11 जुलै राशिफळ : शनिवारी ‘या’ 4 राशींच्या मार्गात येतील ‘अडथळे’, ‘सावध’ राहा

 

मेष
आजचा दिवस फलदायी आहे. खर्च वाढतील. परंतु संपत्ती खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम खर्च करू शकता, जे तुमच्यासाठी चांगले असेल. काम पूर्ण होईल आणि चांगला परिणाम मिळेल. भाग्य मजबूत राहील. धार्मिक कार्य होईल. तब्येत ठीक राहील. वैवाहिक जीवन चांगले राहील, परंतु जोडीदार एखाद्या गोष्टीवरून रागावू शकतो. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे.

वृषभ
आजचा दिवस उत्तम आहे. तुमचे उत्पन्नही वाढेल. आरोग्य चांगले राहील. खूप आनंदी व्हाल. बरीच कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. नोकरीत थोडे कमजोर राहू शकता, यासाठी जास्त मेहतन करावी लागेल. गंभीर विचारांमध्ये मग्न राहाल. वैवाहिक जीवनात आनंदी राहील. नात्यात रोमान्स असेल. प्रेमसंबंधात दिनमान सामान्य राहील.

मिथुन
आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी आहे. आरोग्यात चढ-उतार होऊ शकतो. परंतु कामात चांगले परिणाम मिळतील. कामात मजबूती मिळेल. वैवाहिक जीवनात चढ-उतार अनुभवाल. प्रेमसंबंधात सुंदर क्षण घालविण्याची आणि मनातील बोलण्याची संधी मिळेल. यामुळे प्रिय व्यक्तीदेखील आनंदी होईल.

कर्क
आजचा दिवस चांगला आहे. कठोर मेहनतीने यश मिळेल. आरोग्य सामान्य राहील. एखाद्या मोठ्या प्रवासाचा बेत आखाल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमसंबंधासाठी दिनमान खूप चांगले आहे. नात्यात रोमान्स कायम राहील.

सिंह
आजचा दिवस कमजोर असू शकतो. आरोग्यात चढ-उताराची स्थती राहील. अचानक खर्च वाढेल. एखादा अनावश्यक प्रवास करावा लागेल. नोकरीसाठी दिनमान चांगले आहे. वैवाहिक जीवनात ताणतणाव राहील. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगली आहे. प्रिय व्यक्तीला आनंदी ठेवाल.

कन्या
आजचा दिवस चांगला आहे. व्यापारात मोठे यश मिळेल. एखादा नवीन सौदा कराल. कामात चांगले परिणाम मिळतील. नोकरीत कामे चांगल्या प्रकारे मार्गी लागतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तीच्या आनंदासाठी खुप काही कराल.

तुळ
आजचा दिवस फलदायी आहे. खर्च जास्त होईल. उत्पन्न सामान्य राहील. यासाठी आर्थिक परिस्थितीकडे लक्ष द्या. वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात. प्रेमसंबंधात आनंदी राहाल. कुटुंबात थोडे अंतर राहील. खूप व्यस्त राहिल्यामुळे कामात चांगले परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनात मोठ्या व्यक्तीचे मागर्दशन मिळेल.

वृश्चिक
आजचा दिवस चांगला आहे. प्रेमसंबंध आनंदाने भरलेले राहतील. विवाहितांसाठी सुद्धा दिवस खूप चांगला आहे. नात्यात आकर्षण आणि रोमान्स वाढवेल. एकमेकांच्या जवळ याल. नोकरीसाठी दिनमान कमजोर आहे, म्हणून काळजीपूर्वक काम करा. कोणालाही फसवू नका आणि कोणालाही कमजोरी सांगू नका. आरोग्यात चढ-उतार राहील.

धनु
आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबात आनंद राहील, परंतु एखाद्या गोष्टीवरून आईसोबत भांडण होऊ शकते, म्हणून काळजी घ्या. वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. नोकरीसाठी चांगला दिवस आहे. कामाला गती येईल. व्यापारी वर्गाला अधिक काळजीपूर्वक काम करावे लागेल.

मकर
आजचा दिवस फलदायी आहे. कामासाठी प्रवास करण्याची आवश्यकता भासू शकते. तुमचे धैर्य कायम राहील, ज्यामुळे कामे जलद पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात सामान्य राहील. धार्मिक कार्यात खर्च कराल. प्रेमसंबंधासाठी दिवस खूप चांगला आहे. प्रेम आणि रोमान्स वाढेल.

कुंभ
आजचा दिवस आनंदाचा आहे. घरात एखादी नवीन वस्तू आल्यामु आनंद वाढेल. कुटुंबात समरसता राहील. खर्च वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. पायाचे दुखणे होऊ शकते. कामात चांगले परिणाम मिळतील. वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमसंबंधासाठी दिवस चढ-उतारांचा राहील.

मीन
आजचा दिवस उत्तम आहे. खुप मजबूत इच्छाशक्तीने दिवसाची सुरुवात कराल. खुप निश्चयाने सर्व कामे पूर्ण कराल, ज्यामध्ये लवकर लवकर यश मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदार प्रेरणा देईल. प्रेमसंबंधात एखाद्या निराशेचा सामना करावा लागू शकतो. मित्रांशी संभाषण होईल. कामात खूप मेहनत केल्यानंतर यश मिळेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like