13 जुलै राशिफळ : सोमवार ‘या’ 6 राशींसाठी अतिशय ‘शुभ’, जाणून घ्या कोणत्या राशी

पोलीसनामा ऑनलाइन

मेष
स्वत: च्या कामाकडे लक्ष द्याल, ज्यामुळे कामात आलेली मरगळ दूर होईल आणि रखडलेली कामे वेग पकडतील आणि फायदा होईल. आज स्वत: वर एक विचित्र प्रकारचा अभिमान वाटेल, परंतु हे टाळणे चांगले ठरेल. इतरांनाही महत्त्व द्या. समाजात लोकप्रियता वाढेल. आदर मिळेल. चांगले अन्न ग्रहण कराल. नवीन कपडे खरेदी करण्याचा विचार करू शकता. प्रवासात अडचणी येतील. व्यवसायातील नवीन करारासाठी प्रयत्न कराल. प्रेमसंबंध सामान्य राहतील. वैवाहिक जीवनात तणावाचा सामना करावा लागेल.

वृषभ
स्वतःकडे अधिक लक्ष द्याल. खर्च देखील करू शकता. व्यक्तिमत्त्व सुधारेल. आपल्या बोलण्यात लोकांना आपले बनवण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबातील वृद्ध व्यक्तीची तब्येत बिघडू शकते. व्यवसायात फायदा होईल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि रोमान्सची संधी येईल. प्रेमसंबंधात चांगला वेळ मिळेल आणि प्रिय व्यक्ती तिच्या मनातील सर्व गोष्टी समोर ठेवेल त्यामुळे एकमेकांवरील विश्वास वाढेल. नोकरीसाठी दिवस सामान्य आहे.

मिथुन
आरोग्याच्या समस्या कायम राहू शकतात, म्हणून लक्ष द्या आणि निष्काळजीपणा करू नका. सुखाच्या मागे धावल्याने आर्थिक संकटात सापडू शकता. समाजात इच्छाशक्तीच्या बळावर काही नवीन कार्य केल्याने तुम्ही कौतुकास पात्र ठराल. सामाजिक वर्तुळ वाढेल. प्रेम जीवनासाठी दिनमान सामान्य असेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून जीवनसाथीकडून अशा गोष्टी समजतील ज्यामुळे नाते अधिक चांगले होईल. नोकरीत यश मिळेल.

कर्क
कुटुंबासाठी खुप विचार कराल. व्यवसायात चांगला नफा मिळेल. उत्पन्न वाढेल, ज्यामुळे मन आनंदित होईल. नोकरीत केलेल्या प्रयत्नांना यश येईल आणि चांगले परिणाम मिळतील. प्रमोशनची संधी मिळू शकते, परंतु घमेंडीत कुणालाही काही बोलून दुखवू नका. विरोधकांपासून सावध रहा. प्रेमसंबंधात रोमान्स राहील. वैवाहिक जीवनात चांगल्या काळाची अनुभूती येईल, परंतु जोडीदार आजारी पडू शकतो.

सिंह
जास्त खर्चामुळे मनावरील ओझे वाढेल. मानसिक चिंता वाढतील. आरोग्यही कमजोर राहील. एखाद्या कामात मन कमी लागेल, पण भाग्याची साथ लाभल्याने अनेक कामे मार्गी लागतील. वडिलांचे सहकार्य मिळेल. नोकरीत चांगल्या लाभाची अपेक्षा करू शकता. प्रेमसंबंध त्रासदायक ठरू शकतात. प्रिय व्यक्तीला भेटण्यासाठी खूप उत्सुक असाल परंतु ही भेट सध्या होणे शक्य होणार नाही. वैवाहिक जीवन ठीक राहील.

कन्या
संततीच्या बाबतीत खुप आशावादी राहाल, त्यांच्या भविष्याबद्दलही चिंता वाटेल. शिक्षणामध्ये अडथळे येतील. बँकेचे कर्ज घेण्यात यश मिळू शकते. व्यवसायासाठी चांगला दिवस आहे. नोकरीत आपल्या बुद्धीच्या बळावर दिवस चांगला करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखाद्या चांगल्या व्यक्तीची भेट होईल. आरोग्य चांगले राहील. उत्पन्न वाढेल.

तुळ
घरगुती खर्चात धन जास्त खर्च होईल. कुटुंबाच्या जबाबदार्‍या समजून घ्याल आणि त्या पार पाडण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबातील सदस्यांच्या मनातील गोष्टी जाणून चांगला काळ आणण्याचा प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनात तणाव राहू शकतो. नोकरीत केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कामाचे कौतुक होईल. पण मानसिकदृष्ट्या तुम्ही खूप व्यस्त राहाल, म्हणून कामावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे ठरेल. आरोग्य कमजोर राहील. प्रेम जीवन सामान्य राहील.

वृश्चिक
प्रवासाला जाण्यासाठी वेळ शुभ नाही, समस्या येऊ शकतात, म्हणून जाऊ नका. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. परंतु कुटुंबातील एखाद्या लहान सदस्याचे आरोग्य बिघडू शकते. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. परंतु प्रिय व्यक्ती एखादा विषय ताणून धरेल, यामुळे भांडणाची स्थिती निर्माण होईल. वैवाहिक जीवनात रोमान्सची संधी येईल. नोकरीत चांगले परिणाम मिळतील. व्यवसायातही फायदा होईल.

धनु
मानसिक ताणतणावातून मुक्तता मिळेल, परंतु खाण्यापिण्यातील अनियमितता तुम्हाला आजारी पाडू शकते. घशात दुखणे किंवा घशातील संसर्ग, टॉन्सिल्स अथवा तोंडाचा अल्सरमुळे त्रास होऊ शकतो. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. नोकरीत केलेले प्रयत्न यशस्वी होतील. वैवाहिक जीवन चांगले राहील. प्रेमसंबंधात तणाव राहील.

मकर
आरोग्याच्या बाबतीत दिवस थोडा चांगला जाईल. एखादे नवीन काम करण्याचा विचार कराल, आणि त्याची रूपरेषा तयार कराल. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. सरकारी क्षेत्रातून लाभ होईल. प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करू शकता. वाहन खरेदी करण्याचीही स्थिती असू शकते. प्रेमसंबंधात प्रेम वाढेल. वैवाहिक जीवनात तणावातून मुक्तता मिळेल. चांगले परिणाम मिळतील.

कुंभ
कुठेतरी दूर जाण्याचा विचार कराल, पण सध्या ते रद्द करा, कारण वेळ अनुकूल नाही. उत्पन्न कमी होऊ शकते आणि खर्च वाढेल. मानसिक ताणही वाढेल, म्हणून काळजी घ्या. कुटुंबातील लोकांचे चांगले वागणे तुमचे मन जिंकेल, म्हणून कुटुंबासमवेत वेळ घालवा. चांगले भोजन कराल. जोडीदाराकडून चांगली बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे.

मीन
बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमतेवर एखादे नवीन काम हाती घ्याल. जुन्या योजना वरचढ ठरतील आणि फायदा होईल. आज अनेक ठिकाणावरून पैसे परत येऊ शकतात, रखडलेला पैसा आल्याने स्थिती चांगली होईल. कुटुंबात मानसन्मान मिळेल. मित्र आणि नातेवाईकांशी बोलण्याने मन हलके होईल. नोकरीसाठी काळ सामान्य राहील. व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. प्रेमसंबंधात अडचणी येतील. इतर व्यक्तीकउे आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल बोलू नका. वैवाहिक जीवन चांगले राहील.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like