10 फेब्रुवारी राशिफळ : या 4 राशींचे बदलतील ग्रह, होईल भाग्योदय, इतरांसाठी असा आहे बुधवार

0
26
horoscope today 02 April 2021 dainik rashifal daily horoscope aaj che rashifal astrology today in marathi
file photo

मेष
आज विद्यार्थी अभ्यासात विचलित होतील. अभ्यासात अडथळे येतील. परंतु, अभ्यासाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आरोग्य थोडे बिघडू शकते. यासाठी खाण्यापिण्याची काळजी घ्या. कामात विरोधकांपासून सावध राहा, कारण ते तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतील. यामुळे मानसिक तणाव येऊ शकतो. खर्च होईल, म्हणून बचतीकडे लक्ष द्या. अन्यथा महिना अखेरीस तंगी जाणवेल. छोट्या सदस्यांसोबत जास्त वेळ घालवा कारण त्यांना तुमच्या सहकार्याची अतिशय गरज आहे.

वृषभ
आजचा दिवस संमिश्र आहे. आजूबाजूच्या लोकांशी वाद होऊ नये यासाठी चांगले आहे की आपल्या घरात राहा आणि मन शांत ठेवा. एखाद्या मंगलकार्यात सहभागी व्हाल किंवा एखाद्या शुभकार्याची घोषणा आज होऊ शकते. जर एखाद्या कामात जोखीम असेल तर ते करू नका, आज नुकसान होऊ शकते. शेयरमध्ये गुंतवणूक टाळा. जर कुणाला तुमच्याकडून सहाकार्य हवे असेल तर आवश्य करा, यामुळे मानसिक समाधान मिळेल. दिवसभर सावध राहा, कोणताही मोठा निर्णय घेऊ नका.

मिथुन
आज व्यापारात प्रगती करण्याची संधी आहे. ज्यामुळे मन प्रसन्न राहील. विद्यार्थी सुद्धा आज अभ्यासात रस दाखवतील. कामामध्ये सुद्धा आज इच्छा पूर्ण होतील. आज काही चटपटीत आणि लज्जतदार खाण्याची इच्छा होईल. एखादा छोटा प्रवास करण्याचा विचार करू शकता. आज दिवस लाभदायक आहे. यासाठी बुद्धी आणि ज्ञानाचा भरपूर लाभ मिळेल. आज कामात यश मिळेल.

कर्क
आज जुन्या आठवणी मनाला गुदगुदल्या करतील. कामात सहकार्‍यांशी ताळमेळ ठेवावा लागेल, तेव्हा अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. वरिष्ठांचा आशीर्वाद कायम राहील. जुन्या किंवा ओळखीच्या मित्राशी संपर्क होऊ शकतो. महिलां मित्र आणि नातेवाईकांचे भरपूर सहकार्य मिळेल. आज भाग्य सुद्धा मेहनतीवर अवलंबून राहील. त्याचे चांगले फळ प्राप्त होऊ शकते.

सिंह
आज जे सुद्धा कराल इमानदारी आणि मेहनतीने पूर्ण केले तर त्याचे भरपूर परिणाम मिळतील. याशिवाय आज दाम्पत्य जीवनात आनंदी दिसाल. जोडीदारासोबत सायंकाळी फिरण्याचा प्रोग्राम सुद्धा बनवू शकता. कुणाशी वाद घालण्याने मोठी समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी विशेष खबरदारी घ्या.

कन्या
आजचा दिवस आनंदाचा आहे. आनंदी वातावरणात दिसाल. कार्यक्षेत्रात लाभाची संधी मिळेल. विद्याथ्यांचे अभ्यासात मन लागेल. जोडीदाराची दिशा आज नवीन वळण घेईल. प्रवासाचा योग आहे. तसेच ईमेल किंवा एसएमएस द्वारे एखादी आवश्यक माहिती मिळेल. जमीन मालमत्तेच्या कागदपत्रांबाबत सावध राहावे लागेल. कार्यक्षेत्रात भरपूर लाभ मिळेल.

तुळ
आजचा दिवस लाभदायक आहे. अनेक समस्या होत्या ज्या आज नष्ट होण्याचे योग आहेत. परंतु एखादी महत्वाची वस्तू हरवल्याने समस्या वाढू शकते. पैशाची समस्या सुरू असेल तर ती सुद्धा दूर होईल. सायंकाळी एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. एखाद्या खास व्यक्तीची भेट होऊ शकते. बिजनेसमध्ये फायदा होईल.

वृश्चिक
कौटुंबिक जीवनात पत्नी आणि मुलांसह सुखद वेळ घालवल्याने मन प्रसन्न होईल. ऑफिसमध्ये आज विशेष बदल दिसून येईल, आणि कामे सुद्धा दिसतील. आज थोड्या मेहनतीमध्येच सन्मान मिळण्याची शक्यता आहे. चांगल्या वागण्यामुळे भरपूर फायदा होईल. काही नवे मित्र बनतील. नवीन प्रोजेक्टवर सुद्धा काम सुरू होऊ शकते.

धनु
आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायक आहे. तुमच्या राजकीय हालचाली वाढतील. एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून लाभ घ्याल, परंतु त्याच्यावर पैसे खर्च करावे लागतील. विद्यार्थ्यांचे अभ्सासात मन लागेल. जीवनाची दिशा नवीन वळण घेईल. आरोग्याची चिंता राहील, खाण्यापिण्यात सावधगिरी बाळगा. प्रॉपर्टीच्या प्रकरणात सुद्धा मार्ग निघू शकतो.

मकर
आज तुमच्या वरिष्ठ सदस्य किंवा ज्येष्ठांमुळे एखादी चिंता होऊ शकते. ज्यामुळे गोंधळलेले दिसाल. काही लहान-मोठे वाद दिवसभरात डोकं वर काढतील. परंतु चांगल्या विचारामुळे ते लवकरच संपतील. म्हणून त्रस्त होण्याची आश्यकता नाही. खर्चावर नियंत्रण राहील आणि जास्त मेहनत कराल. व्यवहारात सुधारण आणली तर दिवस फायद्याचा ठरेल.

कुंभ
कामात अजिबात घाई करू नका. नुकसान होऊ शकते. सावकाश काम केले तर फायदा होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्यावे. कौटुंबिक मालमत्तेचा लाभ मिळू शकतो. जी कामे मेहनतीने केली आहेत त्यांचे फळ मिळेल. ऑफिसमधील नवीन सहकारी कामात पूर्ण सहकार्य करतील.

मीन
आजचा दिवस भरपूर लाभाचा आहे. फिरणे आणि मनोरंजन करण्याचे सुख सुद्धा मिळेल. सहकारी कामात भरपूर मदत करतील. परंतु कुणाकडूनही जबरदस्तीने काम करून घेऊ नका. बिजनेस आणि गुंतवणूक कामात जी समस्या होती ती दूर होईल. आज नव्या लोकांच्या सहकार्याने काही नवीन कामे सुरू कराल. ज्याचा लाभ मिळेल.