एकादशीच्या तिथीला ‘या’ 5 राशींवाल्यांची होणार चांदी, इतरांसाठी ‘असा’ आहे शनिवार

मेष
आजचा दिवस अनुकूल आहे. आरोग्यात थोडी घसरण होईल, पण पैशाच्या बाबतीत भाग्यवान ठराल. उत्पन्न वाढेल आणि पैसा येण्याचा योग आहे. एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. नोकरीचा आनंद घ्याल, काही नवीन कामे मिळू शकतात. प्रेमसंबंधासाठी दिनमान कमजोर आहे, म्हणून काळजी घ्या. कौटुंबिक जीवनात एकमेकांबद्दल जवळीक जाणवेल.

वृषभ
आज आनंदी दिसाल. आनंद चेहर्‍यावर दिसेल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. वैवाहिक जीवनात रोमान्स असेल. जोडीदारासमवेत घराबाहेर फिरायला जाण्याची योजना आखाल. प्रेमसंबंधात आनंद राहील, कारण प्रिय व्यक्ती तुमच्यासाठी एखादे सरप्राईज आणू शकते. नोकरीत चांगल्या कामासाठी ओळखले जाल, प्रशंसा होईल. व्यवसायात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. भाग्य मजबूत राहील. जे हवे ते करण्याची इच्छा बळकट होईल.

मिथुन
ग्रह तुमच्यासाठी चांगली स्थिती निर्माण करतील, ज्यामुळे आरोग्यामध्ये सुधारणा होत आहे अशी जाणीव होईल. काही जुन्या समस्यांपासून मुक्तता मिळेल. आज थोडे भावनिक व्हाल. काही जुन्या चांगल्या आठवणी येतील. वैवाहिक जीवनात जोडीदार प्रेमळ गोष्टींनी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेल. सासरच्या लोकांशी चर्चा होईल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीसोबत फिरण्यात व्यस्त राहाल. नोकरीत चढ-उतारांमुळे थोडे चिंताग्रस्त व्हाल. व्यवसायात उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

कर्क
आजचा दिवस आनंद देणारा आहे. प्रेमसंबंधासाठी बराच वेळ काढाल, प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवताना दिसाल. वैवाहिक जीवन देखील आनंदी असेल. जोडीदाराशी बोलून त्यांचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. एखाद्या विशिष्ट विषयावर त्यांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. घरात पूजापाठ आणि धार्मिक वातावरण असेल. संततीसाठी दिवस अनुकूल आहे. नोकरीत एखादे नवीन काम मिळाल्याने आनंदी राहाल. आरोग्यही चांगले राहील. खिशात पैसा येईल. चांगल्या भोजनाचा आनंद घ्याल.

सिंह
आजचे दिनमान नवीन आनंद घेऊन येईल. कुटुंबातील सदस्यांसमवेत जास्तीत जास्त वेळ घालवाल. ऑफिसचे काम लवकर उरकून घरी येऊन कुटुंबियांसोबत बाहेर जेवायला जाण्याचा विचार करू शकता. घाईत असूनही तुम्ही कोणतीही चूक करणार नाही. कामाकडे संपूर्ण लक्ष द्याल. कौटुंबिक सुख, शांती आनंद देईल. वैवाहिक जीवनात तुमच्या एखाद्या बोलण्यावरून जोडीदाराला राग येऊ शकतो. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीशी स्पष्टपणे बोलाल आणि भविष्याबद्दल मुक्तपणे चर्चा कराल.

कन्या
ग्रहस्थिती तुमच्या बाजूने असल्याने आरोग्य चांगले राहील. भाग्य प्रबळ राहील, ज्यामुळे कमी मेहनतीत जास्त नफा होईल. महत्त्वाची कामेही पूर्ण होतील. धार्मिक यात्रेला जाण्याची तयारी करू शकता. दाम्पत्य जीवनात नवीनपणा अनुभवाल आणि जोडीदारासोबत भविष्यावर चर्चा कराल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीसोबत खरेदीसाठी जाऊ शकता. नात्यात प्रेम वाढेल. नोकरीत धावपळीत वेळ घालवाल. व्यवसायात थोडा दिलासा मिळेल.

तुळ
ग्रहस्थिती आज तुम्हाला आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडेल. अनावश्यक खाणे आणि उलट-सुलट खाण्यामुळे समस्या उद्भवू शकतात. आवडीपेक्षा आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. घरातील लोक तुम्हाला समजावतील. नोकरीत वेगाने काम करण्याचा प्रयत्न कराल. प्रेमसंबंधात आनंद राहील, प्रिय व्यक्तीसाथ लाभेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराची नाराजी सहन करावी लागू शकते. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो.

वृश्चिक
ग्रहांचे गोचर आज तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. सभोवताली पाहिले तर आज काही चांगली कामे होत असताना दिसतील. घरातील लोकांचा मूडही चांगला असेल, जो तुम्हाला आनंद देईल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि रोमान्स असेल. जोडीदाराचे करियर पुढे जाण्याच्या दृष्टीने चर्चा कराल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीच्या एखाद्या गोष्टीवर खूप खुश व्हाल आणि त्यांना मदतही कराल. प्रॉपर्टी संबंधित विषयावर चर्चा होऊ शकते. जुनी मेहनत आज कामात यश देईल.

धनु
ग्रहांचा संकेत आहे की, आज तुमचा खर्च खुप जास्त होईल, ज्यामुळे थोडा त्रास सहन करावा लागू शकतो. क्रेडिट कार्डचा सुद्धा वापर करावा लागू शकतो. अनावश्यक खर्च देखील होईल, जे नंतर ताण देऊ शकतात. उत्पन्नाच्या दृष्टीकोनातून दिवस सामान्य आहे. संततीकडून काही चांगले ऐकायला मिळू शकते. वैवाहिक जीवनात प्रेम राहील. जोडीदार एखादी नवीन डिश तयार करू शकतो. आरोग्य चांगले राहील. प्रेमसंबंधात काही समस्या जाणवतील. प्रिय व्यक्तीला भेटण्यात गैरसोय होईल.

मकर
आजचा दिवस अनुकूल आहे. पैसा येईल, ज्यामुळे आनंद होईल. प्रेमसंबंध एन्जॉय कराल आणि प्रिय व्यक्तीशी बराच वेळ चर्चा कराल. काही प्लॅनिंग देखील कराल, आणि सुटीला फिरायला जाण्याचे योग आहेत. घरातील वातावरण सकारात्मक असेल. आपल्या लोकांचे सहकार्य मिळेल. कामात यश मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात समाधानी दिसाल. आरोग्यही चांगले राहील. कामावर लक्ष केंद्रित केल्यास चांगले परिणाम मिळतील.

कुंभ
ग्रहांचा संकेत आहे की आज भाग्यशाली ठराल. आज अनेक कामे कराल. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. कामासाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबालाही वेळ द्याल. कुटूंबियांशी प्रेम वाढेल. वैवाहिक जीवनात काही अडचणी जाणवू शकतात, यासाठी एखाद्या मित्राशी बोलू शकता. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रेमसंबंधात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुमचे एखादे बोलणे किंवा एखादे काम प्रिय व्यक्तीला नाराज करू शकते. आरोग्यात घसरून होऊ शकते.

मीन
आजचा दिवस चांगला आहे. मित्र आणि नातेवाईकांशी संवाद साधण्यात वेळ घालवाल. जीवनात नाविन्य जाणवेल. उत्साह राहील. खर्चही वाढेल, जो त्रासदायक ठरू शकतो. कामात चांगले मिळतील. बॉसकडून प्रशंसा ऐकल्याने आनंदी दिसाल. कुटुंबाचा मान सन्मान वाढेल. दाम्पत्य जीवनात प्रेम वाढेल. प्रेमसंबंधात काही समस्यांसह पुढे वाटचाल कराल.