12 ऑक्टोबर राशीफळ : मिथुन, कन्या आणि मीन राशीसह ‘या’ 4 राशींना धनलाभाचा योग, सोमवारचा दिवस असा असेल

 

मेष
जर अंतःकरणात आनंद असेल तर काहीच कठीण नाही. आज आपल्या बाबतीतही तेच घडेल. मनापासून खूप आनंद होईल. आईला भेटवस्तू देण्याची इच्छा होईल. तिची सेवा करण्याची इच्छा मनात निर्माण होईल. ऑफिससंबंधी तुमची वागणूक पूर्णपणे भिन्न असेल. आज खूप आत्मविश्वास असेल. कामाबद्दल खूप परिपक्व व्हाल. वैयक्तिक जीवनात काही आव्हाने असतील, ती पार करण्याचा प्रयत्न कराल.

वृषभ
शेजार्‍यांशी चांगल्या संबंधांचा फायदा होईल. मित्रांसमवेत काही खास विषयावर चर्चा होईल, ज्यामुळे मन आनंदित होईल. उत्पन्नासंदर्भात स्थिती मजबूत असेल, मेहनतीचा लाभ मिळेल. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा कामी येईल. व्यवसायात दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे टाळा. अन्यथा, एखाद्या मोठ्या समस्येचा सामना करावा लागेल. बहिणीकडून एखादी भेट मिळू शकते. प्रेमसंबंधाबाबत मोठा निर्णय घेण्याचा दिवस.

मिथुन
अशी एखादी समस्या त्रासदायक होऊ शकते, जिच्याबद्दल तुम्हाला माहिती नाही, परंतु जर आपला थोडा संयम ठेवाला तर ही समस्या आपोआप दूर होईल. सढळ हाताने खर्च करणे टाळा. कारण खिशाला भारी पडेल. कामात स्थिती चांगली असेल. रिअल इस्टेटशी संबंधित बाबींमध्ये फायदा होईल. सरकारी क्षेत्रातील कोणतेही काम अडकले असेल तर ते आज पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे उत्पन्न देखील सुधारेल. जोडीदारासोबत बिझनेस करताना लाभा होण्याचा दिवस आहे किंवा तुमच्या कामात त्यांचा सल्ला घेतला तर चांगले होईल.

कर्क
आज मनामध्ये खूप भावनिकता निर्माण होईल. एखादी जुनी आठवण ताजी झाल्याने थोडे गंभीर व्हाल. डोळ्यांतून अश्रू येऊ शकतात. परंतु कुणाची तरी आठवण असेल जी तुम्हाला समाधान देईल. ज्यामुळे शांती मिळेल. आज कुणाच्या तरी सोबतीची गरज भासेल. यासाठी जोडीदाराला आपल्या मनातील सांगा. तो तुम्हाला साथ देईल. प्रेमसंबंधात गैरसमज वाढू देणे ही नात्यातील कमजोरी आहे. तो टाळण्याचा प्रयत्न करा. कामाबद्दल स्थिती चांगली आहे. प्रयत्न सार्थकी ठरतील, परंतु एखाद्या जुन्या कर्मचार्‍यामुळे समस्या उद्भवू शकते.

सिंह
गुंतवणूकीसाठी दिवस चांगला आहे. आज गुंतवणूक केली तर चांगला नफा मिळेल, दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणे चांगले. कामाच्या बाबतीत तुमच्या मनात अनेक योजना असतील, त्या अंमलात आणण्याचा आजचा दिवस आहे. काळजी न करता आपले काम करा. विचारपूर्वक संवाद साधा, कुणाला तरी आपल्या वाणीने आकर्षित कराल. चुकीचे बोलून त्यांच्या नजरेतील तुमचा आदर कमी करू नका. वैयक्तिक जीवनासाठी दिवस शांततेचा आहे.

कन्या
पैसे येणे चांगले आहे, परंतु पैसे टिकवून ठेवणे आणि त्यांची वाढ करण्यात खरी क्षमता आहे. आज आपण यावर लक्ष केंद्रित कराल. लक्ष गुणवत्ता वाढवण्यावर असेल. एखाद्या गोष्टीबद्दल मनात अभिमानाची भावना जाणवेल. त्याद्वारे आत्मविश्वास वाढेल. कुटुंबात पूजा किंवा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो. प्रेमसंबंधात आज एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. ज्यामुळे मूड पूर्णपणे फ्रेश होईल. ग्रहांची स्थिती कौटुंबिक जीवनात तणाव दर्शवित आहे.

तुळ
आईवडिलांबद्दल प्रेमाची भावना असेल. आपल्याला वाटेल की बराच वेळ निघून गेला, परंतु आपण त्यांच्यासाठी काहीही केले नाही. अशी भावना मनात येईल आणि त्यांच्याबद्दल विचार कराल. विमा पॉलिसी घेताना काळजी घ्या आणि कोणचीही हमी घेऊ नका. कोर्ट कचेरीशी संबंधित बाबी यशस्वी ठरतील. कामात भावनिक होण्याचे टाळावे. कामाशी मतलब ठेवा. वैयक्तिक जीवनाची स्थिती खूप सुंदर असेल. नात्याला न्याय देऊ शकाल.

वृश्चिक
तुमच्या मनात चाललेया द्वंदातून मुक्तता मिळेल. इश्वाराला शरण जाल, आणि काही काळ तेथे घालवल्यानंतर हलके वाटेल. प्रेमसंबंधात भांडण तंटा हे विषासारखे काम करते. ते टाळण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनात समाजाबद्दल थोडी हिनतेची भावना येऊ शकते. कामात सजग असाल, कारण तुम्हाला तुमचे हक्क आणि कर्तव्य या दोन्हीचे ज्ञान आहे. यामुळे अधिकारीसुद्धा तुमच्यावर खुश असतील. वैवाहिक जीवन आणखी चांगले करण्यासाठी प्रेरणा मिळेल.

धनु
आरोग्याबाबत निष्काळजी राहणे हानिकारक ठरू शकते. सकाळी व्यायामासाठी जा. दिवस गुंतवणूकीसाठी चांगला नाही, सावधगिरीने पुढे जा. कौटुंबिक जीवनात सुसंवादी वृत्ती खूप आनंदी ठेवेल. सरकारी नोकरीची इच्छा पूर्ण होऊ शकते. प्रेमसंबंधात प्रत्येक गोष्ट परस्पर संवादातून सोडविली जाऊ शकते. कामात इतके मजबूत असाल की, तुमच्या कामाकडे कोणीही बोट दाखवू शकणार नाही.

मकर
आज मेंदूपेक्षा शारीरिक श्रमांवर अधिक भर द्या. मेहनत करणे तुमचा सर्वात मोठी गुण आहे आणि त्यासाठी तुम्ही मागेपुढे पाहत नाही. तुमच्या अंतरात्म्यातून काही आवाज येईल, ते ऐकून तुमचे एखादे काम होईल, आणि चांगले वाटेल. ऑफिसमध्ये बुद्धिमत्तेचे कौतुक केले जाईल आणि एखादा वरीष्ठ अधिकारी कामावर खुश होऊन पदोन्नतीबद्दल बोलू शकेल. वैयक्तिक जीवनात आव्हाने असतील. परंतु त्यावर मात करू शकता.

कुंभ
आयुष्यात आरोग्यापेक्षा मोठे काहीही नाही, म्हणून आरोग्याकडे लक्ष द्या. उलट-सुलट खाणे टाळा. आज भावासमान व्यक्तीची कामात मदत मिळू शकते. जमीनी संबंधित कामांपासून दूर राहा. कौटुंबिक सहकार्य मिळेल आणि विवाहित जीवनात प्रेम दिसून येईल. स्वतःची क्षमता ओळखून कामात पुढे जा. विरोधकांबाबत जागरूक रहा आणि इतरांच्या कामात अडथळा आणू नका.

मीन
भावनिकता कधीकधी आपल्याला अशी कामे करण्यास प्रवृत्त करते जे आपल्यासाठी चांगले नाही, म्हणून त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात चालू असलेले तणाव दूर करण्याचा एकच मार्ग आहे, संवाद आणि यामुळे मार्ग निघेल. अनुभवी व्यक्तीचे सहकार्य मिळेल. ज्यामुळे व्यवसायासंबंधी एखादी डिल हाताला लागू शकते. आजचा दिवस गुंतवणूकीसाठी उत्तम आहे. चांगल्या लाभाचे योग आहेत. लाँग टर्म गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरेल.