ्यांना विद्या आणि ज्ञानप्राप्ती होईल. दान, पुण्य आणि परोपकाराची भावना वाढेल. धार्मिक अनुष्ठानात मन लावून काम कराल, ज्यामुळे मनात श्रद्धा वाढेल.

मकर
सासरच्या बाजूकडून भरपूर मान सन्मान मिळेल. व्यवसायात सुद्धा मन लागेल आणि रखडलेली कामे पूर्ण होतील. एखादी नवीन गुंतवणुक करावी लागेल, ज्याचा लाभ भविष्यात घ्याल. एखादी किमती वस्तू भेट म्हणून दुपारपर्यंत मिळू शकते. काही अनावश्यक खर्च सुद्धा समोर येऊन उभे राहतील, जे करावेच लागतील. यामुळे पैसा खर्च होईल.

कुंभ
आज कुटुंबातील लोकांकडून विश्वासघात होण्याची शक्यता आहे, यासाठी लक्ष द्या. संसार सुखासाठी नोकर चाकरांचे भरपूर सहकार्य प्राप्त होईल. आज सायंकाळपासून रात्रीपर्यंत एखादा प्रवासाला निघू शकता, जो तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. आज बुद्धी आणि विवेकाने केलेल्या कामांमध्ये भरपूर यश मिळेल, परंतु मर्यादित आणि आवश्यकतेनुसारच पैसा घ्या, अन्यथा नुकसान होऊ शकते.

मीन
आजचा दिवस घरात एखाद्या शुभकार्यात घालवाल. जर मुलगा किंवा मुलीसंबंधी काही वाद सुरू असेल तर आज तो मिटला जाईल. कार्यक्षेत्रात सन्मान मिळाल्याने मनोबल वाढेल. आज रात्रीची वेळ कुटुंबासोबत मजामस्ती करत घालवाल, ज्यामुळे मन आनंदीत होईल.