10 जुलै राशी : शुक्रवार ‘या’ 7 राशींसाठी आहे ‘शुभ’, होईल ‘भाग्योदय’

मेष – आजचा दिवस उत्तम आहे. उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. आर्थिक परिस्थिती चांगली होईल. कामात केलेले प्रयत्न अर्थपूर्ण ठरतील. मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. पकड मजबूत होईल. आरोग्यही चांगले राहील. म्हणून आजचा दिवस खूप चांगला आहे. प्रेमसंबंधात रोमान्स वाढेल. प्रिय व्यक्तीला मनातील गोष्टी उघडपणे सांगाल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडाल.

वृषभ
आजचा दिवस चांगला आहे. कामात पूर्णपणे गुंतलेले राहाल. मेहनतीने कामे पूर्ण कराल. ज्याचे चांगले परिणाम मिळतील. व्यापारी वर्गाला चांगला नफा मिळण्याचे योग आहेत. काम मार्गी लागेल, यामुळे त्यात पुढे जाऊ शकता. आरोग्य मजबूत राहील. मनात नवीन नवीन विचार येतील, ज्यामुळे विचारशक्ती मजबूत होईल. आरोग्य चांगले राहील. वैवाहिक जीवनात प्रेम आणि रोमान्स वाढेल. परस्परांशी संबंध मजबूत होतील. प्रेमसंबंधात सुखद परिणाम मिळतील. प्रिय व्यक्ती तुमच्याकडे प्रत्येक इच्छा व्यक्त करेल.

मिथुन
आजचा दिवस चांगला आहे. भाग्यात थोड्या अडचणी जरूर येतील, पण कामांमध्ये अडथळे आले तरी ती पूर्ण होतील. खर्च नियंत्रित ठेवणे खूप महत्वाचे आहे, कारण तो हाताबाहेर जाऊ शकतो. उत्पन्नामध्ये थोडी घट होईल, पुढे काय करावे लागेल याचा विचार करा. कामासाठी दिवस थोडा कमजोर आहे. आरोग्य चांगले राहील. संघटित आणि शिस्तबद्ध रहा. घरगुती जीवन सामान्य राहील. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे.

कर्क
आजचा दिवस फलदायी आहे. चिंतामधून बाहेर पडून बाहेर काय वास्तव आहे ते पहावे लागेल. गरजांसाठी आपले संपूर्ण सामर्थ्य लावा आणि आपल्या जबाबदार्‍या पार पाडा. कामासाठी दिवस कमजोर आहे. वैवाहिक जीवन शांत आणि आनंदी राहील. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. खूप बातचीत कराल, प्रेम वाढेल.

सिंह
आजचा दिवस चांगला आहे. उत्पन्न वाढेल. व्यापारात नफा होईल. उत्पन्न वाढेल. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार कराल, जोडीदाराच्या सहकार्यामुळे यामध्ये मदत होईल. प्रेमसंबंधात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामात चांगले परिणाम मिळतील. आरोग्य चांगले राहील. मानसन्मान वाढेल.

कन्या
आजचा दिवस सामान्यपणे फलदायी आहे. आरोग्याची काळजी घ्या. मानसिक चिंता त्रास देऊ शकते. थोडा खर्चही होईल, परंतु उत्पन्नही चांगले होईल. कामात बुद्धीचा वापर करून कामे वेळेत पूर्ण करण्याची सवय लावून घ्या. वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. विवाहाबाबत विचार कराल.

तुळ
दिवस उत्तम आहे. अभ्यासात मेहनत कराल. नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा होईल. प्रेमसंबंध सौहार्दपूर्ण राहतील, प्रिय व्यक्तीला आनंदी ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न कराल. वैवाहिक जीवन चांगले राहील. जोडीदार कुटुंबात आपले स्थान निर्माण करेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्यात चढ-उतार होऊ शकतो. कामात काहीशी निराश वाटू शकते.

वृश्चिक
आजचा दिवस चांगला आहे. जबाबदार्‍या पूर्ण कराल. कामात चांगले परिणाम मिळतील. चांगले परिणाम म्हणून प्रमोशनचे योग आहेत. कुटुंबाच्या जबाबदार्‍याही पार पाडाला, ज्यामुळे कुटुंबातील व्यक्तींच्या नजरेत तुमचा मानसन्मान वाढेल. आरोग्य चांगले राहील. मालमत्ता खरेदी करू शकता. वैवाहिक जीवनात शांतता, प्रेम राहील. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. आज तुम्हाला एखाद्या नवीन व्यक्तीशी बोलण्याची संधी मिळेल.

धनु
आजचा दिवस सामान्य आहे. उर्जा लाभेल, जी सर्व कामांमध्ये मदत करेल. कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सक्षम राहाल. ज्यामुळे तुमच्याकडे वेळ शिल्लक राहील. विरोधकांपासून सावध राहा, ते तुम्हाला नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न करतील. कामात जास्त मेहनत करावी लागेल, यामध्ये सहकार्‍यांचे सहकार्य आवश्यक असेल. पैशाच्या बाबतीत आजचा दिवस सामान्य आहे. खर्च वाढेल. प्रेमसंबंधासाठी दिवस सामान्य आहे. वैवाहिक जीवन ठीक राहील.

मकर
आजचा दिवस फलदायी आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. यामध्ये यशस्वी व्हाल. प्रेमसंबंधात आनंदाचा काळ आहे. नाते अधिक मजबूत होईल. वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असेल. नातेसंबंधात परस्पर समन्वय आणि संबंध मजबूत होतील. कामात काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कामाचा पूर्ण परिणाम दिसणार नाही. आरोग्य सामान्य राहील

कुंभ
आजचा दिवस उत्तम आहे. आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे सर्व कामे जोरदारपणे कराल. कुटुंबातही तुमची प्रतिमा मजबूत होईल. चांगले काम कराल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल. कौटुंबिक खर्चावरही लक्ष केंद्रित कराल. कामात चांगले परिणाम मिळतील. मेहनत उपयुक्त ठरेल. प्रेमसंबंधात पुढे जाल. वैवाहिक जीवनात आज मजबूतीने उभे राहावे लागेल, आणि जोडीदाराला साथ द्यावी लागेल. कारण सध्या त्यांना तुमची गरज आहे.

मीन
आजचा दिवस सामान्य आहे. वाढत्या खर्चामुळे काळजीत राहाल. मानसिक तणावातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. उत्पन्न वाढेल, यामुळे आत्मविश्वास परत येईल. कामात चांगले परिणाम मिळतील. बॉस तुमच्यावर खुश होईल. वैवाहिक जीवन सामान्यपणे व्यतीत होईल. प्रेमसंबंधात आज काही नवी गोष्टी समजतील, ज्यामुळे तुमचे नाते अधिक मजबूत होईल.