7 एप्रिल राशीफळ : साध्य योगात ‘या’ 4 राशींच्या नशिबात पैसा, इतरांसाठी असा आहे बुधवार

0
54
horoscope today 07 March 2021 dainik rashifal daily horoscope aaj che rashifal astrology today in marathi
file photo

मेष
आजचा दिवस खुप आव्हानात्मक आहे. नोकरीत कामाचा दबाव राहिल. समोर भरपूर जबाबदार्‍या असतील, ज्या वेळ असताच पूर्ण कराव्या लागतील. व्यापारात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. दाम्पत्य जीवन सुखमय राहिल. व्यस्तता असूनही प्रेमासाठी वेळ का÷ढण्यात यशस्वी व्हाल. आजूबाजूच्यांशी वाद टाळा.

वृषभ
आजचा दिवस सुख-समृद्धीचा आहे. विचार केलेली कामे पूर्ण होतील. राजकारणात विरोधक आज पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. जर एखादे नवीन काम करायचे असेल तर, त्यासाठी वेळ अनुकूल नाही. दिवसाचे काम लवकर पूर्ण करून सायंकाळी कुटुंबासोबत वेळ घालवाल, ज्यामुळे समाधान वाटेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. विद्यार्थ्यांना एखाद्या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर दिवस उत्तम आहे.

मिथुन
आजचा दिवस सामान्य आहे. संततीकडून एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल, ज्यामुळे मनोबल वाढेल आणि उत्साहाने कामाला लागाल. नोकरीत बॉसकडून कौतूक ऐकायला मिळेल, प्रमोशनची चर्चा होऊ शकते. उत्पन्नाची नवीन साधने तयार होतील. व्यापारात एखादी नवीन डिल फायनल होऊ शकते. कुटुंबात भाऊ किंवा बहिणीच्या प्रस्तावावर चर्चा करू शकता.

कर्क
आजचा दिवस काहीसा खास आहे. शुभकार्याबाबत आवड वाढेल. व्यापारासाठी जो निर्णय घ्याल तो भविष्यात लाभदायक होईल. व्यवसायात कुणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी विचार करा. एखादी संपत्ती घ्यायची असेल तर सर्व बाजू काळजीपूर्वक तपासून पहा, अन्यथा फसवणूक होऊ शकते. संततीच्या विवाहात येत असलेल्या अडचणी संपतील. सामाजिक स्तर वाढेल. एखादी अशी व्यक्ती समस्या निर्माण करू शकते, जिला तुम्ही तुमच्या जवळची मानता, यासाठी सावध राहा. विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आशीर्वाद लाभेल.

सिंह
आजचा दिवस चांगल्या परिणामांचा आहे. काही अशी कामे होतील, ज्यांची मोठ्या कालावधीपासून प्रतिक्षा करत होतात. विरोधकांची षडयंत्र अपयशी होतील. सर्व कामे पूर्ण होतील. संसारिक सुखाच्या सावधनांसाठी सुद्धा काही पैसे खर्च करू शकता. काही नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबात मोठ्या कालावधीपासून कटुता सुरू असेल तर ती आज संपेल, पुन्हा सर्व सदस्य एकत्रित राहतील.

कन्या
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. संतती एखादे असे काम करताना दिसेल, ज्यामुळे तुम्हाला गर्व वाटेल. जर मोठ्या कालावधीपासून एखाद्या गोष्टीची प्रतिक्षा करत असाल तर ती आज प्राप्त होईल. दाम्पत्य जीवन सुखमय राहिल. मन धार्मिक कार्यात आणि पूजेत जास्त लागेल. ज्येष्ठांची सेवा कराल तसेच पुण्यकार्यावर सुद्धा पैसे खर्च कराल, ज्यामुळे मनात आनंद राहिल. व्यापारात प्रतिस्पर्धी डोकेदुखी बनू शकतात.

तुळ
आजचा दिवस खुप संघर्षाचा आहे. धावपळसुद्धा होईल आणि पैसा खर्च होईल. जास्त मेहनत करून सुद्धा उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. विनाकारण धावपळ केल्याने मानसिक आणि शारीरीक दोन्ही प्रकारे अस्वस्थ होऊ शकता, परंतु सायंकाळी थोडा दिलासा मिळेल, यासाठी अस्वस्थ होऊ नका. सायंकाळचा वेळ कुटुंबासोबत घालवला, तर थकवा दूर होईल. बरे वाटेल. जोडीदार तुमच्या सोबत राहिल.

वृश्चिक
आजचा दिवस आव्हानांचा आहे. जर नोकरी किंवा व्यवसायात दोन्हीमध्ये मेहनत करावी लागेल आणि असेही होईल की मेहनतीप्रमाणे परिणाम मिळणार नाहीत, ज्यामुळे मन निराश होईल, परंतु निराशा सोडून आनंदाने काम करा. तुम्ही तुमचे काम इमानदारीने आणि मन लावून केल्यास, याचा लाभ भविष्यात आवश्य मिळेल. आगामी काळात वरिष्ठ अधिकारी सुद्धा प्रशंसा करताना दिसतील. सायंकाळी मित्रांसोबत धार्मिक ठिकाणाचा प्रवास करू शकता.

धनु
आज व्यवसायात सर्व कामे अडथळ्यांशिवाय पार पडतील. शत्रु प्रबळ होतील, परंतु काहीही करू शकणार नाहीत. जर एखादे काम करण्याचा विचार करत असाल तर एखाद्या मित्राच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. कामात यश मिळेल. मित्रांकडून धनलाभ होऊ शकतो. सायंकाळी एखाद्या मंगलकार्यात भाग घेऊ शकता. व्यापारासाठी प्रवास करावा लागू शकतो, जो भविष्यात उत्तम लाभ देईल.

मकर
आजचा दिवस ठोस परिणामांचा आहे. नोकरीत वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कृपेने मान सन्मान मिळेल. जर जमीन मालमत्तेसंबंधी एखादे प्रकरण सुरू असेल तर एखाद्या अधिकार्‍याच्या मदतीने मार्गी लागेल. सायंकाळी आरोग्यात घसरण होऊ शकते, यासाठी खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष द्या. सामाजिक कार्यात रुची वाढेल, ज्यामुळे मित्रांची संख्या वाढेल.

कुंभ
आजचा दिवस मध्यम फलदायक आहे. व्यवसायात लक्ष्मीची कृपा होईल. ज्यामुळे धनलाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबात मोठ्या कालावधीपासून सुरू असलेला वाद संपेल. पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर दिवस उत्तम आहे. एखाद्या मित्राला भेटल्याने आनंद होईल, ज्याची आपण मोठ्या कालावधीपासून वाट पहात होतात. सायंकाळी जोडीदाराला कुठेतरी फिरायला घेऊन जाऊ शकता.

मीन
आजचा दिवस उत्तम फलदायक आहे. चारही बाजूंनी लाभ होईल, ज्यामुळे चारी बाजूंचे वातावरण आनंदमय आणि सुखमय राहिल. व्यवसायात जर जास्त पैसा लावण्याचा विचार करत असाल तर भविष्यात त्याचा उत्तम लाभ मिळेल. कुटुंबासाठी आज एखादा महत्वाचा निर्णय घेऊ शकता, ज्यामध्ये सर्वांचा लाभ होईल, सर्व लहान सदस्य तुमचे म्हणणे मान्य करतील आणि मोठे प्रेम करतील. विद्यार्थी सुद्धा परीक्षेच्या तयारीला लागतील.