11 ऑक्टोबर राशिफळ : ‘रवि पुष्य’ शुभयोग होणार असल्याने मिथुन व धनु राशिसह 7 राशींचा होणार ‘भाग्योदय’

मेष
आज कुटुंबाच्या स्थितीबद्दल चर्चा कराल आणि आईशी बोलाल, ज्यामुळे शांती मिळेल. कामात केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. ऑफिसच्या कामातून कुठेतरी जाण्याची ऑर्डर मिळू शकते, म्हणून आजचा दिवस व्यस्त असेल. विवाहित लोकांचे जीवन परस्पर समन्वयाने पुढे जाईल, जोडीदार कामात देखील मदत करेल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीच्या प्रेमात रंगलेले दिसाल आणि खूप रोमँटिक वाटेल. कोर्ट कचेरीशी संबंधित बाबी फायदेशीर ठरतील. आरोग्यात चढ-उतार होईल.

वृषभ
आज उत्साह भरपूर असेल. घरातील वातावरण शांतता देईल. मित्रांच्या जवळ असाल आणि त्यांच्याबरोबर बराच वेळ घालवाल. उत्पन्न वाढविण्यासाठी एखादी नवीन कल्पना मित्रांना देऊ शकता, यावर चांगली चर्चा होईल आणि संपूर्ण दिवस खूप व्यस्त जाईल. आज विवाहित व्यक्तींचे जीवन थोडे कमजोर असेल, म्हणून शांतता राखणे चांगले. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीच्या आर्थिक जीवनात हस्तक्षेप करणे टाळा. घरात शुभकार्य होईल आणि आरोग्य चांगले राहील.

मिथुन
आजचा दिवस कुटुंबातील सदस्यांसाठी असेल, ते चांगले भोजन करतील आणि खूप विश्रांती घेतील. घर विकत घेण्याची योजना असेल तर त्याबद्दल चर्चा पुढे जाईल. जोडीदाराची समज प्रत्यक्ष दिसेल आणि कौटुंबिक बाबींमध्ये तिचा हस्तक्षेप असेल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीच्या प्रेमात खूप आनंदी राहाल आणि आजचा दिवस तिच्यासोबत एन्जॉय करण्यात घालवायला आवडेल. रिक्त वेळेत येत्या आठवड्याची तयारी करा.

कर्क
आजचा दिवस उत्तम आहे. काम वेगवान होईल. प्रलंबित असलेली सर्व कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे व्यस्त राहाल. थोडे थकल्यासारखे वाटेल, तरीही तुमची तब्येत ठीक राहील. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न कराल आणि त्यात यशस्वीही होऊ शकता. कौटुंबिक वातावरण शांत असेल. घरगुती जीवनाबद्दल मनात शंका असेल, परंतु कोणतीही अडचण नाही, म्हणून आनंदी रहा. प्रेमसंबंधात एखाद्या गोष्टीबद्दल संशय असू शकतो.

सिंह
आजचा चढ-उतारांचा आहे. बरीच कामे लक्ष वेधून घेतील, जेणेकरून दिवस धावपळीत घालवाल आणि आराम करू शकणार नाही. आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. विवाहित व्यक्तींचे जीवन चांगले असेल. जोडीदार उपयोगी पडेल आणि काही समस्या त्यांना सांगाल. सासरच्या लोकांशी भांडणाची शक्यता आहे, म्हणून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. प्रेमसंबंधात नात्यावर समाधानी असाल आणि यामुळे चेहर्‍यावर हसू येईल.

कन्या
आजचा दिवस नवा उत्साह देईल. उत्पन्न चांगले होईल. प्रेमसंबंधात भावना उघडपणे दर्शवाल. यामुळे आतून मोकळे व्हाल. खर्चावर नियंत्रण ठेवले पाहिजे. अन्यथा समस्या उद्भवू शकतात. विवाहित व्यक्तींचे जीवन तणावपूर्ण असू शकते, म्हणून असे कोणतेही काम करू नका, ज्यामुळे स्थिती बिघडेल. भाग्य प्रबळ असल्याने कठोर मेहनत न करताही काम पूर्ण होईल. ज्यामुळे आनंद होईल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल.

तुळ
स्वतःवर विश्वास असेल तर कोणतेही काम कठीण नाही. आज तुमच्या बाबतीत असेच होईल. स्वतःवर विश्वास ठेवा, जेणेकरून काम यशस्वी होईल. काम आणि क्षमता याबद्दल मोठा उत्साह असेल. कुटुंबासाठी काहीतरी विशेष करण्याचा विचार कराल. कुटुंबात आनंद असेल. मंदिरात जाऊन काही काळ दर्शन घेतल्याने शांती प्राप्त होईल. विवाहित लोकांनी जीवनाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. प्रेमसंबंधात मित्राच्या मदतीने कुटुंबातील सदस्यांना प्रिय व्यक्तीची ओळख करुन देऊ शकता, ज्यामुळे नाते घट्ट होईल.

वृश्चिक
आजच्या दिवशी एखाद्या प्रवासाला जाऊ शकता. हा प्रवास कामाच्या अनुषंगाने देखील असेल आणि त्यासह फिरण्याची योजना देखील बनवू शकता. यातून केवळ बरे वाटणार नाही तर मानसिक ताजेतवाने देखील व्हाल. एखाद्या गोष्टीमुळे गोंधळाची स्थिती राहील. जोडीदाराबरोबर काही तणाव असेल तर तो घालवण्यासाठी त्याच्यासोबत चर्चा करा. प्रेमसंबंधात आज थोडे निराश होऊ शकता. कारण प्रिय व्यक्ती रागावू शकते आणि वाईट बोलू शकते. यामुळे शांत राहणे फायदेशीर ठरेल. आरोग्याचीही काळजी घ्या. एखाद्या मित्राला तुमच्या मदतीची आवश्यकता असेल.

धनु
आज तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. कोणतीही नवीन कामे हातात घेणे चांगले ठरणार नाही. अडचणी येऊ शकतात, म्हणून जुन्या योजनांचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करा. कायद्याच्या कामांपासून दूर रहा. गडबड झाल्याने त्रास सहन करावा लागू शकतो. योग्य आणि हुशार आहात. या अनुभवाचा फायदा घेऊन आपले कौटुंबिक जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधात मनातील अस्वस्थता दूर करण्यासाठी प्रिय व्यक्तीशी बोला आणि तिच्या सोबत थोडा वेळ घालवा. घरामध्ये मालमत्तेवरून वाद होऊ शकतो, म्हणून सावधगिरी बाळगा.

मकर
मनामध्ये एकांतपणाची भावना असेल, परंतु स्वतःला एकटे समजण्याचा विचार टाळा, कारण यामुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो. मात्र, धैर्याची कमतरता भासणार नाही आणि अचानक बिघडलेली कामेसुद्धा मार्गी लागण्यास सुरूवात होईल, ज्यामुळे खूप खर्च होईल. आज जोडीदार तुमच्या चेहर्‍यावर हास्य आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीला बोलून खुश ठेवण्याचा प्रयत्न कराल. भविष्यातील योजनांबाबत त्यांच्याकडे बोलाल. आरोग्यही मजबूत राहील.

कुंभ
आज कुटुंबातील सदस्य एकत्र येतील. त्यांच्या मदतीने आपण एखादे काम करण्यात यशस्वी व्हाल, ज्यामुळे उत्पन्न देखील वाढवू शकते. ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद टाळण्याचा प्रयत्न करा. विवाहित लोकांच्या जीवनात प्रणय वाढेल, ज्यामुळे खूप रोमँटिक वाटेल. सासरच्या माणसांना भेटून खूप बोलाल. प्रेमसंबंधात लग्नाचे स्वप्न पाहण्यास सुरूवात कराल, कारण तुमचा चांगला काळ आला आहे.

मीन
उधार दिलेले पैसे परत येण्याची वेळ आली आहे. संततीबद्दल खूप आश्वास्त असाल. त्यांच्याकडून एखादी चांगली बातमी प्राप्त होईल. वैवाहिक जीवनाविषयी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे कारण मतभेदामुळे समस्या उद्भवू शकतात. कार्यालयात आपली स्थिती मजबूत राहील. तुमचे काम बोलेल. अति आत्मविश्वास टाळा. प्रेमसंबंधात नात्यात खूप आनंदी राहाल. प्रिय व्यक्तीसाठी भेटवस्तू आणाल.