8 मार्च राशिफळ : मिथुन, मकर आणि कुंभ राशीसाठी चांगला दिवस, इतरांसाठी असा आहे सोमवार

मेष
संपूर्ण कुटुंबाच्या अपेक्षांना न्याय देण्यात यशस्वी व्हाल, ज्यामुळे तुमचे यश सुद्धा वाढेल. दिवस आव्हानात्मक आहे. अनेक जबाबदार्‍या आज समोर उभ्या राहतील. तुम्हाला हा विचार करावा लागेल की कोणती अगोदर पूर्ण करायची, कोणती नंतर. थोडा मानसिक ताण जाणवेल. कौटुंबिक व्यवसायाला आज एक नवजीवन मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मेहनत कराल. सायंकाळचा वेळ मित्रांसमवेत फिरण्यात घालवाल.

वृषभ
आजचा दिवस संमिश्र फलदायक आहे. एखादे नवीन काम सुरू करायचे असेल तर दिवस अनुकूल नाही, भाग्याची साथ मिळणार नाही, म्हणून विचारपूर्वक काम करा. आज दिवसाचे काम लवकर पूर्ण करून सायंकाळचा वेळ कुटुंबासमवेत घालवण्याचा विचार कराल. कौटुंबिक जीवन थोडे तणावपूर्ण असू शकते. सासरच्या लोकांकडून धनलाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना आज त्यांच्या मेहनतीचे भरपूर फळ मिळेल.

मिथुन
आज बौद्धिक आणि व्यवसायिक क्षेत्रात यश मिळेल. संततीकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे मनोबल वाढेल. कुटुंबात एखादा वाद असल्यास तो आज संपेल. वडिलांच्या आरोग्याबद्दल चिंता असू शकते. काही जुन्या मित्रांना भेटल्यामुळे आज मनात आनंदाची भावना असेल.

कर्क
आजचा दिवस उत्तम आहे. संततीच्या विवाहात ज्या अडचणी होत्या त्या आज संपतील, ज्यामुळे मनात समाधानाची भावना निर्माण होईल. विद्यार्थ्यांना भविष्यासाठी गुरूंचा आधार घ्यावा लागेल. व्यवसाय करणार्‍यांसाठी दिवस अनुकूल आहे. व्यापारात येणारे अडथळे संपतील, यामुळे व्यवसायाला वेग येईल. आर्थिक स्थितीही मजबूत होईल.

सिंह
आज नोकरीत आणि कार्यक्षेत्रात काही विरोधक पुन्हा डोके वर काढू शकतात. लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांच्या षडयंत्रात पडू नका, तरच यश मिळेल. कौटुंबिक नात्यात दीर्घकाळापासून असलेली कटुता परस्पर समजूतदारपणाने संपेल. रोजगारासाठी प्रयत्न करणार्‍यांना चांगल्या संधी मिळतील.

कन्या
आजचा दिवस संमिश्र आहे. कार्यक्षेत्रात आणि व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी ठराल, ज्यामुळे ते त्रास देण्याचा प्रयत्न करतील. वैवाहिक जीवन सूखी राहील, ज्यामुळे मनात आनंदाची भावना असेल. विद्यार्थ्यांना आज थोडी धावपळ करावी लागेल.

तुळ
आजचा दिवस जास्त मेहनत आणि धावपळीचा आहे. अत्यधिक मेहनत करूनही उत्पन्न कमी होईल आणि खर्च जास्त होईल, ज्यामुळे मानसिक ताण येऊ शकतो. गुप्त शत्रू त्रास देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. विशेषत: विनाकारण धावपळ आणि कौटुंबिक अशांतता असेल, परंतु संध्याकाळी थोडा आराम मिळेल. संततीकडून चांगली बातमी मिळू शकते.

वृश्चिक
आजचा दिवस संमिश्र आहे. जर आपले म्हणणे इतरांपर्यंत पोहचवण्यात यशस्वी झालात तर येत्या काळीत अनेक लाभ होतील. कार्यक्षेत्रात आज वडिलांच्या सल्ल्याची आवश्यकता भासेल. भावंडांशी संबंध चांगले राहतील. आज एखादी महत्वाची व्यवस्था किंवा करार तुमच्या बाजूने फायनल होऊ शकतो. आज सायंकाळी कुटुंबातील छोट्या सदस्यांसह मौजमजा करण्यात वेळ घालवाल.

धनु
आज एखादा शारीरीक त्रास होऊ शकतो, ज्याकडे पूर्ण लक्ष द्यावे लागेल. मित्रांकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे. घरात संपत्ती वाढेल. कुटुंबातील सदस्यांसह सायंकाळी एखाद्या मंगल समारंभात सहभागी होऊ शकता. आज जोडीदारासाठी एखादी भेट खरेदी करू शकता, ज्यामुळे खिशावर मोठा भार पडू शकतो. आर्थिक स्थितीची चिंता वाटू शकते.

मकर
आज काही ज्येष्ठाची साथ मिळाल्याने आनंद होईल. उच्च अधिकार्‍यांच्या कृपेने जमीन, मालमत्तेचे प्रकरण आज संपेल, परंतु कार्यक्षेत्रात रखडलेली कामे वेळेत पूर्ण करावी लागतील. अन्यथा अडचण वाढू शकतात. आज सायंकाळी पाहुणे येऊ शकतात.

कुंभ
आजचा दिवस प्रगतीचा आहे. ज्येष्ठ स्त्रीचा आशीर्वाद मिळाल्यामुळे कार्यक्षेत्रात प्रगतीच्या विशेष संधी मिळतील. भावांमध्ये वाद होऊ शकतो, म्हणून सावधगिरी बाळगा, बोलण्यावर संयम ठेवा. आज कोठूनही कमावलेले धन मिळण्याची मोठी शक्यता आहे. ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. धर्माच्या कामांमध्ये रस वाढेल, यामुळे सन्मान वाढेल.

मीन
व्यवसायात जास्त पैसे लावण्याचा विचार करत असाल तर भविष्यात ते अत्यंत फायदेशीर ठरेल. आज दिवसभर उत्पन्नाचे नवीन स्त्रोत समोर येतील. विरोधकांपासून सावध रहा. एखादे नवीन काम सुरू करायचे असल्यास, त्यासाठी आजचा दिवस सर्वोत्तम आहे, ज्यामध्ये भाग्याची भरपूर साथ मिळेल. संध्याकाळी कुटुंबातील सदस्यांसह पिकनिकला किंवा फिरायला जाऊ शकता.