साप्ताहिक राशीफळ : 10 ते 16 मे दरम्यान ‘या’ 7 राशीच्या लोकांना मिळेल भाग्याची साथ, इतरांसाठी असा आहे आठवडा

मेष :
नकारात्मक गोष्ट सोडा आणि सकारात्मक रहा. व्यस्त, रहा मस्त रहा आणि वेळेचा सदुपयोग करा. काही कौटुंबिक समस्या होऊ शकतात. नोकरीत कामाचा अतिरिक्त भार वाढेल. बँकिंग क्षेत्राशी संबंधी लोकांना काही अडचणी असतील. व्यापार्‍यांचा काळ मध्यम आहे. प्रेमात घाई नको. दाम्पत्य जीवनात मधुरता असेल. योजनेनुसार काम करा.

वृषभ :
एका अशा व्यक्तीची भेट होईल जी जीवनाला नवीन दिशा देईल. कुटुंबाच्या जबाबदार्‍या पार पाडाल. केमिकल, औषधांचे काम करणार्‍यांसाठी काळ शुभ. घरातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याची चिंता राहील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. प्रेम संबंध मजबूत होतील. योग करा. आव्हानांचा सामना करा.

मिथुन :
बहुतांश वेळ सामाजिक कार्यात जाईल. विशेष योजना यशस्वी झाल्याने आनंदाचे वातावरण असेल. भावनांऐवजी विवेकाने काम करा. कमिशनचे काम करणार्‍यांसमोर आव्हाने असतील. घाऊक व्यापार्‍यांपेक्षा किरकोळ व्यापर्‍यांसाठी काळ ठिक. तरुणांचा जास्त वेळ मजा मस्तीत जाईल. प्रेमात मर्यादा पाळा. लक्ष्यापासून विचलित होऊ नका.

कर्क :
घर आणि बाहेर दोन्हीकडे आव्हानांचा सामना करावा लागेल, विवेक आणि धैर्याने यातून मार्ग काढाल. व्यवसायात आर्थिक व्यवहारात अत्यंत काळजी घ्या. विद्यार्थ्यांना जास्त मेहनतीची गरज आहे. प्रेमात कुणाचेही ऐकू नका. जोडीदाराच्या भावनांची उपेक्षा करू नका. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. धैर्याने काम करा.

सिंह :
आळस सोडून काम करावे लागेल, अन्यथा संधी निघून जाईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मित्र, आप्तांमध्ये प्रतिष्ठा वाढेल. कार्यक्षेत्रात सिनियर्स कामाचे कौतुक करतील. वैद्यकीय क्षेत्रासाठी काळ अनुकूल. राजकारणात मोठे पद, मोठी जबाबदारी मिळेल. प्रेमात ईगो टाळा, अन्यथा पश्चाताप करावा लागेल. जोडीदाराची साथ लाभेल. वाहन हळू चालवा. दुखापतीची शक्यता. वेळेवर कामे पूर्ण करा.

कन्या :
आरोग्याच्या बाबतीत आठवडा चांगला आहे. प्रगतीसाठी मनापासून काम करा. महिलांसाठी काळ आव्हानाचा आहे. आजारी लोकांच्या तब्येतीत सुधारणा होईल. रोजगारासाठी प्रतिक्षा वाढू शकते. प्रेमसंबंधात मजबूती येईल. घरात असूनही कामातील व्यस्तता वाढेल. आत्मविश्वास कायम ठेवा.

तुळ :
कार्यक्षेत्रात अडथळे आल्याने मन विचलित होऊ शकते. अचानक खर्च होईल. उत्पन्नापेक्षा जास्त खर्च झाल्याने चिंता वाढेल. व्यापार्‍यांसाठी वेळ मध्यम आहे. जमीन, मालमत्तेचे निर्णय तुमच्या बाजूने असतील. प्रेम मजबूत होईल. कुटुंबिय प्रेमसंबंधाचा स्वीकर करून विवाहावर शिक्कामोर्तब करतील. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.

वृश्चिक :
सुरूवातीला थोड्या चढ-उतारांसह नवीन संधी येतील. कुटुंबासोबत आनंदाने रहाल. वेळेचे व्यवस्थापन आणि मनापासून काम केल्यास मनासारखे यश मिळेल. एखाद्या प्रभावी व्यक्तीच्या मदतीने रखडलेले काम पूर्ण होईल. तब्येतीची काळजी घ्या. विद्यार्थी, तरूणांसाठी वेळ ठिक आहे. जोडीदाराची साथ लाभेल. आजचे काम उद्यावर ढकलू नका.

धनु :
जीवनाची गाडी रुळावर येताना दिसेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. आजारी लोकांच्या तब्येतीत सुधारणा होईल. व्यापारात शुभचिंतकांच्या मदतीने सकारात्मक सुधारणा होईल. उधारी वसूल होईल. कौटुंबिक मतभेदांवर तोडगा निघेल. प्रेमात घाई नको. विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळेल. निष्काळजीपणा करू नका.

मकर :
कोरोनाच्या कठिण काळात करियर, व्यवसायासंबंधी शुभवार्ता समजेल. रखडलेली कामे गती घेतील. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त राहील. मनोरंजन आणि बांधकामाशी संबंधी लोकांसाठी आव्हानाचा काळ आहे, अति उतसाह किंवा भावानांच्या आहारी जाऊ नका. प्रेमात मजबूती येतील. कठीण काळात लव्ह पार्टनरची साथ मिळेल. जोडीदाराच्या तब्येतीमुळे चिंता वाटेल. स्वताच्या आरोग्याकडे लक्ष द्या. मन शांत ठेवा.

कुंभ :
सुरूवात आव्हानांची असेल. अनेक प्रयत्न करूनही आर्थिक समस्यांवर मार्ग निघणे कठिण होईल. या दरम्यान कुणाच्याही भानगडीत पडू नका. नोकरीत जास्त भार वाढेल, न आवडणार्‍या ठिकाणी बदली होऊ शकते. व्यापार्‍यांसाठी काळ मध्यम. प्रेमात योग्य अंतर ठेवा. वाईट सवयी, नकारात्मक लोकांपासून दूर रहा. जोडीदाराची उपेक्षा करू नका. कामात तत्पर रहा.

मीन :
व्यस्तता असूनही कुटुंबासाठी वेळ काढाल. मोठ्या काळानंतर एखाद्या आवडत्या व्यक्तीची भेट होईल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ आणि कनिष्ठांचे सहकार्य मिळेल. तूप, तेल, आणि धान्याच्या व्यापार्‍यांसाठी वेळ शुभ आहे. प्रेमसंबंध मजबूत होतील, विवाहाकडे वाटचाल कराल. दाम्पत्य जीवनात मधुरता राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मनापासून काम करा.