12 मार्च राशीफळ : ‘या’ 7 राशीच्या लोकांना मिळणार ‘ग्रह-नक्षत्रां’ची ‘साथ’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मेष – आजचा दिवस चांगला आहे. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. वाढलेल्या खर्चातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला, रोमान्स वाढेल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीला मनातील गोष्ट सांगितली तर नाते अधिक चांगले होईल. कुटुंबाचे वातावरण शांत राहिल. कामात मेहनतीचे चांगले परिणाम दिसून येतील. शत्रूंपासून सावध राहा.

वृषभ
आजचा दिवस सामान्य आहे. आरोग्य चांगले राहिल्याने मन आनंदीत राहील. खर्च वाढेल. वैवाहिक जीवनासाठी दिवस कमजोर आहे, जोडीदाराशी वाद होऊ शकतो. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस खुप आकर्षक ठरेल. प्रिय व्यक्तीसोबत प्रेमाचे क्षण घालवाल. कामात दिवस तुमच्याबाजूने राहिल, चांगले परिणाम दिसून येतील. भाग्य साथ देईल. कामात यश मिळेल. कौटुंबिक जीवन चांगले राहिल.

मिथुन
आजचा दिवस सामान्य आहे. प्रेमसंबंधासाठी दिवस खुप चांगला आहे. रोमान्सची संधी मिळेल. प्रिय व्यक्तीला एखादी भेट द्याल. कौटुंबिक वातावरण चांगले राहिल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनात थोडा तणाव जाणवेल. व्यापारात चांगले परिणाम दिसून येतील. कामात मेहनत वाढवावी लागले, तेव्हा चांगले परिणम दिसून येतील.

कर्क
आजचा दिवस अनेक बाबतीत खास आहे. आरोग्यासंबंधी समस्यांमधून मुक्ती मिळेल. आरोग्यात सुधारणा होईल. वैवाहिक जीवनातील तणावातून मुक्ती मिळेल. व्यापारात खुप चांगले परिणाम दिसून येतील. प्रेमसंबंधासाठी दिवस सामान्य आहे. नोकरीत कामाला लागा, तरच चांगले परिणाम दिसतील. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास समाधान कायम राहिल. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला आहे. उत्पन्नात वाढ होईल.

सिंह
आजचा दिवस खुप चांगला आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे ऐकुण घ्याल, समजून घ्याल. यामुळे नाते मजबूत होईल. कामात प्रयत्नांना यश येईल. काही लोकांना बदलीचे योग आहेत. व्यापारात पूर्णपणे झोकून काम केल्यास चांगले परिणाम दिसून येतील. कुटुंबाचे वातावरण आनंदी राहिल. प्रेमसंबंधासाठी दिवस थोडा कमजोर आहे. वैवाहितांमध्ये आनंद कायम राहिल. संततीबाबत मोठा निर्णय घेऊ शकता.

कन्या
आजचा दिवस सुखद परिणाम घेऊन येईल. शत्रूची चाल तुमच्यासमोर चालणार नाही. कामात चांगले परिणाम मिळतील. सुख मिळवण्याची इच्छा तीव्र होईल. खर्च खुप वाढेल. वैवाहिक जीवनात आनंद राहिल, मधेच तणावही वाढू शकतो, यामुळे कुटुंबातील वातावरणही बिघडू शकते, याकडे लक्ष द्या. प्रेमसंबंधात चांगले परिणाम दिसून येतील.

तुळ
आजचा दिवस थोडा चढ-उताराचा आहे. कामात बाहेर जावे लागेल, यामुळे कुटुंबाची कामे अडकून राहतील. यामुळे कुटुंबातील लोक संतापतील. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. नाते अधिक घट्ट होईल. जोडीदार काहीतरी खास चर्चा करेल, ती तुम्हाला आवडेल. प्रेमसंबंधात नाते आणि प्रेम अधिक मजबूत होईल. जुन्या मित्रांना भेटू शकता, त्यांच्यासोबत वेळ घालवू शकता.

वृश्चिक
आजचा दिवस आव्हानांचा आहे. कुटुंबात चाललेल्या समस्या सोडवण्यात वेळ जाईल. कामात खुप लक्ष द्यावे लागेल तसेच मेहनत करावी लागेल, तरच चांगले परिणाम मिळतील. व्यापारासाठी दिवस चांगला आहे. उत्पन्नात वाढ होईल. दाम्पत्य जीवनासाठी दिवस सामान्य आहे. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस कमजोर आहे. कुटुंबातील तणावाचा तुमच्यावर परिणाम राहिल.

धनु
आजचा दिवस सुखद परिणाम घेऊन येईल. तुमचे पूर्ण लक्ष कामात असेल, यामुळे चांगले परिणाम दिसून येतील. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तीला खुश ठेवाल, भेट देऊ शकता. वैवाहिक जीवनात आज आनंदाचे क्षण येतील. आरोग्य मजबूत राहिल. धार्मिक कामात भाग घ्याल. समाजात नाव होईल.

मकर
आजचा दिवस चांगला आहे. एखाद्या महत्वाचा निर्णय घ्याल. वैवाहिक जीवनात चांगले परिणाम मिळतील. प्रेमसंबंधात काही समस्यांना तोंड द्यावे लागेल. आज एखाद्या दूरच्या प्रवासाला जाण्याचा विचार कराल. जोडीदाराला सोबत घेऊन जाल. नात्यात मधुरता येईल. उत्पन्न वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि कामात विचार आणि दूरदर्शीपणा ठेवल्यास चांगले परिणाम दिसून येतील.

कुंभ
आजचा दिवस तुमच्यासाठी कमजोर आहे. आरोग्य बिघडू शकते. उत्पन्नात घसरण होईल. व्यापारात चांगले परिणाम मिळतील. काही माध्यमातून पैसा मिळेल. पण मन समाधानी होणार नाही. नोकरीत जास्त मेहनत करावी लागेल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. विवाहितांसाठी दिवस चांगला आहे.

मीन
आजचा दिवस खुप चांगला आहे. उत्पन्नात जबरदस्त वाढ होईल. केवळ भाग्यावर अवलंबून न राहता मेहनत केल्यास जास्त चांगले परिणाम दिसून येतील. नोकरीत दिवस तुमच्या बाजूने असेल. दाम्पत्य जीवनात आनंद येईल. प्रेमसंबंधात सुखद परिणाम दिसून येतील. व्यापारात धनप्राप्ती होईल, यामुळे मन आनंदीत होईल. नव्या उर्जेसह प्रत्येक काम कराल.