12 जुलै राशिफळ : ‘रविवारी’ तुमच्या ‘भाग्या’त काय आहे, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन

मेष
आजचा दिवस सामान्य फलदायी आहे. मानसिक चिंता वाढू शकते. मालमत्तेसंदर्भात कोठेही पैसे देऊ शकता. खर्च वाढेल, उत्पन्न सामान्य राहील. भाग्याची साथ महबूत असल्याने कामांमध्ये यश मिळेल. वैवाहिक जीवन शांततामय राहील. प्रेमसंबंधात नवीन माहिती मिळेल. ज्यामुळे प्रिय व्यक्तीच्या आणखी जवळ जाऊ शकता. आरोग्य सामान्य राहील.

वृषभ
आजचा दिवस चांगला आहे. उत्पन्न वाढेल. खर्च कमी होईल. मानसिक ताणातून मुक्त व्हाल. कामासाठी दिनमान चांगले आहे. भाग्याची साथ लाभेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. नात्यात प्रेम वाढेल. प्रेमसंबंधात आज संमिश्र परिणाम मिळतील.

मिथुन
आजचा दिवस उत्तम आहे. कामात मोठे यश मिळेल. पकड मजबूत होईल. तब्येत सुधारेल. वैवाहिक जीवनात भविष्यासाठी प्लॅनिंग कराल. प्रेमसंबंधात दिवस सामान्य आहे.

कर्क
आजचा दिवस उत्तम आहे. वैवाहिक जीवनात समाधानी राहाल. जोडीदार प्रामाणिकपणाने साथ देईल. प्रेमसंबंधात आज आनंददायी वेळ मिळेल. रोमान्सची संधी देखील मिळेल. नोकरीत बदलीची ऑर्डर येऊ शकते. खर्च जास्त होईल. उत्पन्न सामान्य राहील. आरोग्य चांगले राहील

सिंह
आजचा दिवस थोडा कमजोर आहे. एखाद्या गोष्टीमुळे चिंताग्रस्त होऊ शकता. एखाद्या ठिकाणी पैसे अडकू शकतात, त्यामुळे आज गुंतवणूक करू नका. उत्पन्न ठीक होईल. वैवाहिक जीवनात चढ-उतार येतील. प्रेमसंबंध सामान्य राहतील. आरोग्य चांगले राहील.

कन्या
आजचा दिवस चांगला आहे. कामात यश मिळेल. परंतु तरीही आपल्या मनातील गोष्ट कोणालाही सांगू नका. अन्यथा ते चुकीचा फायदा घेऊ शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहील. एखादी प्रॉपटी खरेदी करण्याबाबत जोडीदाराशी चर्चा करू शकता. प्रेमसंबंधात आनंददायक परिणाम मिळतील. आरोग्यही चांगले राहील, यामुळे दिवस चांगला जाईल.

तुळ
आज थोडे समजदार होऊन वाटचाल करा. सर्वत्र पाहून पुढे जावे लागेल. खर्च वाढेल. वाहन काळजीपूर्वक चालवा. वैवाहिक जीवनात काही अडचणी येतील, म्हणून शांततेत काम करा. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीसोबत बरेच काही बोलण्याची संधी मिळेल. आरोग्यात चढ-उतार होईल.

वृश्चिक
आजचा दिवस उत्तम आहे. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीला खुश ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न कराल. एखादी भेट देखील देऊ शकता. वैवाहिक जीवनासाठी दिवस खूप चांगला आहे. नातेसंबंधात रोमान्स राहिल. दिवस सुंदरपणे जगा. कामात थोडी सावधगिरी बाळगा. तुमच्याविरूद्ध होणार्‍या षडयंत्रांपासून सावध राहावे लागेल. तब्येत ठीक होईल.

धनु
आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबाची जबाबदारी पार पाडाल. घरासाठी एखादा मोठा खर्च कराल, किंवा घरबांधण्यासाठी पैसे खर्च कराल. कामासाठी दिनमान चांगले आहे. मेहनतील यश येईल. आरोग्य चांगले राहील. वैवाहिक जीवन शांततामय राहील. प्रेमसबंधासाठी दिवस उत्तम आहे. आज प्रिय व्यक्तीची कुटूंबाशी ओळख करून देऊ शकता किंवा भेट घडवून आणू शकता.

मकर
आजचा दिवस सामान्य आहे. मेहनतीने काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. उत्साह जास्त राहील, ज्यामुळे कामात यश मिळेल. वैवाहिक जीवनही सुखी राहील. प्रेमसंबंधात रोमान्स राहील. आजचा दिवस मुक्तपणे जगाल, फक्त खर्चाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

कुंभ
आजचा दिवस सामान्य आहे. खर्चात थोडीशी वाढ होऊ शकते, काळजी घ्यावी लागेल. परंतु आज असे काही काम कराल की, तुमच्या हातात पैसे येतील. वैवाहिक जीवन ठीक राहील. प्रेमसंबंधात थोडा ताण जाणवू शकतो. नोकरीसाठी दिवस चांगला आहे. कामावर लक्ष केंद्रित केल्याने यश मिळेल.

मीन
आजचा दिवस सामान्य आहे. मानसिक ताण नियंत्रणात ठेवल्यास बरीच कामे होतील. आर्थिक फायदा होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. थोडे वाद होऊ शकतात, परंतु त्यामध्ये सुद्धा प्रेम असेल. प्रेमसंबधात चांगले परिणाम मिळतील, प्रेम मुक्तपणे एन्जॉय कराल, प्रिय व्यक्तीच्या सहवास अनुभवाल. नोकरीसाठी दिवस चांगला आहे. कुटुंबात एखाद्याची तब्येत बिघडू शकते, काळजी घ्या.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like