
13 फेब्रुवारी राशिफळ : गुरुवार ‘या’ 5 राशींवर राहिल सूर्याच्या गोचराचा प्रभाव
पोलीसनामा ऑनलाईन टीम : मेष : तुमच्या राशीसाठी आजचा दिवस चढ-उताराचा असणार आहे. दुपारपर्यंत तुम्हाला मानसिक चिंता राहिल आणि खर्चही वाढेल. यानंंतर जोडीदाराशी प्रेमाच्या गोड गोष्टी होतील. व्यापारात लाभ होईल. लांबच्या प्रवासात लाभ होईल. कामातही यश मिळेल. प्रेमसंबंधात दिवस चांगला आहे. परंतु कुटुंबात वाद-विवाद होऊ शकतात. कुटुंबातील एखादी ज्येष्ठ व्यक्ती आजारी पडू शकते.
वृषभ
तुमच्या राशीसाठी आजचा दिवस ठिक आहे. प्रेमसंबंधात आनंद प्राप्त होईल. व्यक्तीला मनातील गोष्ट सांगण्यासाठी दिवस चांगला आहे. ती आपले जरूर ऐकेल. वैवाहिक जीवनातही सुख राहिल. परंतु सासरच्यांकडे जोडीदाराची तक्रार करू नका. कामात आज तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील. आरोग्य सुद्धा चांगले राहिल.
मिथुन
तुमच्यासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. कुटुंबात सुख शांती आणि प्रेमसंबंधातही चांगला काळ अनुभवाल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या मनातील गोष्ट तुम्हाला समजेल आणि तुमचे नाते आणखी मजबूत होईल. वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस चांगला आहे. परंतु जोडीदाराचा मुड थोडा खराब होऊ शकतो. कामात चांगले परिणाम दिसतील. आरोग्य चांगले राहिल.
कर्क
आज तुम्ही खुप आनंदी रहाल आणि भरपूर मेहनत करून काम पूर्ण कराल. आज एखादा मनासारखा प्रवास होईल. कुटुंबियांची साथ लाभेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. आज बँकेचे एखादे कर्ज फेडू शकता. तुमच्या वैवाहिक जीवनात आज प्रेम मिळेल. आणि जोडीदार तुमच्यावर खुश राहिल. कामासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे.
सिंह
आज तुम्हाला एखादी अशी बातमी समजेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी होऊ शकता. कुटुंबात एखाद्या व्यक्तीचे आगमन होऊ शकते. ज्याच्या येण्यामुळे सर्वांच्या चेहर्यावर आनंद दिसेल. प्रेमसंबंधात आजच्या दिवशी जरा लक्ष द्या, कारण प्रिय व्यक्तीशी एखाद्या गोष्टीवरून राग-रूसवा होऊ शकतो. वैवाहिक जीवन चांगले राहिल आणि संततीकडून शुभवार्ता समजू शकते. विरोधकांवर मात कराल. कोर्ट कचेरीच्या प्रकरणात यश मिळेल. कामाच्या बाबतीत चढ-उताराची स्थिती राहिल.
कन्या
तुमच्यासाठी आजचा दिवस दुपारपर्यंत ठिक आहे, त्यानंतर आणखी चांगला दिवस आहे. तुम्हाला उत्तम धन मिळेल. आनंद वाढेल, यामुळे प्रत्येक काम व्यवस्थित कराल. कुटुंबातील वातावरण शांत राहिल. कामात जास्त मेहनत करावी लागेल. तुम्ही तुमच्या विरोधकांपासून सावध रहा. विनाकारण कुणाशीही भांडू नका. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुमची प्रिय व्यक्ती तुमच्या खरेपणाचा पुरावा मागू शकते. तुमचे उत्पन्न वाढेल.
तुळ
तुळा राशीच्या लोकांना आज शुभवार्ता समजतील. आज नोकरीत बढतीचे योग आहेत. कामात चांगले परिणाम दिसून येतील. तुमचा व्यवसाय वेग घेईल. कुटुंबातील लोकही तुमच्या प्रगतीसाठी प्रार्थना करतील. तसेच तुम्हाला कामात मदत करतील. घरातील छोट्यांकडून अडचणी येऊ शकतात. प्रेमसंबधासाठी दिनमान सामान्य आहे. वैवाहिक जीवनात छोटे-छोटे वाद सोडले तर चांगल्या गोष्टी समजतील.
वृश्चिक
आज तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. परंतु दुपारनंतर स्थिती बदलेल आणि खर्च वाढेल. उत्पन्नात थोडी घसरण होईल. यासाठी थोडे लक्ष द्या. कुटुंबातील छोट्या सदस्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. कुणालाही काही वाईट बोलू नका, जेणेकरून वाद उत्पन्न होईल. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. व्यापारात यश मिळेल. प्रेमसंबंधात आजचा दिवस मस्त आहे. कामात थोडे सावध रहा. तुमच्या सोबत काम करणारे तुमच्याविरूद्ध काही तरी कुरापती करू शकतात.
धनु
आजच्या दिवशी तुम्ही कामात लक्ष द्या, यामुळे पुढील मार्ग मोकळे होतील. दुपारनंतर उत्पन्न वाढेल, यामुळे मन आनंदीत होईल. प्रेमसंबंधात आनंद प्राप्त होईल. आज तुम्ही प्रिय व्यक्तीला भेटण्यासाठी जाऊ शकता. कौटुंबिक जीवन आनंदी राहिल. सर्वांशी मिळून मिसळून रहाल, पण जवळच्या नातेवाईकांशी वाद होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात तणाव जाणवला तरी प्रेम कायम राहिल. कामात चांगले परिणाम दिसतील.
मकर
आज चढ-उताराची स्थिती रााहिल, परंतु घाबरण्याची गरज नाही कारण दुपारनंतर भाग्य उजळल्याने कामात यश मिळेल. कामात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कुटुंबातील छोट्यांचे आरोग्य बिघडू शकते, ते आजारी पडू शकतात किंवा त्यांच्याशी वाद होऊ शकतो. यासाठी थोडे लक्ष द्या. व्यापारात चांगला लाभ होईल. नोकरीत तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील.
कुंभ
आजच्या दिवशी काळजी घ्या, कारण आरोग्य बिघडू शकते आणि तुम्ही आजारी पडू शकता. दुपारनंतर प्रकृती ठिक होईल. कठोर परिश्रम केल्याने चांगला लाभ होईल. आज भाग्यामुळे धनप्राप्ती होईल आणि कर्जातून मुक्ती मिळेल. खर्च सांभाळून करा. उत्पन्न वाढेल. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे. वैवाहिक जीवनासाठी दिवस सामान्य आहे.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उताराचा राहिल. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद राहिल आणि जोडीदाराशी गुजगोष्टी कराल. परंतु दुपारनंतर स्थिती बदलेल आणि भांडणसुद्धा होऊ शकते यासाठी सावध रहा. दुपारनंतर एखाद्या गोष्टीमुळे चिंता वाढेल. अशावेळी तुम्ही कामात लक्ष द्या आणि कुटुंबाच्या वातावरणाला सुधारण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस कमजोर आहे.