13 डिसेंबर राशिफळ : ‘या’ 5 राशीवाल्यांसाठी ‘शुभ’ असेल ‘रविवार’चा दिवस

मेष
आजचा दिवस अनुकूल असून मनामध्ये आनंद निर्माण करेल. विवाहित लोकांच्या जीवनात प्रेम असेल. प्रेमसंबंधात काही चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. विरोधकांवर मात कराल. संततीशी प्रेमळपणे वागाल. कामातील कुशलता चांगले परिणाम देईल. धैर्य वाढेल आणि आव्हानांचा सामना करण्यास तयार असाल. उत्पन्न सामान्य असेल, म्हणून खर्चावर थोडा लगाम लावा.

वृषभ
आज चढ-उताराचा काळ आहे. व्यवसायात जोखीम घेण्याचा विचार कराल, ज्यामुळे व्यवसायात यश मिळेल. प्रवासात जाऊ शकता, परंतु नुकसान जास्त होईल, म्हणून काळजी घ्या. मानसिक ताण राहील. थकवा येईल. अशक्तपणा जाणवेल. कामासाठी दिवस अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात तणाव असेल. प्रेमसंबंधात सुखद परिणाम मिळतील. प्रिय व्यक्तीसोबत गप्पा मारण्याची संधी देखील मिळेल.

मिथुन
आजचा दिवस थोडा कमजोर असू शकतो. परंतु मानसिकदृष्ट्या मजबूत असल्याने अनेक कामे होतील. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. काही समस्या असेल तर तीसुद्धा एकत्र बसून दूर करू शकता. वैवाहिक जीवनात चांगले परिणाम मिळतील. जोडीदार एखाद्या विशिष्ट विषयावर चर्चा करेल. कामात शॉर्टकट अवलंबण्याचा प्रयत्न करणे हानिकारक ठरेल. कौटुंबिक जीवनात शांततेचा अभाव असेल. परंतु कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहील. कुटुंबासाठी एखादी चांगली भेटवस्तू आणू शकता.

कर्क
आज मनात आनंद आणि घरात चांगले वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये चांगला समन्वय असेल. नवीन कामाचा विचार करू शकता. घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्याल. कामात स्थिती अनुकूल असेल. बदलीचे योग आहेत. प्रवास करणे टाळा. सहकार्‍यांवर जास्त विश्वास ठेवू नका. रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. विवाहित लोकांचे विवाहित जीवन तणावपूर्ण असेल, जोडीदार एखाद्या गोष्टीवरून हट्टीपणा करू शकतो.

सिंह
आजचा दिवस चांगला आहे. कारण भाग्य आज प्रबळ असेल. लांबणीवर पडलेल्या योजना मार्गी लागतील. कामात यश मिळाल्याने आनंद होईल. उत्पन्न वाढेल. अनियमित खाण्यामुळे त्रास होऊ शकतो. आजारी पडू शकता, म्हणून काळजी घ्या. कामात चांगले परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून सूख आणि सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. प्रिय व्यक्तीसोबत जुन्या गोष्टींच्या आठवणी व्यक्त करण्याची आणि प्रेम दर्शविण्याची संधी मिळेल.

कन्या
आज खुप दिवसानंतर बरे वाटेल. तणावातून मुक्ती मिळेल. आवश्यक खर्च कराल. अनावश्यक खर्चातून मुक्ती मिळेल. प्रेमसंबंधात आनंदाचे क्षण येतील. प्रिय व्यक्ती तुम्हाला साथ देईल आणि एकमेकांना समजून घ्याल. वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस चांगला आहे. संतती प्रगती करेल. कामात चांगले परिणाम मिळतील. ज्यामुळे कामाचे कामाचे कौतुक होईल. व्यवस्थापनाला तुमचे काम दिसेल, यामुळे प्रोत्साहन मिळेल.

तुळ
आजचा दिवस उत्तम आहे. मनातील इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधात चांगले क्षण घालवण्याची संधी मिळेल. नात्यात प्रेम आणि रोमान्स वाढेल. संततीकडून आनंद मिळेल. दाम्पत्य जीवनात देखील तणाव कमी होईल. आरोग्या काळजी घ्या आणि आजारी पडणे टाळा. कौटुंबिक जीवन शांत राहील. कामात काही आव्हाने असू शकतात. त्यांचा सामना करा, त्याचा फायदा होईल.

वृश्चिक
आज आत्मविश्वास मजबूत असेल आणि म्हणूनच आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. कुटुंबात सूख आणि शांती वाढेल. घरात सूख मिळेल. कामासाठी दिवस खूप चांगला आहे. आजचा दिवस खूप प्रॉडक्टिव्ह बनवाल. आजचा दिवस खुप संतुलित ठेवाल आणि कुटूंबाकडेही संपूर्ण लक्ष द्याल. मनात आनंद जाणवेल. मानसिक ताण कमी होईल. प्रेमसंबंधात आनंद असेल. वैवाहिक जीवनात थोडा ताण असेल. जोडीदारास काही समस्या असेल तर त्याबद्दल बोला.

धनु
आज मेहनत कराल, ज्यामुळे कामात चांगले परिणाम मिळतील. कार्यक्षमता सिद्ध होईल. आवडते काम भरपूर करण्याची इच्छा होईल, त्यामध्ये यश मिळेल. उत्पन्न वाढल्याने आनंद होईल. कुटुंबातील छोट्यांचे सहकार्य मिळेल आणि कुटुंबाला मान सन्मान मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील. प्रेमसंबंधात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. प्रिय व्यक्तीशी वाद होऊ शकतो.

मकर
कुटुंबाबद्दल विशेष प्रेम जाणवेल आणि त्यांच्यासाठी एक उत्तम भेट आणू शकता. कुटुंबात शांती राहील. बोलण्याने लोकांची मने जिंकला. संगीतमध्ये प्रयत्न करू शकता. प्रेमसंबंधात चांगली बातमी मिळेल. वैवाहिक जीवन तणावपूर्ण असेल. जोडीदाराचे आरोग्य कमजोर होऊ शकते. चांगले भोजन कराल. कामात चांगले परिणाम मिळतील. अगोदर केलेल्या मेहनतीचे फळ आज समोर येऊ शकते. मोठा फायदा मिळू शकतो.

कुंभ
आजचा दिवस आहे. पैसा येईल, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. यासाठी तुम्ही खुप मेहनतही केलेली आहे, ज्यामुळे तुम्ही याचे दावेदार आहात. उत्पन्न वाढविण्यासाठी नवीन योजना बनवू शकता. प्रेमसंबंध थोडे कमजोर असू शकतात. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे, जोडीदाराकडून प्रेम मिळेल. कौटुंबिक जीवनात थोडा तणाव असू शकतो, पण कोणतीही गंभीर समस्या असणार नाही, म्हणून अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही. कार्यक्षेत्रात स्थिती मजबूत होईल. कामात आज जास्त व्यस्त रहाल.

मीन
आजचा दिवस कमजोर आहे. आरोग्य बिघडू शकते. मानसिक ताणतणावही वाढेल. वैवाहिक जीवन आनंद देईल. जोडीदार आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेल. त्यांच्याबरोबर एखाद्या धार्मिक कार्यात भाग घ्याल, यामुळे सामाजिकताही सुधारेल. प्रेमसंबंधात विचारपूर्वक राहावे लागेल, कारण त्यांच्या कुटुंबाकडून एखाद्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो. कार्यक्षेत्रात स्थिती तुमच्या बाजूने असेल आणि चांगले फायदेही मिळतील. कुटुंबाचे वातावरण प्रेमाने परिपूर्ण असेल. घराची जबाबदारी चांगल्या प्रकारे समजून घ्याल.