10 ऑगस्ट 2020 : सोमवारचा दिवस ‘या’ 6 राशींसाठी ‘शुभ’, हे खास ‘लाभ’, जाणून घ्या

मेष
सर्वकाही चांगले कराल. वैवाहिक जीवनात संबंध सुधारण्यासाठी चांगले प्रयत्न कराल. भरपूर आनंद मिळेल. जोडीदाराबरोबर दिवस घालवायला आवडेल. कामात थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. कोणीतरी आपल्याविरूद्ध कट रचू शकतो. प्रेमसंबंधात चढ-उतार असतील.

वृषभ
आजचा दिवस आरोग्याच्या बाबतीत थोडा कमजोर आहे. काही लोक परदेशात जाण्याची योजना आखतील. वैवाहिक जीवनात काही तणावग्रस्त स्थिती उद्भवू शकते. जोडीदाराला राग येऊ शकतो, म्हणून काळजीपूर्वक विचार करा आणि बोला, स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. कामात आज खूप भाग्यवान ठराल. कामात यश मिळेल, ज्यामुळे मन आनंदित होईल. कौटुंबिक जीवनातही आनंदी राहाल.

मिथुन
आज आरोग्याबाबत थोडी चिंता राहील. आरोग्य कमजोर होऊ शकते. दिवस उत्पन्नास उत्तेजन देणारा ठरेल. प्रेमसंबंधात आनंदी राहाल. प्रिय व्यक्तीसोबत शांततेत वेळ घालवाल. वैवाहिक जीवनात स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. वैवाहिक जीवनात आनंद वाढविण्याचा प्रयत्न कराल. व्यापारात केलेले प्रयत्न फायदेशीर ठरतील. आज खूप धार्मिक दृष्टीकोन असेल.

कर्क
थोडी सावधगिरी बाळगा, कारण वैवाहिक जीवनात तणावपूर्ण स्थिती उद्भवू शकते. जोडीदाराच्या एखाद्या गोष्टीमुळे समस्या उद्भवू शकते. प्रेमसंबंधात काळजी घ्यावी लागेल, कारण प्रिय व्यक्ती वेगळ्या मूडमध्ये असेल. त्यांना तमचे शब्द समजणार नाहीत. कामावर लक्ष केंद्रित कराल, जेणेकरुन केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. चांगले परिणाम मिळतील. कौटुंबिक जीवन विलक्षण होईल. सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. तब्येत सुधारेल.

सिंह
भाग्याच्या मदतीने बिघडलेली मार्गी लागतील. ज्यामुळे खूप आनंद होईल. वैवाहिक जीवनासाठी चांगला काळ असेल, जोडीदार रोमँटिक आणि आनंदी असेल. वैवाहिक जीवनाचा आनंद घ्या. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्ती सामाजिक दृष्टीने पुढे जाण्यासाठी पुढाकार घेईल. आरोग्य चांगले होईल. शत्रूंवर विजय मिळवाल. खर्च होऊ शकतो.

कन्या
एखाद्या गोष्टीबद्दल मानसिक ताणतणावात असू शकता. वैवाहिक जीवन सामान्य राहील. सामान्य कामांमध्ये वेळ लागेल. कुटुंबातील वातावरण काहीसे अशांत होऊ शकते, ज्यामुळे मानसिक तणाव जाणवेल. प्रिय व्यक्तीत समन्वयाचा अभाव असल्यामुळे प्रेमसंबंधात अडचणी येऊ शकतात. विरोधकांबाबत जागृत राहा. कामासाठी दिवस सामान्य आहे.

तुळ
आरोग्यामध्ये सुधारणा होईल, परंतु फुफ्फुस आणि श्वासोच्छवासाच्या रुग्णांना त्रास होऊ शकतो. कौटुंबिक वाद होण्याची शक्यता आहे. वयस्कर लोकांचे आरोग्य बिघडू शकते. संततीकडून चांगली बातमी येईल. विद्यार्थी असाल तर अभ्यास करण्यासाठी चांगला दिवस आहे. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. प्रिय व्यक्तीसोबत गोड बोलल्याने प्रेमजीवन अधिक सुखी होईल. वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो. व्यवसायात नफा होईल. कामाच्या ठिकाणी प्रतिमा मजबूत असेल.

वृश्चिक
आजचा दिवस कौटुंबिक जीवनासाठी खूप आनंददायी आहे. कुटुंबात काही चांगल्या गोष्टी होतील. लोक एकमेकांबद्दल प्रेमाची भावना ठेवतील. प्रेमसंबंधात आनंददायक परिणाम मिळतील. प्रिय व्यक्ती मनाला आनंद देणार्‍या गोष्टी बोलेल. वैवाहिक जीवनात चढ-उतार असूनही परिस्थिती चांगली असेल. संततीकडून सूख मिळेल. कामासाठी दिवस थोडा कमजोर असू शकतो. सोबत काम करणार्‍यांशी थोडे सावध राहावे लागेल. प्रवासासाठी दिवस अनुकूल नाही.

धनु
घरातील लहान मुले आनंदी असतील. काही चांगली बातमी समजेल. सोशल मीडियावरून एखादी चांगली बातमी मिळू शकते. नोकरीसाठी अर्ज केला असेल तर कॉल लेटर मिळू शकते. खर्च वाढेल. कुटुंबाचे वातावरण ठीक राहील. कामात सहभागी व्हाल, आनंददायक परिणाम मिळतील. प्रेमसंबंधासाठी दिनमान चांगले आहे. वैवाहिक जीवनात संततीकडून चांगले परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनही चांगले राहील.

मकर
कौटुंबिक जीवन आणि काम यांच्यात समन्वय असेल, ज्यामुळे कार्यक्षमता सुधारेल. उत्तेजन देण्याची भावना मनात येईल. प्रेमसंबंधासाठी दिवस अनुकूल आहे. कुटुंबावर लक्ष केंद्रित कराल. रुचकर भोजन खायला मिळेल. पैशाच्या बाबतीत दिवस खूप आनंदाचा असेल. आर्थिक फायदा होईल.

कुंभ
प्रेमाची भावना असेल, लोकांमध्ये आपुलकी दिसून येईल. खर्च लक्षणीय वाढतील, ज्यामुळे आर्थिक ओझे वाढेल. परंतु धार्मिक आचरण कराल आणि काही उत्पन्न मिळेल. ज्यामुळे खूप समाधान मिळेल. कामात केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. विचारसरणीवर प्रभाव पडेल. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधात सुखदायक परिणाम मिळतील.

मीन
आजचा बहुतेक वेळ घरापासून दूर घालवाल. बरीच कामे होतील. कामाचा बोजा पडेल. एखाद्या गोष्टीबद्दल बॉस भडकू शकतो, सावधगिरी बाळगा. खर्च वाढेल. उत्पन्न सामान्य राहील. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीशी भांडण होऊ शकते. म्हणून विचारपूर्वक बोलावे. भाग्य चांगले असल्याने कामात यश मिळेल.