11 जानेवारी 2021 : वृषभ आणि मिथुनसह ‘या’ 4 राशींचे ‘भाग्य प्रबळ’, इतरांसाठी ‘असा’ आहे सोमवार

मेष
आजचा दिवस अनुकूल आहे. भाग्याच्या साथ मिळाल्याने खूप चांगले परिणाम मिळतील. कामात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. मेहनत यशस्वी होईल. आज एखादी चांगली बातमी येईल. आरोग्य मजबूत होईल. मान सन्मान वाढेल. वैवाहिक जीवनात एखादा तणाव असू शकतो. प्रेमसंबंधासाठी दिवस सामान्य आहे. प्रिय व्यक्तीशी जवळीक वाढवण्याची संधी मिळेल.

वृषभ
आजचा दिवस सामान्य फलदायी आहे. ग्रहांची स्थिती दर्शवते की, चिंतांमधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावा लागेल, तरच कामे होतील, अन्यथा आरोग्य देखील बिघडू शकते. भाग्य प्रबळ राहील, ज्यामुहे कमी मेहनतीत कामे होतील. कामात प्रयत्न यशस्वी होतील. वैवाहिक जीवन उत्तम राहील. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेल.

मिथुन
आजचा दिवस आनंदाचा आहे. वैवाहिक जीवनात आनंद कसा वाढेल, याची काळजी घ्याल आणि आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवाल. पूजापाठात मन लावाल. प्रेमसंबंधात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कुठून तरी चांगले पैसे येतील ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कामात चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. आरोग्य कमजोर होऊ शकते. गुंतवणूकीचा चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.

कर्क
ग्रहांची स्थिती सूचित करते की आजचा दिवस मध्यम अनुकूल आहे. चिंता वाढेल, खर्चही वाढेल. उत्पन्नदेखील वाढेल, म्हणून बॅलन्स वाढवण्याचा प्रयत्न करा. मानसिकदृष्ट्या बळकट होण्याचा प्रयत्न केला तर खूप फायदा होईल. दाम्पत्य जीवनाचा आनंद घ्याल. प्रेमसंबंधासाठी दिवस रोमँटिक आहे. आरोग्यात चढ-उतार होईल. आज तुमच्या खास व्यक्तीसाठी एखादी चांगली भेट आणाल.

सिंह
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये रस असेल. काही नवीन बारकावे शोधाल, जे उपयोगी येतील. प्रेमसंबंधात एकमेकांसोबत चांगल्या क्षणांचा आनंद घ्याल. वैवाहिक जीवनात तणावाचा सामना करावा लागू शकतो. जोडीदाराच्या रागाला बळी पडू शकतात. कामात चांगले परिणाम मिळतील. कामात मन लागेल. आरोग्यही सुधारेल. भाग्य साथ देईल.

कन्या
आजचा दिवस मध्यम आहे. कुटुंबाकडे पूर्ण लक्ष द्याल. आपल्या आईला मनाला सांगाल. एखाद्या गोष्टीवरून वडिलांवर रागावू शकता, पण हे टाळण्याचा प्रयत्न करा. कामासाठी दिवस सामान्य आहे. बदलीचा योग आहे. प्रेमसंबंधात आनंद मिळेल. प्रिय व्यक्तीसोबत भविष्याबाबत चर्चा कराल, ज्यामुळे मन आनंदित होईल. त्यांच्याबरोबर फिरायला जाऊ शकते.

तुळ
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मित्र आणि कुटुंबातील लहान सदस्यांसह चांगला वेळ घालवाल. खुप गप्पागोष्टी होतील, ज्यामुळे मन हलके होईल. मानसिक ताण येणार नाही. आरोग्यही चांगले राहील. दाम्पत्य जीवनात जोडीदाराचे वागणे त्रस्त करू शकते. प्रेमसंबंधासाठी दिवस थोडा कमजोर आहे. कामात चांगले परिणाम मिळतील. आरोग्य कमजोर होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्या. खाण्याकडे लक्ष द्या.

वृश्चिक
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबाच्या गरजा लक्षात घ्याल. घरात एखाद्या गोष्टीवर चर्चा होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. विवाहित जीवनात प्रेम वाढेल. रोमान्सदेखील भरपूर राहील. प्रेमसंबंधासाठी दिवस सामान्य आहे. प्रिय व्यक्ती कुठेतरी जाण्याचा आग्रह धरू शकते. कामात चांगले परिणाम मिळतील. आरोग्यही सुधारेल. गुंतवणूकीबाबत विचार कराल.

धनु
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. आज स्वत: बद्दल विचार कराल आणि स्वत:साठी खरेदी कराल. याशिवाय ध्यान आणि प्राणायामात वेळ घालवाल. आरोग्य मजबूत होईल. पैसे येतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. खर्चही होईल पण कमी. कामात जासत मेहनत सुरूच राहील. वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक जीवनाकडे समान लक्ष द्याल.

मकर
आजचा दिवस मध्यम फलदायक आहे. आरोग्याची काळजी घ्या आणि चिंतेपासून सुद्धा दूर रहाण्याचा प्रयत्न करा. वाढता खर्च चिंता वाढवू शकतो. कामात अधिक प्रयत्न केल्यासच यश मिळेल. आजचा दिवस प्रेमी युगुलांसाठी प्रेम आणि रोमान्सने भरलेला आहे. वैवाहिक जीवन आनंद देईल. जोडीदार मन जिंकण्याचा प्रयत्न करेल.

कुंभ
आजचा दिवस अनुकूल आहे. उत्पन्न वाढेल. कुठूनतरी पैसे येतील ज्यामुळे खूप आनंद होईल. आत्मविश्वास वाढेल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. प्रेमी युगुलासाठी सुद्धा दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्ती तुमची एखादी गोष्ट मान्य करेल ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. सर्व समरस होतील. आज आरोग्याची काळजी घ्या कारण आजारी पडू शकता.

मीन
आजचा दिवस अनुकूल आहे. कामावर पूर्ण लक्ष द्याल, ज्यामुळे चांगले परिणाम मिळतील. कुटुंबातील सदस्यांचा देखील पाठिंबा मिळेल. ज्यामुळे खूप आनंदी व्हाल. वैवाहिक सुखाचा आनंद घ्याल. कुटूंबाशी, मित्रांशी आणि शेजार्‍यांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधासाठी एक अद्भुत दिवस आहे. प्रिय व्यक्ती आपले प्रेमाचे व्यक्त करेल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल.