10 नोव्हेंबर राशीफळ : कर्क आणि मिथुनसह ‘या’ 4 राशींना मिळतील चांगल्या ‘संधी’, ‘असा’ असेल मंगळवारचा दिवस

मेष
आजचा दिवस काहीसा खास असेल. रोमँटिक शैलीने प्रिय व्यक्तीस आनंद द्याल आणि भविष्याचे स्वप्न पाहाल. कामात चढ-उतार होतील, ज्यामुळे मन नोकरी बदलण्याच्या दिशेने प्रयत्न करू शकेल. व्यवसायात चांगला पैसा मिळण्याची दाट शक्यता आहे. वैवाहिक जीवनात थोडा ताण असेल. कामात यश मिळविण्यासाठी भाग्य सहकार्य करेल. अनुभवी व्यक्तीचा सल्ला मिळेल, त्यांच्या मार्गदर्शनाखाली एखादे मोठे काम कराल.

वृषभ
कौटुंबिक जीवनात सूख वाढण्याचा काळ आहे. सणासुदीच्या काळात प्रत्येकाच्या मनता आनंद असेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य कामात मिळेल. ज्यामुळे कार्यक्षेत्रातील स्थिती सुधारेल. सोबत काम करणार्‍यांसोबत चांगले वागल्याने कामाचे कौतूकास पात्र ठराल. वैवाहिक जीवनात तणावातून मुक्ती मिळेल. प्रेमसंबंधात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आरोग्य थोडे कमजोर राहण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाची शक्यता आहे.

मिथुन
आजचा दिवस व्यस्त ठेवेल. एकाच वेळी अनेक कामे पूर्ण करण्याची इच्छाशक्ती असेल. जोडीदाराशी संबंध सुधारतील, परंतु दोघांचेही आरोग्य कमजोर होऊ शकते. आव्हाने सहजपणे सोडविण्यास सक्षम असाल, ज्यामुळे कामात यश मिळेल. नोकरीत मनोबल उच्च राहील. मित्र आणि प्रियजनांबरोबर आनंददायक प्रवास कराल. पैशांच्या व्यवहारासाठी दिवस चांगला आहे.

कर्क
वाढता खर्च आता कमी होताना दिसून येईल आणि उत्पन्न वाढेल. संपत्ती जमा करण्यात यश मिळेल. कुटुंबासाठी काही पैसे देखील द्याल, जेणेकरून कुटुंबातील आदर वाढेल. ऑफिसमध्ये काही अडथळे येतील, मार्ग रोखतील, पण हुशारीने आणि कामामुळे तुम्ही यशस्वी व्हाल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. प्रेमसंबंधात सुद्धा आज समाधानाचे क्षण अनुभवण्यास मिळतील. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत ताळमेळ चांगला राहील.

सिंह
मन मजबूत होईल, मोठ्या कामात हात घालाल, जे भविष्यात फायदेशीर ठरेल. वैवाहिक जीवनासाठी चांगला दिवस आहे. एकमेकांना समजणे सोपे होईल. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील, प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवण्याची संधी देखील मिळेल. खर्च किंचित वाढेल, परंतु त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. व्यवसायाच्या बाबतीत पैशांची चांगली कमाई होईल आणि नवीन करारावर स्वाक्षरी करणे आज चांगले आहे. नोकरदारांसाठी आज मोठी भेट मिळू शकते.

कन्या
कुटुंबाच्या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्याल. संततीकडून आनंद मिळेल. काहीतरी नवीन शिकण्यास सोपे जाईल. प्रेमसंबंधासाठी चांगला दिवस आहे. प्रिय व्यक्तीशी छान गप्पा माराल आणि तिला प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल. खर्च जास्त होईल, उत्पन्नामध्ये घट होईल, परंतु तरीही कार्यालयात एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी व्हाल आणि स्थिती खूप मजबूत होईल. आरोग्याच्या बाबतीत दिवस फायदेशीर ठरेल. खरेदीसाठी जाऊ शकता, पण सावधगिरी बाळगा.

तुळ
पैसा आल्याने आर्थिक स्थिती चांगली होईल. कामात सक्रिय सहभाग घ्याल. कुटुंबातील सदस्य आनंद देतील. प्रवासात एक चांगला अनुभव मिळेल. प्रेमसंबंधात चांगले परिणाम प्राप्त होतील. प्रिय व्यक्तीसह काही चांगले क्षण घालवाल. वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची तब्येत बिघडू शकते.

वृश्चिक
आज आत्मविश्वास मजबूत होईल. भाग्याची साथ मिळेल. ज्यामुळे कामात यश मिळेल. रखडलेल्या कामात यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांची वागणूक बळकटी देईल. नात्यात प्रेम वाढेल आणि आपुलकीही वाढेल. संपत्ती जमा करण्यात यश मिळेल. कुटुंबातील लहानांचे सुख देखील मिळेल. प्रेमसंबंधांत अडचणी येऊ शकतात. वैवाहिक जीवनात तणाव येऊ शकतो. लाइफ पार्टनरशी थेट बोलणे आवश्यक असेल.

धनु
कामात यश मिळाल्याने मनामध्ये आनंद राहील. चांगले आरोग्य लाभेल. खर्च थोडा वाढेल, पण उत्पन्नही वाढेल. कुटुंबातील सदस्यांशी चांगले वागणे आवश्यक आहे. अन्यथा त्रास होईल. चांगले भोजन कराल. परंतु आरोग्याकडे दुर्लक्ष त्रासदायक ठरू शकते. प्रेमसंबंधात ऊन सावलीची स्थिती राहील. वैवाहिक जीवनात तणावातून मुक्ती मिळेल. जोडीदारासह उत्सवाची तयारी करण्यात मग्न असाल.

मकर
आज आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कारण आरोग्यामुळे खर्च देखील वाढेल. मानसिक ताणतणावही जाणवेल. कार्यालयातील काम लोकांना आवडेल. बॉस कामाची प्रशंसा करतील. उत्पन्न वाढेल, परंतु कोणतीही नवीन गुंतवणूक करणे टाळले पाहिजे. कौटुंबिक जीवन चांगले राहील. वैवाहिक जीवनात स्थिरता येईल. स्थिती अनुकूल असेल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीशी कोणतीही गोष्टी सांगण्यास संकोच करू नका.

कुंभ
आज खूप चांगल्या मूडमध्ये असाल. ऑफिसमध्ये खूप मेहनत कराल. चांगले फायदेही मिळतील. उत्पन्न वाढेल. पुढे जाण्याची संधी मिळेल. जुन्या अडकलेल्या योजना पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात प्रेम आणि आनंद मिळेल. नात्यातील जवळीक वाढेल. प्रेमसंबंधात प्रपोज करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. कौटुंबिक जीवन चांगले राहील. कामात दृढपणे पुढे जाल. अचानक एखाद्या खास मित्राची भेट होईल.

मीन
आजचा दिवस धावपळीचा असेल. कार्यालयात खूप काळजीपूर्वक काम करावे लागेल. कारण विरोधक प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात. परंतु भाग्याची साथ मिळेल. ज्यामुळे अनेक कामे होतील. काम मजबूतीने कराल. कौटुंबिक वातावरण थोडे कमजोर होऊ शकते. घरातील वृद्धांच्या आरोग्यास बिघडू शकते. खर्च जास्त होईल, परंतु आनंदी व्हाल, कारण हा खर्च सुख सुविधांवर कराल. आरोग्य सुधारेल. तणावातून मुक्त होण्यासाठी करावे लागतील.